तोतया वारसदार (पर्व २ रे ) भाग १

“आम्हा दोघांचा तुम्ही सर्व लोकांनी अतिशय आत्मियतेने विचार केला त्या बद्दल आम्ही तुमचे आभार म??

 तोतया वारसदार

पात्र रचना

सारंग         - वकील,  विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे  सदस्य

डॉ प्रशांत       - डॉक्टर,  विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे  सदस्य

किरीट         - चार्टर्ड अकाऊंटंट, विनायकरावांच्या संपत्तीच्या ट्रस्टचे  सदस्य

निशांत        - शोधकार्य करणाऱ्या दक्षता कंपनीचा प्रतिनिधी. शोधकर्ता

नयना         - निशांतची बहीण. आणि इंटिरियर डेकोरेटर  

महादेवराव      - घराण्याचा मूळ पुरुष.

सखारामपंत     - महादेवराव – सखारामपंत. वेळणेश्वरला स्थायिक

विश्वनाथ       - महादेवराव – विश्वनाथ. गोकर्ण महाबळवेश्वरला स्थायिक.

कौशिक        - महादेवराव – कौशिक – समुद्रात बुडून मेला.

दिनकर       - महादेवराव - - दिनकर साताऱ्याला गेला तिथून पुणे आणि तिथून

               कानपूरला गेला

चंद्रकांत गोखले                - दिनकर गोखल्यांचा सध्याचा वंशज. वेळणेश्वर

उज्ज्वला                    - चंद्रकांत गोखल्यांची बायको.

विश्वास                     - चंद्रकांत गोखल्यांचा मुलगा अमेरिका.

स्वानंदी                     - विश्वास ची बायको.

सुनील                      - चंद्रकांत गोखल्यांचा धाकटा मुलगा अमेरिका.

नर्मदा आणि गोदावरी – महादेवरावांच्या मुली, लग्न होऊन चिपळूण आणि नंतर

पुण्यास स्थलांतर पण पुण्याच्या प्लेग मधे दोन्ही कुटुंबाची संपूर्ण वाताहत झाली.

रंगनाथ आणि भास्कर – सखाराम पंतांची मुलं. प्रथम पुणे आणि मग नागपूरला

स्थायिक

रेवती          सखाराम पंतांची मुलगी हरिहर साने यांच्याशी लग्नं करून सांगलीला

स्थलांतर.

अक्षय साने     - महादेवराव – सखाराम – रेवती -अक्षय

सहावी  पिढी. सुरतला स्थायिक.

अंबिका        सखाराम पंतांची मुलगी  अकाली मृत्यू.

कावेरी         रंगनाथाची मुलगी. विश्वास देशमुख शी लग्न

श्रीरंग         कावेरीचा मुलगा. दुसऱ्या महा युद्धाच्या  वेळेस सैन्यात गेला.

सीता, सरिता जान्हवी    – श्रीरंग च्या मुली.

शंकरन               - श्रीरंगचा दुसऱ्या बायको पासून झालेला मुलगा.

विनायक       भास्कर चा मुलगा वसंत त्याचा मुलगा विनायक

व्यंकटेश, सौमित्र आणि अविनाश - विनायकरावांची मुलं.

जय           व्यंकटेशचा मुलगा.

रोहन          - सौमित्रचा मुलगा

लक्ष्मण आणि वर्षा      - महादेवराव – विश्वनाथ – श्रीपति -सहावी पिढी.

  गोकर्णला स्थायिक.

वसुधाबाई             - लक्ष्मणची आई.

विश्राम आणि अनिल           - महादेवराव – विश्वनाथ – ओंकार -गंगाधर –

सहावी पिढी.

  साताऱ्याला  स्थायिक.

दिनेश आणि प्रांजल            - विश्रामची मुलं. सातारा

विनय                       - अनिलचा मुलगा सातारा.

विश्वंभर                     - महादेव – विश्वनाथ- ओंकार- विश्वंभर.

माधव                      - विश्वंभर – राजाराम – माधव. तंजावरला

 स्थायिक

वसुंधरा                      - माधवची बायको.

चिन्मय आणि विवेक           - माधव ची मुलं.

हेमांगी                      - चिन्मयची बायको. 

कावेरी                      - महादेव – विश्वनाथ- कावेरी. विश्वास परांजपे शी लग्न.

वसंतराव परांजपे                     कावेरी परांजप्यांचे आताचे वंशज

प्रभावती                            वसंतरावांच्या पत्नी

त्र्यंबक                             वसंतरावांचे काका.

गोविंद                             वसंतरावांचा धाकटा भाऊ.

श्रीकांत आणि विक्रम            -वसंतरावांची मुलं. अमेरिकेत असतात. 

सुधाकर गोखले         निशांतला कानपूरला भेटलेले पहिले गोखले.

विशाखा               सुधाकररावांची बायको.

बबन                 - सारंग सरांचा चपराशी

सुभाष गोखले          -बबनचा मित्र. कटातला भागीदार. तोतया वारसदार

अविनाशराव           - निशांतचे वडील.

जयश्री                - निशांतची आई.

 भाग  १    (पर्व  २ )                        

“तू, बबन, इतकी वर्ष इमाने इतबारे तू माझ्याकडे काम केलंस, म्हणून  तुला फक्त वॉर्निंग देऊन सोडतो आहे, पण पुन्हा जर अश्या काही करामती केल्या, तर  तुझी खैर नाही. तेंव्हा माफी मिळणार नाही. तू सुद्धा काय लटपटी केल्या त्या माफी पत्रा सोबत उद्या लिहून आण.” – सारंग.

बबन सरांच्या पायावर कोसळला. पुन्हा पुन्हा माफी मागत राहिला.

“जा आता तू. उद्या ये.” – सारंग. मग बबन पण गेला.

सारंग सर पुन्हा बोलायला उठले.

“हे तोतयाचं प्रकरण तर निपटलं. आता महत्वाचा भाग. ज्या कारणांसाठी आपण सर्व इथे जमलो आहोत, त्या इस्टेटी च्या बाबत निर्णय घेण्याची वेळ आली आहे. त्यावर सर्वकष चर्चा व्हायला हवी. 

“मग नयनाने सुचवलं की बराच उशीर झाला आहे, तेंव्हा सर्वांनी जेवण उरकून घ्यावं म्हणजे चर्चा करायला एनर्जी येईल.” ती असं म्हणाली, आणि एकदमच सर्वांना भुकेची जाणीव झाली. मग हसत खेळत खेळीमेळीच्या वातावरणात जेवणं पार पडली. डोक्यांवरचं टेंशन निघून गेलं होतं. जेवणं झाल्यावर समस्त गोखले मंडळी बायका मुलांसह समोरच्या हॉल मधे जमले आणि चर्चेला सुरवात झाली. सारंग किरीट आणि प्रशांत शांतपणे बसून सगळी चर्चा ऐकत होते. एक एक जण आपलं म्हणण मांडत होता. सर्वांचा सुर एकच होता, की त्यांना कोणालाही वाटा नको होता. पण काय करायचं यांच्या कल्पना स्पष्ट नव्हत्या. शेवटी विश्राम उभा राहिला, सर्वांना उद्देशून म्हणाला,

“आपण एक काम निश्चित करू शकतो. आत्ताचे जे ट्रस्टी आहेत, त्यांनीच पुढे पण ट्रस्टी म्हणून राहावं. आणि आपण सर्व दर वर्षी इथे किमान आठवड्याची सुट्टी घेऊन रीलॅक्स व्हायला यायचं. बघा तुम्हाला पटतंय का?”

थोडा वेळ कुजबूज झाली, कोणालाच त्यात काही वावगं वाटलं नाही. पण मग किरीट इतका वेळ शांतपणे श्रोत्यांची भूमिका करत होता, तो उठला.

“मला वाटतं की आत्ता पर्यन्त, विनायकराव पण एक ट्रस्टी होते, त्यांची जागा कोणीतरी घ्यायला पाहिजे. तेंव्हा सर्वानुमते तुम्ही काही नावं सुचवा.” – किरीट.

कोणीच तयार नव्हतं. विश्राम म्हणाला,

“किरीट सर, आम्ही कोणीच नागपुरात रहात नाही, तेंव्हा ट्रस्टीची भूमिका आम्हाला कोणालाच झेपण्यासारखी नाहीये.”

“ओके, त्यावर विचार करता येईल. काही तरी मार्ग निघेलच. पण आता मला थोडं वेगळं बोलायचं आहे, बोलू का?” – सारंग.

“काय सारंग, तू परवानगी मागतो आहेस? तू तर सूत्रधार आहेस. तू बोल, परवानगी कसली मंगतोस?”- व्यंकटेश.

“नाही मला जे बोलायचं आहे ते चालू असलेल्या विषयाला धरून नाहीये, म्हणून. विचारतो आहे, बोलू का?” – सारंग.

“बोल बिनधास्त बोल.” – व्यंकटेश.

“निशांतला मी मुलगाच मानतो. त्याच्या साठी मी वर्षाचा हात मागतो आहे. त्या दोघांच एकमेकांवर प्रेम आहे, माझी लक्ष्मणरावांना विनंती आहे की त्यांनी विचार करावा. आपण परवानगी दिलीत तर मला फार आनंद होईल.” – सारंग.

आता वेगळ्याच विषयाला तोंड फुटलं होतं. तशी सर्वांनाच कल्पना होती, पण सारंग सर हा विषय काढतील असं कोणालाच वाटलं नव्हतं. खुद्द निशांत साठी सुद्धा हा धक्काच होता.

“माझं अनुमोदन आहे.”- रोहन.

“माझं पण” – दिनेश.

“माझं पण” – विनय.

“माझं पण.” – विश्राम.

आता बॉल लक्ष्मण कडे होता. त्याने आई कडे पाहिलं. मग लक्ष्मण, आईला म्हणजे वसुधाबाईंना आणि वर्षाला घेऊन दुसऱ्या खोलीत गेला. तिथे वर्षाशी थोडं बोलणं झाल्यावर, वासुधाबाईंनी होकार भरला. लक्ष्मणला कल्पना होतीच, त्याने पण ताणून  धरलं नाही.

“निशांत इतका हुशार आणि सुस्वभावी मुलगा आहे, की नाकारण्या सारखं काहीच नाहीये. फक्त त्याची नोकरी जरा धोक्याची आहे.” – आई.

पण वर्षा म्हणाली की दोन तीन वर्षात निशांत नोकरी सोडून अमरावतीला शेती कडे लक्ष देणार आहे. मग काही प्रश्न उरलाच नाही. तिघंही बाहेर आले.

“आम्हाला जावई म्हणून निशांत पसंत आहे.” – लक्ष्मण.

सर्वांनी टाळ्यांचा गाजर केला. मग सर्वांना मिठाई वाटण्यात आली. अर्धा तास याचीच चर्चा चालू होती.

“हे तर फारच छान झालं. आता हे लग्न ठरलच आहे, तर निशांतलाच ट्रस्टी होऊ द्या. म्हणजे प्रश्नच मिटला.” – विश्राम.

“नाही, नको, तो जो पर्यन्त या नोकरीत आहे, तो पर्यन्त वर्षाला ट्रस्टी म्हणून घेऊ. निशांत शेतीकडे वळला, की तेंव्हा बघू.” -सारंग.

“आता मी बोलणार. बोलू का?” – अक्षय.

“अरे, काय चाललंय काय? आता तू काय सांगणार बाबा?” – व्यंकटेश.

“मी माझी मुलगी, शलाका हिच्या साठी सौमित्र, तुमचा मुलगा रोहन चा हात मागतोय. आम्हाला रोहन जावई म्हणून पसंत आहे.”- अक्षय.

“वा, गोखल्यांची सान्यांशी पुन्हा एकदा सोयरीक. झकास.” – विश्राम.

“मला मान्य आहे ही सोयरीक” – सौमित्र.

झालं आता तर हॉल मधे आनंदाचा जणू काही विस्फोटच झाला. पुन्हा एकदा मिठाई वाटप. थोड्या वेळाने विश्राम म्हणाला,

“अरे, अजून कोणी राहिलं असेल, तर आत्ताच सांगा रे. सर्वांचा साखरपुडा लगेच करून टाकू.”

मग अनिल उठला, त्याला उठलेला पाहिल्यावर तर हास्य कल्लोळ झाला, आत्ता पर्यन्त सर्वांना विनय आणि नयना बद्दल अंदाज आलाच होता. अनिलने काही बोलण्याची काही आवश्यकताच नव्हती. पुन्हा एकदा मिठाई. तीन तीन लग्न ठरली. गदारोळ थांबल्यांवर निशांत बोलायला उभा राहिला.

“मी लक्ष्मणरावांचा खूप खूप आभारी आहे. हा माझ्या आयुष्यातला अतिशय आनंदाचा क्षण आहे. खरं म्हणजे आम्ही गोकर्णला गेलो होतो, आणि वर्षांची भेट झाली, तेंव्हाच माझ्या साठी शोधकार्य संपलं होतं. असो. मला आत्ता एका वेगळ्याच मुद्द्यावर बोलायचं आहे. गोविंद काका सुद्धा फार मोठ्या समाज कार्यात गुंतले आहेत. त्यांच्याही कार्याला  सर्वांचा हातभार लागावा, अशी माझी इच्छा आहे.”

“गोविंदा आपलाच आहे. तेंव्हा कोणाला काही आक्षेप असण्याचं काही कारण असेल, असं वाटत नाही, तरी सुद्धा जर कोणाला काही सांगायचं असेल, तर त्याने आपलं मत मांडावं.”- व्यंकटेश.

थोडा वेळ हॉल मधे शांतता होती. मग लक्ष्मण बोलला.

“माझं अनुमोदन आहे.”

“माझं पण अनुमोदन आहे” – विश्राम. मग सर्वांनीच एका सुरात माझं पण असं म्हंटलं.

“गोविंदा तू खूप चांगलं काम करतो आहेस, विनय सांगत होता मला, तुझी रीक्वायरमेंट काय आहे हे तूच ठरव. जे तू ठरवशील ते मला मंजूर.” – व्यंकटेश.

मला पण, मला पण, असा घोष झाल्यावर, विश्राम उठला आणि म्हणाला,

“सारंग सर, हे ठरलं. गोविंदाला जेवढी रक्कम पाहिजे, समाज कार्या साठी, ती आम्ही सर्व आगावुच मंजूर करतो आहोत. फुल्ली प्री अप्रूव्हड” – विश्राम.

गोविंद उभा राहिला, त्यांच्या डोळ्यात अश्रु तरळत होते, अतिशय गदगद स्वरात त्याने सर्वांचे आभार मानले. म्हणाला,

“माझ्यावर एवढा विश्वास टाकला आहे तुम्ही सर्वांनी, मी त्याला तडा जाऊ देणार नाही याची खात्री बाळगा.”

“वसंतराव आता यांच्या लग्नाचं बघा, अजून वेळ गेलेली नाही” – चंद्रकांत

अश्याच हलक्या फुलक्या वातावरणात ती दुपार आणि संध्याकाळ पसार झाली.

दुसऱ्या दिवशी सुभाष आणि बाबननी जे माफीनामे लिहून आणले होते, त्यावर थोडी चर्चा होऊन तो चॅप्टर संपला. इस्टेटीची कार्यवाही पूर्ण झाल्यावर अनुदान वितरित केल्या जाईल, असं सुभाषला सांगितल्यावर तो गेला.

दोन दिवसांनी तिन्ही जोडप्यांचा साखरपुडा करायचं ठरलं. पण निशांतच्या मनात घालमेल सुरू होती, तो नयना च्या कानाला लागला. तिच्याही चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटलं होतं. मग दोघेही समोर आले. निशांतने बोलायला सुरवात केली.

“आम्हा दोघांचा तुम्ही सर्व लोकांनी अतिशय आत्मियतेने विचार केला त्या बद्दल आम्ही तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. पण हे सर्व आमच्या आई वडिलांना माहीत नसतांना होतं आहे. आमच्या घरून विरोध होणार नाही, पण डावलल्या गेल्याची खंत जरूर त्यांच्या मनात राहील. याच्यावर उपाय काढणं जरुरीचं आहे.” – निशांत.

“ओके. मला असं वाटतं की आपण सर्व अमरावतीला जाऊ, आणि निशांतच्या वडिलांना आपल्या मनात काय आहे त्यांची कल्पना देऊ.” व्यंकटेश ने त्याची आयडिया सांगितली.

“बरोबर आहे. आणि निशांत तुम्ही दोघ उद्याच अमरावतीला जा आणि आम्ही सगळे अंबादेवीच्या दर्शनाला येतो आहे आणि त्यांना पण एका खास कामासाठी भेटायला येतो आहोत असं सांग. आम्ही परवा सकाळी निघतो. फक्त आमच्या साठी एक बस बूक करून दे.” – चंद्रकांत.

असा कार्यक्रम ठरला. आणि त्यानुसार, निशांत आणि नयना दुसऱ्या दिवशी अमरावतीला निघाले. दोघंही बरोबरच आलेले पाहून निशांतच्या आई वडिलांना  आश्चर्यच वाटलं.

“काय रे निशांत, सर्व ठीक आहे न? नाही म्हणजे दोघंही बरोबरच आला आहात म्हणून विचारलं.” अविनाशराव म्हणजे निशांतचे वडील म्हणाले.

“हो सर्व ठीक आहे. आम्ही दोघंही नागपूरलाच होतो म्हणून एकत्रच आलो.”- नयना.

मग जेवणं वगैरे झाल्यावर निशांतने लग्नाची बाब सोडून सर्व सर्व घडामोडी सांगितल्या.

आता आमचं काम संपलं आहे म्हणून जरा चार दिवस इथे आलो.” – निशांत.

“वा छान, गोखले मंडळी तुमच्या कामावर खुश आहेत हे ऐकून खूप बरं वाटलं. अरे मग त्यांना आपल्या घरी पण बोलवायचं जरा वऱ्हाडी पाहुणचार केला असता.” – बाबा

ते येणारच आहेत बाबा. उद्या सकाळी येत आहेत. त्यांच्या साठी एक बस बूक करून आलो आहे. सगळे ४०-५० लोकं असणार आहेत.” – नयना.

“अरे, एवढे लोकं येणार आहेत तर त्यांची नीट व्यवस्था व्हायला पाहिजे. आपलं घर काही इतकं मोठं नाहीये, त्यांची गैरसोय व्हायला नको. मोठी माणसं आहेत बाबा ती. आणि, सगळे कसे काय येत आहेत? काही खास? काही असेल, तर सांग बाबा, म्हणजे तशी तयारी करायला बरं.” – आई.

“तुम्ही अजिबात काळजी करू नका. त्यासाठीच आम्ही आधी आलो आहोत. त्यांना सर्वांना अंबादेवीच्या दर्शनाला यायचं आहे. अजून एक गोष्ट, त्यांना आपलं शेत आणि संत्र्याची बाग बघायची आहे. आणि तुमच्याशी पण काही बोलायचं आहे.” – निशांत.

“माझ्याशी काय काम आहे बुवा त्यांचं?” – बाबा.

क्रमश:.......

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com