Login

दिशा स्वप्नांची..... भाग 4

I like to read

स्पर्धा
दिशा स्वप्नांची..... भाग 4
(कथामालिका)
(सादर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. )
      

     सगळेजण खूप खुश होते. सर्वात जास्त नंदा आणि रेखा आनंदी होत्या. दोघींची खूप वर्षाची इच्छा पूर्ण होणार होती. दोघींचे चेहरे उजळले होते.
लवकर उठल्यामुळे सगळेजण शांत बसले होते. गाडीने वेग धरला होता.सकाळी 10 वाजता त्यांची गाडी कोल्हापूरमध्ये दाखल झाली.
"काका, इकडून डावीकडे घ्या, तिथे एक हॉटेल आहे.तिथे आपल्या राहण्याची सोय होईल". विरेन
"तुला कसे रे माहीत ".अजय
"काका, मी गेल्यावर्षी मित्रांबरोबर तिरुपती ला ट्रीपला गेलो होतो, तेव्हा कोल्हापूर ला पण आलो होतो. तेव्हा आम्ही याच हॉटेल मध्ये आलो होतो. बाबांनी सांगितलं तेव्हा मी आधीच इकडे फोन करून दोन रूम बुक केल्या आहेत.  ते बघा समोरच कृपालक्ष्मी.."
"बर झालं."
सगळे जण खाली उतरले. विरेन च्य मागून सगळे हॉटेलमध्ये गेले.   एका रुम मध्ये सगळे पुरुष आणि एक रूम मध्ये सगळ्या बायका.
" चला आता थोडा आराम करू चहा नाश्ता रूम मध्येच येईल. आवरून झालं कि देवीच दर्शन करू." सुरेश
"नाही, चहा  वैगरे काही नको आम्हाला, तुम्ही घ्या. आधी आम्ही आमच्या देवीला भेटणार." रेखा
'बरोबर बोलतेय रेखा, आधी दर्शन देवीच.नंतर आमचं खाणंपिणं होईल." नंदा
"आई, अस अजिबात चालणार नाही. काही खाऊ नका ठीक आहे. एक कप चहा तर पिऊ शकता. मंदिरात रांग असेल. तुम्हाला उभं राहावं लागेल किती वेळ सांगता येत नाही.हट्ट नको करुस.तुम्ही तुमच्या रूम मध्ये जा  पटकन आवरून घ्या.  शारु आई आणि काकूंना चहा  तरी प्यायला लाव". विरेन
"हो, दादा.  मी आहे." शारदा
*********
"तास होऊन गेला, काय करत आहेत. अजय जरा फोन लाव तुझ्या बायकोला कधी येणार आहेत मंदिरात आजच जायचं आहे.  अमर जा बघून ये. "सगळे  बायकांची वाट पाहत उभे होते.

अमर बोलवायला निघत होता. की त्याला आई आणि आजी येताना दिसल्या. मागून शारदा आणि नन्दा हळु हळूहळू चालत होत्या. आणि सर्वात शेवटी रजनी पर्स पकडत एक हाताने केसांचा आंबडा नीट करत येत होती.
त्यांना बघून  सगळे जण बघतच बसले. पाचही जणी पारंपरिक वेषात होत्या.  नऊवारी साडी.आजीने जांभळ्या रंगाची, रेखाने गुलाबी, नन्दाने लाल, शारदाने पिवळ्या तर रजनी हिरव्या रंगाची साडी नेसली होती.
"हे कधी ठरलं. " अजय
"कधीच ठरलं.जेव्हा जायचं पक्क झालं ना तेव्हाच आमचं बोलणं झालं. दर्शनाला जाताना नऊवारी साडी
नेसायची".  रेखा
बाबा ,कशी दिसते.  रजनी अजय समोर जाऊन उभी राहिली.
सुंदर.  खूप सुंदर.... विरेन तिला बघता बघता बोलून गेला.
काय?शारदा
म्हणजे तुम्ही सगळ्याच सुंदर दिसत आहात.  चला आता उशीर होईल. विरेन
-----
देवीची ओटीच समान घ्यायला एका दुकानात उभ्या होत्या.
"काकी,  देवीची ओटी भरायची अशी 3 ताट द्या".
आणि फुल ,गजरा , हळद कुंकू  अशी 2 ताट द्या."रेखा
प्रत्येकीने  आपली आपली ताट घेतली आणि रांगेत उभ्या राहिल्या.
स्त्रियांची आणि पुरुषांची वेगळीवेगळी रांग होती.
पुढे आजी त्या नंतर  शारदा मग रेखा मग रजनी आणि मग नंदा अश्या उभ्या होत्या. बाजूच्या रांगेत सर्वात पुढे आजोबा मग अजय मग अमर  मग सुरेश आणि शेवटी विरेन उभा होता.
राजनीवरून त्याची नजर हटतच नव्हती. रजनी मात्र स्वतःच्या विचारात होती.
सर्वांनी डोळेभरून देवीचं दर्शन घेतलं. नंदा आणि रेखा खूपच आनंदी झाल्या होत्या. कित्ती वर्ष त्यांनी ह्या दिवसाची वाट पाहिली होती. दोघीही जणी  देवीचं रूप डोळ्यांत साठवतच पुढे होत होत्या.  
रजनी अगदी मनोभावे देवीला हात जोडून प्रार्थना करत होती. आणि तेव्हाच विरेन बाजूला येऊन उभा राहिला. त्याने एकदा तिच्याकडे पाहिले आणि मग देवीला  नमस्कार केला.
"बाकीच्या लोकांना पण दर्शन घ्यायचं आहे. चल पुढे हो."  विरेन तिच्या कानात हळूच बोलला
सगळेजण बाहेर आले.

