दिशा स्वप्नांची...भाग 1
स्पर्धा : भाग 1
(कथामालिका)
(सदर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. )
" रेखा , आवरलंस का सगळ नीट बॅग भरलीस ना ,"घरात पाय ठेवताच अजयने प्रश्न केला.
"हो, सगळं नीट घेतलंय. निघायचं का. "रेखाने हळूच विचारले.
"हो, मुल कुठे आहेत."
"मूल समोरच्या घरात निरोप घायला गेलेत."
बरं, म्हणत अजयने एक उसासा सोडला.
" अहो, काय झालं. आता ठरलंय ना सगळं, मग कसला एव्हढा विचार करता."-- रेखा
"काही नाही ग. असंच आपलं जर विचार करत होतो ,होईल ना सगळं नीट ,काय ठरवलं होतं आणि काय झालं. "--अजय
"नका काळजी करू".रेखाने डोळयांनीच त्याला आश्वस्त केले.
तेव्हाच मूल घरात आली.
"बाबा आपण कधी जायचं गावाला आणि परत कधी यायचं." छोट्या रजनीने निरागसपणे अजयला विचारले
अजय निघण्याची तयारी करत होता.
मुलांनो, इकडे या आता आपण गावाला जात आहोत. आणि आपण गावीच राहणार आहोत.
"पण , माझी शाळा आहे ना थोड्या दिवसांनी तूच बोलली होतीस."अमर थोडासा नाराज होत बोलला.
"हो, पण आता गावाला शाळेत जायचं" .रेखाने त्याला समजावलं.
________
अजय सात वर्षापूर्वी कोकणातल्या एका गावातून मुंबईला आला होता . दोन महिन्यापूर्वीच त्याच लग्न झालं होतं. बायकोला त्याने गावीच ठेवले होते.
सुरेश त्याचा जिवाभावाचा मित्राच्या ओळखीने त्याला मुंबईत एका कारखान्यात नोकरी लागली. सुरेश एका बँकेत नोकरीला होता. सुरेशच पण लग्न झालं होत. त्याला एक वर्षाचा मुलगा विरेन आणि बायको नंदा गावि राहत होते.
दोघांनी एक छोटीशी खोली भाड्याने घेतली होती.पण त्यांना विश्वास होता की लवकरच ते त्यांच्या कुटुंबासोबत स्वतःच्या घरात राहतील. दोघांचे त्या दृष्टीने प्रयत्न चालू होते. वर्षभरात च त्यांनी एका चाळी मध्ये सामोरा समोर अशी दोन घर विकत घेतली .
आणि दोघंही बायकांना मुंबईला घेऊन आले. बघताबघता 6 वर्ष सरली. त्या दरम्यान रेखा आणि अजयला 2 मुल झाली तर सुरेश आणि नंदा ला एक मुलगी (शारदा)झाली. सगळं नीट चालु होत. दोघांची चार मूल आपसात खूप छान रमली होति. लवकरच त्यांची शाळा सुरू होणार होती.
-------
आणि अचानक एक दिवस अजयच जिथे काम काम करत होता, तो कारखाना मालकाने विकला .कारखान्यात एक नवीन मालक आला होता. ज्याला काम करण्यासाठी नविन लोक हवे होते. नाविन मालकाने काही लोकांना कामावरून कमी केले. पण जाता जाता त्यांनी कमी केलेल्या लोकांना सहा महिन्यांचा पूर्ण पगार दिला होता त्यात अजय पण होता. .
______
अजयने विचार केला . आता एकदम एव्हढे पैसे आहेत तर काहीतरी उद्योग करता येईल. त्याने गावी जाण्याचं ठरवलं. सुरेशने त्याला खूप समजावले.
अजय, मुलं अजून लहान आहेत. त्यांचं शिक्षण बाकी आहे. तुला इथे दुसरी नोकरी मिळेल. गावाला जाऊन काय करणार. आत्ता थोडं थांब.
सूरेश, मला तुझी काळजी कळतेय. मी काय तुझ्या सारखा जास्त शिकलेलो नाही. लगेच काम भेटेल. गावी माझी आई आणि बाबा दोघंच राहतात. आमची शेती आहे. आणि आता पैसे भेटलेत. तर -- अजय
तर काय? करणार.-- सुरेश
अरे ऐकून तर घे आधी. लहानपणी च स्वप्न पूर्ण करणार. आठवत का आठवीत असताना शाळेत बाईंनी विचारलं होत, तुम्ही मोठेपणी कोण होणार तेच आता मी होणार.
बास माझं ठरलं. -- अजय
काय , तुझ्या डोक्यातलं वेड अजुन आहे का. ठीक आहे.
तुझं ठरलंय मग मी काय बोलू. कर तुझ्या मनासारखं. काही मदत लागली तर सांग. -- सुरेश
अजय ने शहरातलं घर एक कुटुंबाला भाड्याने दिले. सुरेशच्या ओळखीतले मद्रासी कुटुंब होत.
दर महिना घरभाडे सुरेश घेणार होता, आणि अजय च्या बँक खात्यात जमा करणार. असे ठरले
------------
अजय आणि रेखा मुलांबरोबर कायमचे गावाला निघून आले. अजयचे आई बाबा खूप खुश झाले . तसही त्यांना त्याच शहरात जाण आवडल नव्हत. त्यांना खूप आधार वाटला.
दोन दिवस असेच गेले. शेवटी एक दिवस अजयने बाबांशी बोलायचे ठरवले. सकाळची वेळ होती. बाबा अंगणात बसले होते. अमर आणि रजनी दोघांना कोवळ्या उन्हात बसवले होते.
बाबा , जरा बोलायचे होते.
बोल की, मला माहितेय काहीतरी बोलचय तुला, काही पाहिजे का
हो, पाहिजे होत.
काय,देऊ सांग सगळं तुझं तर आहे.
बाबा मला तुमचं मत हवंय माझ्याकडे थोडे पैसे आहेत . तर मी रिक्षा घायचा विचार करत होतो. काहीतरी काम तर करायला पाहिजे ना. तूम्हाला शेतात मदत करेनच, पण मुलं लहान आहेत त्यांच्या भविष्याचा विचार करायला हवा. आणि पैसे आहेत.
तुझ्या बायकोला सांगितलंस,
नाही
माझ्या बायकोला सांगितलंस
नाही
तु तुझ्या बायकोला बोलव, मी माझ्या बायकोला बोलावतो.
बाबा , पण त्यांना कशाला
एव्हढा मोठा निर्णय सगळ्यांनी मिळून घायचा असतो.
दोघींनाही अजयचा विचार आवडला.
कंपनीकडून मिळालेल्या पैशातून त्याने एक रिक्षा घेतली.
मुल गावाच्या शाळेत जायला लागली.
अजयचंही रिक्षा ड्रायवर च काम चालू झाला होत.
रेखा पण गावी रमली होती.
---
क्रमशः
मधुरा महेश.
( भाग कसा वाटला अवश्य सांगा)
Thank u ira
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा