Login

थोरलेपण भाग दोन

भावांचा गैरसमज होतो
थोरलेपण भाग दोन
जलदलेखन

मागील भागात आपण पाहिलं कि, रोहन आणि सागर अभिजीतकडून हिस्सा मागतात, आता पाहूया पुढे,

तो दिवसभर छोट्या गॅरेजमध्ये काम करायचा, रात्री सागरचा आणि रोहनचा अभ्यास घ्यायचा. त्याला पगार काही जास्त भेटायचा नाही त्यामुळे बचत पण फारशी व्हायची नाही. घरात सगळं नीट चालावं म्हणून तो स्वतःवर काटकसर करायचा.आईची औषधं, रोहनची कॉलेज फी, सागरच्या क्लासेसची फीस, वीजबिल, बाजार  प्रत्येक खर्चाची जबाबदारी आता त्यानेच घेतली होती.

“अभि दादा, या महिन्यात मला नवीन बूट हवे आहेत, ते कॉलेजच्या स्पोर्ट्स साठी.”


" दादा, मला पण क्लासच्या ट्रीपला जायचं आहे.. "

“ठीक आहे रे रोहन, पुढच्या महिन्यात घेऊ. आधी फी भरूया आणि ट्रिपचे पैसे....”

तो शांतपणे सगळ्यांचे हट्ट पूर्ण करायचा. त्यांना मार्गदर्शन करायचा. ह्यात त्याच ज्या मुलीवर प्रेम होत, तिच्याशी लग्न करायचं देखील मागे पडलं.. तिने देखील वाट पाहून घरच्यांच्या दबावात येऊन लग्न केल. तेव्हा मात्र अभिने आता आपल्या कुटुंबासाठीचं जगायचं ठरवलं.


आई त्याला अनेकदा म्हणायची,

“अरे रे, थोडं स्वतःसाठी जग ना रे तू. तू स्वतःला कधी कपडे घेतलेत आठवतंय का तुला??”


तो फक्त हसून म्हणायचा,

“थोरला आहे ना मी…ह्या दोघांचं झालं कि जगेन माझ्यासाठी."


पण त्याच स्वतःसाठी जगणे मागे पडले. ह्यात तो कधीकधी वेळेवर जेवण करणे देखील विसरायचा.

वर्षानुवर्षं गेली. दोन्ही भावांनी शिक्षण पूर्ण केलं.
सागर इंजिनिअर झाला, रोहन बँकेत कामाला लागला. घरातला ताण कमी झाला. पण दादा मात्र अजूनही जुन्या सवयीने सगळं पाहायचा, घराच्या खर्चापासून ते आईच्या औषधापर्यंत. दोन्ही भावांवर जबाबदारी कधीच पडली नाही त्यामुळे ते दोघेही बिन्दास्त होते. त्यांनी स्वतःसाठीच सगळं काही केल. आता ते दोघेही कमावते झाल्यामुळे
अभिजितचं प्रेम त्याच सांगणे त्यांना कधी कधी दादा आपल्यावर नियंत्रण करतो असं त्यांना वाटायचं.


“सागर, एवढे पैसे खर्च करू नकोस,”
“रोहन, नवीन गाडी घेण्याआधी लोन फेडलं पाहिजे,”
“आई, तुला डॉक्टरकडे जायला मी सोबत येतो…”

तो बोलायचं हक्काने प्रेम होतं त्यात, पण भावंडांना वाटायचं तो अजूनही आम्हाला लहान समजतो. आम्हाला अजूनही ऑर्डर देतो. आधी त्या दोघांमध्येच होत, कितीही वाटत असल तरी ते अभिजितच्या विरोधात गेले नाही.पण त्या दोघांचं लग्न झालं तस त्यांच्या बायकांना सुजिता, पल्लवी ह्यांना वाटायचं, कि त्यांचा मोठा भाऊ आमच्या नवऱ्याना मुठीत ठेवतोय. खरं तर त्यांचा पगार देखील त्याने कधी घेतला नाही.. पण हळू हळू तक्रारी येऊ लागल्या...


अभिजित आळा घालेल का??
समजून घेतील का ते दोघे त्यांच्या दादाला????