अचानक रजनीचा तोल जाणार तोच विरेन ने तिला सावरलं.  आणि बाजूच्या बाकावर बसवलं. त्याने खिशातून रुमाल काढून तिचा चेहरा पुसला.
नन्दाने तिला पाणी दिले
"काय ग  काय होतंय."नंदा
"सकाळपासून काही खाल्ले नसेल.म्हणून झालं असेल विशेष काही नाही. नेहमीच आहे. सकाळची पूजा झाल्याशिवाय  काही खात पीत नाहीत आमच्या देवीभक्त. " अमर
"काय" विरेन जोरात ओरडला.  वेडी आहेस का .
"दादा तिने चहा काय पाणी पण नाही पीलय, सकाळपासून."शारदा
"बरं वाटतंय  का.आता .चला मग जेवायला जाऊया."नन्दाने पटकन विषय बदलला.
तिला माहीत होते. विरेन ला उपाशी राहिलेलं, खाण्यापिण्याच्या बाबतीत हलगर्जीपणा अजिबात सहन होत नाही. तो शारदा लाही नेहमीच अभ्यास ठेव थोडा वेळ बाजूला  वेळेवर खात जा म्हणून बजावत असे.

सगळेजण जेवायला बसले.  हसत  बोलत जेवण आवरले.
"बाबा, आता काय करायचं." रजनी
"आता थोडा आराम करू. मग संध्याकाळी  कोल्हापूर फिरुया. विरेन आहे की आपल्याला दाखवायला''.अजय
"हो, नक्कीच काका. संध्याकाळी 5 वाजता तयार राहा."

---
संध्याकाळी  कोल्हापूरमध्येच फिरायचं ठरल.  तरी निघेपर्यंत 6 वाजले. हसत बोलत सगळे रंकाळा तलाव  कडे निघाले.
नंदा रेखा आणि आजीची एक टीम ., आजोबा,अजय,सुरेशचे एक टीम,आणि  चारही मुलांची विरेन, अमर,रजनी, शारदा एक टीम. 
वाह, कित्ती छान वाटतंय, " शारदा
"हो ना, मस्तच   आई तिकडे गार्डन आहे चल जाऊया."
"कुठे निघालात, थांबा आपल्याला बोटिंग करायचंय. सगळे तिकडे वाट बघत आहेत" .अमर
" तुम्ही जा सर्व, मी थांबते इथेच."रजनी
"का ?तू का नाही येणार." नंदा
"काकू, ती बोटीत बसायला घाबरते.  तिला वाटत आतमध्ये पाणी शिरलं आणि ती बुडून जाईल".अमर
"काकू, अस काही नाहीये. तुम्ही जा."
"ठीक आहे, पण तू इथेच थांब.  जाऊ ना नक्की  आणि हा माझा फोन ठेव तुझ्याकडे ".रेखा
रजनी कुठे आहे? सुरेश
ती नाही आली. "
काय झालं, बरी आहे ना. म्हणजे का नाही येतेय."
"अरे, काळजीच काही कारण नाहीये. तिला बोटीत बसायची भीती वाटते. '
"का पण अस."विरेन
"हो ना पाहिले तर तिला खूप आवड होती."
"अग तिने तो पिक्चर बघितला ना, टायटॅनिक तेव्हापासून तिला वाटत तिची बोट अशी बुडली तर."
काहीही, तुम्ही थांबा इथेच मी  तिला  घेऊन येतो. म्हणत विरेन धावतच राजनिकडे गेला.
रजनी तिथेच उभी होती.
त्याने तिला आवाज दिला.  पण तीच लक्ष नव्हतं.
रजनी, बरी आहेस ना.चल लवकर. सगळे वाट बघत आहेत .
" नको. तुम्ही जा .मी बरी आहे. मला नाही यायचंय. "
"काही होत नाही. आम्ही सगळे आहोत ना."
नको .तुम्ही जा."
"मला काही माहीत नाही."म्हणत विरेन तिचा हात पकडून जायला लागला.
"अहो, विरेन  हात सोडा .  लोक बघत आहेत."
मी माझ्या मैत्रिणीचा हात नाही पकडू शकत का"
मैत्रिण कधीपासून. आल्यापासून नुसतं मला बघून हसत आहात.जोकर आहे का मी. मी नाही येणार.तुम्ही जा."
"हे सगळं आपण नंतर बोलू. मी आता तुला  हसणार नाही ठीक आहे. चल. तुला जर भीती वाटली तर तू माझ्याकडे बघ. Ok."विरेन
"Hmmm."रजनी
सगळे बोट मध्ये बसले. 
"तुला एक विचारू".विरेन
हा, बोला ना. "रजनी
तू मला अहो  विरेन का बोलतेस.विरेन
ते तुम्ही माझ्यापेक्षा  मोठे आहात ना. रजनी
"इतका पण मोठा नाहीये." विरेन
"मी पण इतकीही लहान नाहीये".रजनी
"Ok, सॉरी, अजून एकदा सॉरी".  विरेन
"कशाबद्दल."रजनी
"ते मी काल सकाळी तुला पाहून हसलो तुला आवडलं नाही."विरेन
"ठीक आहे."रजनी
Friends" विरेन ने हात पुढे केला.
"Only freinds."म्हणत रजनी ने हात मिळवला.
"ह्या नवीन  मैत्री वर विश्वास असेल तर आता जरा बाजूला बघ. " तिचा हात तसाच पकडून ठेवला होता.
"वाह.  कित्ती छान . Thank u friend".रजनी
त्याने हळूच तिचा हात सोडला.

सगळेजण  बोटीतून बाहेर आले.  आणि गार्डनमध्ये जाऊन बसले.
दादा मला भेळ खायचीय".शारदा
"ठीक आहे. सर्वांसाठीच आणतो ".विरेन
"मी पण येतो. "अमर
अमर आणि अजय भेळ आणायला गेले.
" थँक्स विरेन. तुझ्यामुळे रजनीच्या मनातली भीती थोडीतरी कमी झाली."अमर
"थँक्स काय त्यात.  ह्या मुली ना काहीतरी  टी व्ही मध्ये बघतात. आणि तेच डोक्यात ठेवतात.तसंही आता मैत्रीण आहे ती माझी." विरेन
"बापरे, मैत्रीण काही खरं नाही आता तुझ."अमर
सर्वांनी  गप्पा , मस्करी करत भेळ  खाल्ली.नंतर आईस्क्रीम खाल्लं.
फिरत फिरत  दुकानातून काही काही खरेदी करत हॉटेल वर पोचले.
थोड्यावेळाने आवरून सर्व रेस्टॉरंट मध्ये आले.तस तर कोणालाही जास्त भूक नव्हती. पण आजी म्हणाली ,थोडस खाऊन घ्या. नाहीतर रात्री झोप येणार नाही.
थोडस खाऊन सर्व जण रूम मध्ये झोपायला गेले.
दुसऱ्या दिवशी त्यांना पन्हाळा गड फिरायला जायचं होतं.
---
क्रमशः
--मधुरा महेश
(आजचा भाग कसा वाटला नक्की सांगा. )


















 


 



 

0

🎭 Series Post

View all