Login

खरं थोरलेपण! भाग २

थोरलेपण म्हणजे फक्त वयाने नाही तर मनानेही मोठे असणे.
“अगं,तुला इतकी चांगली संधी मिळालेली असताना देखील तू असे का केले ? का नकार दिला ? " तिच्या सरांनी तिला विचारले.

आत्ता पुढें,


“सर, माझं शिकणं आईशिवाय काय उपयोगाचं? आधी तिचं बरे होणं गरजेचं आहे. तिच्याशी अवस्था असताना आम्ही तिला सोडून जाणे शक्य नाही. " तान्याने उदास स्वरात उत्तर दिले. तिचे उत्तर ऐकून तर शांत झाले.

" तू आज नाहीतर उद्या नक्की काहीतरी मोठं करून दाखवशील. " सर तिच्या डोळ्यात पाहून तिला म्हणाले.

वेळ पुढे सरकत होती. तान्याचं शिक्षण थांबलं, पण तिने हार मानली नाही. ती कामावर जायची, मुलांना शिकवायची, थोडंफार शिकायचीही.

एका दिवशी नगरपरिषदेने गरीब मुलांसाठी मोफत शिकवणी प्रकल्प सुरू केला.तान्या तिथे स्वयंसेवक म्हणून गेली. पहिल्या दिवशी तिच्या वर्गात एक मुलगा आला फाटकी कपडे, हातात एक कागद होता.

तो बोलत नव्हता, रागीट दिसत होता.

“तुझं नाव काय रे?” तान्याने त्याला विचारलं.

“सागर.”

“छान नाव आहे. पण इतका गप्प का?” तिने पुन्हा प्रश्न केला. तो काही बोलला नाही.

तिने त्याला चॉक दिला, “चल, फळ्यावर ‘आ’ लिही.” त्याने त्यावर फक्त नकारार्थी मान हलवली.

" काय झालं? " तिने आश्चर्याने विचारले.

" माझे वडील म्हणतात की शाळा फक्त श्रीमंतांसाठी असते आम्ही कामगारांची मुलं. " सागर ने शांत स्वरात उत्तर दिले.


“तुझ्या वडिलांना सांग, श्रीमंती पैशाने नाही, शिकण्याने मिळते.” तान्या ने त्याच्याकडे पाहिले आणि हसून म्हणाली.

त्या दिवसानंतर सागर रोज शिकवणीला येऊ लागला. हळूहळू बोलू लागला. काही दिवसांनी तो शाळेच्या स्पर्धेत पहिला आला. सगळे त्याचे कौतुक करत होते.

“हे फक्त माझं एकट्याचे यश नाही, माझी शिक्षिका तान्या मॅडम मुळे शक्य झालं. ” सागर ने हसत सगळ्यांकडे पाहून उत्तर दिले.

तान्याने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला.
“बाळा, मला वाटतं आज तू मला ‘थोर’ बनवलंस.”

एका रात्री तान्या कामावरून परत येत होती. पाऊस कोसळत होता. समोरच्या रोड वर एक एक्सीडेंट झाला होता, एक महागडी गाडी, आणि रस्त्यावर पडलेला बाईकस्वार.
लोक बघत होते, कोणी पुढे जात नव्हतं. तान्या धावत गेली, त्याला हलवून चेक करू लागली.

“अहो, कुणीतरी ऍम्ब्युलन्सला फोन करा!” तान्या ने सगळ्यांकडे पाहून सांगितले.

“ नको बाबा, ते पोलिसांच्या फांद्यात उगाच का अडकावे.” एक जण मधेच बडबडला.

तिने स्वतःने फोन केला, रक्ताने माखलेल्या त्या अनोळखी माणसाला आपल्या ओढणीने बांधलं.

तो माणूस श्रीमंत घराण्याचा होता. अभय देशमुख, एका कंपनीचा मालक. रुग्णालयात उपचार झाले. काही वेळात त्याला शुद्ध आली.

" डॉक्टर मी इकडे? " अभय ने दीर्घ श्वास घेत विचारले.

" तुम्हाला एक मुलगी इकडे घेऊन आली होती. खरतर तिने वेळेवर तुम्हाला इकडे आणल्यामुळे तुमचे प्राण वाचले. " डॉक्टरांनी त्याला सांगितले.
0

🎭 Series Post

View all