(एक हृदयाला भिडणारी कथा मनाने थोर असण्याची...)
पावसाची रिमझिम सुरू होती. नगरपालिकेच्या शाळेच्या जुन्या भिंतींवरून पाणी ओघळत होतं. पावसाच्या थेंबांमुळे खिडकीतून येणारा मंद वारा वर्गात पसरला होता. मुलं झगमगत्या पावसाकडे पाहत होती, आणि फळ्यावर शिक्षकांनी मोठ्या अक्षरात लिहिलं “थोरलेपण”.
“थोरलेपण म्हणजे काय रे?” शिक्षक राजेंद्र सरांनी विचारलं.
सगळे थोडेसे गोंधळले. काहींनी हात वर केले, काहींनी डोकं खाली केलं.
“सर, म्हणजे मोठं असणं!” पहिल्या बाकावरचा निखिल म्हणाला.
सगळे थोडेसे गोंधळले. काहींनी हात वर केले, काहींनी डोकं खाली केलं.
“सर, म्हणजे मोठं असणं!” पहिल्या बाकावरचा निखिल म्हणाला.
“मोठं म्हणजे उंचीने की वयाने?” सरांनी मिश्किलपणे विचारलं.
मुलं हसली.
“नाही सर, म्हणजे मनाने मोठं असणं.” शांत स्वभावाची जान्हवी उत्तरली.
राजेंद्र सर हसले, “बरोबर जान्हवी… पण मनाने मोठं असणं म्हणजे काय हे आपल्याला कळतं का?”
मुलं हसली.
“नाही सर, म्हणजे मनाने मोठं असणं.” शांत स्वभावाची जान्हवी उत्तरली.
राजेंद्र सर हसले, “बरोबर जान्हवी… पण मनाने मोठं असणं म्हणजे काय हे आपल्याला कळतं का?”
त्या प्रश्नाचं उत्तर कुणाकडे नव्हतं.
पण त्या दिवशी वर्गात बसलेली तान्या नावाची मुलगी मनात म्हणत होती “थोरलेपण… हं… कदाचित भविष्यात आपल्या आयुष्य हेही शिकवेल !”
पण त्या दिवशी वर्गात बसलेली तान्या नावाची मुलगी मनात म्हणत होती “थोरलेपण… हं… कदाचित भविष्यात आपल्या आयुष्य हेही शिकवेल !”
तान्याचं आयुष्य फार साधं. एका झोपडपट्टीत आईसोबत राहत असे. आई मजुर म्हणून बांधकामावर काम करत होती. वडील काही वर्षांपूर्वी गेले होते. घरात ना वीज, ना पंखा, ना थाटमाट. पण तान्याचं मन मोठं कायम हसरी, इतरांना मदत करणारी.
शाळेत ती हुशार होती, पण गरीबीमुळे अनेकदा पोटात अन्न नसतानाही वर्गात जायची. त्यांच्याच वर्गात एक विनय नावाचा मुलगा होता. त्याला आई नव्हती म्हणून तो कधीच टिफिन घेऊन येत नव्हता.
त्याच्या वर्गातले सगळे मित्र त्याला आपल्या टिफिन मधले थोडे थोडे अन्न द्यायचे... तान्या पण जेव्हा आपला टिफिन घेऊन याची तेव्हा त्यालाही द्यायची.
“तान्या, तू का देत बसतेस रे तुझं टिफिन?” तिची मैत्रीण प्राजक्ता विचारायची.
“त्यांच्या घरी आई नाही ना. म्हणून देत असते.” तान्या चे नेहमीचे उत्तर असायचे.
“पण तुझं काय?” प्राजक्ताला तिची काळजी होती.
“माझं? माझं मन भरलं की पोटही भरतं.” ती हसत म्हणायची.
त्या छोट्या वयातसुद्धा तिचं उत्तर “थोरले” होतं.
एक दिवशी शाळेत अचानक बातमी आली की तान्याला एका शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे. संपूर्ण शिक्षण मोफत, आणि राहण्याची सोयही. सगळे आनंदित झाले.
पण घरी आई आजारी पडली. डॉक्टरांनी सांगितलं, “यांना चांगला उपचार हवा, पण सरकारी दवाखान्यात वेळ लागेल.”
पण घरी आई आजारी पडली. डॉक्टरांनी सांगितलं, “यांना चांगला उपचार हवा, पण सरकारी दवाखान्यात वेळ लागेल.”
तान्याने ती बातमी ऐकली आणि शाळेत जाऊन त्या शिष्यवृत्तीसाठी नकार दिला.
“अगं,तुला इतकी चांगली संधी मिळालेली असताना देखील तू असे का केले ? का नकार दिला ? " तिच्या सरांनी तिला विचारले.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा