Login

दही मिरची

दही मिरची रेसिपी
दही मिर्ची

साहित्य

१)जाडी हिरवी मिरची - एक किलो

२) तीळ (पांढरे) भाजलेले - एक मोठी वाटी

३) लसुण - दोन मोठे गाठे

४) अद्रक - दोन इंच

५) धने पावडर - १/२ वाटी

५) जिरे पावडर - १/२ वाटी

६) साबुदाणा भाजलेला बारीक करून - १/२ वाटी

७) मीठ चवीनुसार

८) आंबट दही - १/२ लिटर

९) हिंग - एक टेबलस्पून

कृती.

१. सर्वप्रथम हिरव्या मिर्च्या स्वच्छ धुऊन कोरड्या कापडाने पुसून घ्याव्या.

२. मिक्सरच्या भांड्यात भाजलेले पांढरे तीळ बारीक करून घ्यावे.

३. मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं लसूण अगदी बारीक करून घ्यावी.

४. आता एका मोठ्या भांड्यामध्ये तिळाचा भुरका, आलं लसणाची पेस्ट, हिंग, साबुदाण्याचा भुरका एकत्र करावा त्यात धने जिरे पावडर आणि मीठ घालावं आणि अंदाजाने थोडं थोडं आंबट दही घालून घट्टसर मिश्रण बनवावं.

५. मिरचीचे देठ न काढता मध्ये उभा काप देऊन, मिरचीच्या आत मध्ये बनवलेलं सारण भराव.

६. या भरलेल्या मिरच्या रात्रभर एका भांड्यात राहू द्याव्या म्हणजे आंबट दह्यातलं पाणी खाली जमा होईल. दुसऱ्या दिवशी ह्या मिरच्या अलगद एक एक करून ताटामध्ये उन्हात ठेवाव्या.

कडक उन्हात वाळवल्यानंतर मिरच्यांचा रंग बदलतो.

आता एका स्वच्छ बरणीत खाली थोडे झाडे मीठ आणि हिंग घालून या मिरच्यांची साठवणूक करावी.

खिचडी बरोबर किंवा तोंडी लावणं म्हणून तळलेल्या ह्या मिरच्या खूप छान लागतात.

टीप मिरच्या पूर्णपणे सुकू द्याव्या त्याच्या आत मधला मसालाही पूर्ण सुकल्याची खात्री झाल्यानंतरच त्या हवाबंद डब्यामध्ये भराव्या.

वापरतानाही कोरड्या हातानेच मिरच्या काढाव्या. ओलावा किंवा पाणी किंवा ओल्या हाताने या मिरच्या काढू नये, नाहीतर उरलेल्या मिरच्यांमध्ये किडे होण्याची शक्यता असते.

मध्ये मध्ये या मिरच्यांना ऊन दाखवत रहावे.

चला तर मग बनवा पटापट दही मिरच्या आणि सांगा त्यांची चव कशी झाली ते.