स्पर्धा
दिशा स्वप्नांची... भाग 10
(कथामालिका)
( सादर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे )
दोघेही हसतच घरात आले.
दुसऱ्या दिवसापासून त्याच ऑफिस सुरू झाल. सकाळी 9 ला घरून जायचा तो रात्री 8 वाजताच परत येत होता.
रजनीला कॉलेजला सुट्टी होति .
तिने फॅशन डिझाइनिंग ला ऍडमिशन घेतलं .आणि टेलरिंग टिचरचा जॉब पण सुरू केला. ती खूप लक्ष देऊन एक एक गोष्ट शिकत होती.
दोघं पण सगळ्यांच्या नकळत एकमेकांना जमेल तितका वेळ देत होते.
त्यांना अस वाटत होतं, कोणाचं आपल्याकडे लक्ष नाहीये.
पण आईला तर सगळंच माहीत असत.
नन्दाला दोघांमधला बदल दिसत होता.तिने तस रेखाला सांगितलं सुद्धा होत.
अशीच दोन वर्षे कधी संपली कळलच नाही.
******
रजनी च कॉलेज पूर्ण झालं होतं। आणि ती फॅशन डिझाईनर पण बनली होती.
तिला टेलरिंग क्लास मध्ये एक गोष्ट जाणवली होती.
त्या प्रमाणे तिने काहीतरी ठरवले होते.
ती त्याच्या रूम मध्ये होती.
चालेल, ना वीर अस करु का तुला काय वाटत.
तुला विश्वास आहे ना, मग झालं विचार नको करू आपण उद्यापासून जागा बघूया . ठीक आहे.
पण एव्हढे पैसे.
मी देईन. तू आणि मी काही वेगळे आहोत का,?
पण मी ते तुला नंतर परत करिन हा.
चालेल, आधी घे तर.
दोन दिवसांनि तुझा बर्थडे आहे,तुला काय गिफ्ट हवंय.
काही नको, तू असा माझ्या सोबत जवळ रहा.
सोबत तर मी आहेच, म्हणत तो तिच्या जवळ आला.
नेहमीप्रमाणे ती त्याला बिलगली.
आणि यावेळी थोडं वेगळं झालं. तीने मान वर करून त्याकडे पहिले.
तो तिच्या कपाळावर ओठ टेकवणर तिने पटकन पाय वर उचलले, तिच्या ओठांचा हलका स्पर्श झाला, काही कळायच्या आधीच ती दरवाज्याकडे पळाली.
तो तसाच उभा होता.
वीर, तिने आवाज दिला.
तू आजकल खूप बदमाश झालीस.
मी बदमाश , तुला पाहिजे तर होत. ना.मग सरळ सांगायचं
*****
सुरुवातीला काही महिने तिने एका बुटीक मध्ये काम केलं.
नंतर तिने स्वतःच बुटीक सुरू केलं अर्थात विरेन होतच सोबत.आणि त्याचबरोबर टेलिरिंग क्लासेस पण सुरू केले.
एक दिवस सगळ्याना दोघांनीही त्यांच्या मनातलं सांगितलं. सर्वना खूप आनंद झाला.
***********
समाप्त
--- मधुरा महेश.
(कथा कशी वाटली नक्की सांगा)
Thank u ...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा