Login

दिशा स्वप्नांची.... भाग 6

I like to read.


  स्पर्धा
  कथामालिका
दिशा स्वप्नांची... भाग 6
(सादर कथा पूर्णपणे काल्पनिक आहे.)

दुसऱ्या दिवशी सकाळी विरेन सात वाजता अंगणात रजनीची वाट बघत होता.
"वेळेचं महत्व कधी कळणार काय माहीत."
"कोणाशी बोलत आहात".रजनी ने मागून येत त्याला विचारले .
तो तिला बघतच राहिला.तिने पिवळ्या रंगाचा अनारकली ड्रेस घातला होता.   केसांची लांब वेणी घातली होती त्यावर मोगऱ्याचा गजरा .कपाळlवर छोटीशी चंद्रकोर टिकली, हलकीशी गुलाबी लिपस्टिक, कानात मोठे झुमके नाचत होते .भान हरपून तिला पाहत होता.
तिने त्याच्या डोळ्यासमोर चुटकी वाजवली .
तसा तो पटकन भानावर आला. "काही बोललीस का?"
"हो , निघुया का? "तिच्या हातात एक पिशवी होती.
"हा चल ,पिशवीत काय आहे. "
"ते मंदिरात जात आहोत ना तर प्रसादाचा शिरा बनवला आहे.'
"कित्ती भारी दिसतोय हा,ब्लॅक जीन्स आणि रेड  टी शर्ट . हवेने उडणारे हे सिल्की केस.
चालत चालत दोघे हि एकमेकांचा विचार करत होते
"किती लाम्ब आहे".  विरेन
"ते बघा समोरच".रजनी
"Ok, सकाळी कित्ती छान वाटतंय ना. ही पक्ष्यांची किलबिल, सूर्योदय,थंड वारा अशी  सकाळ पहिल्यांदाच पाहतोय".विरेन
"हो, खूप प्रसन्न वाटतं.म्हणूनच मी सकाळीच येते. "रजनी
"Hmmm.थँक्स.तुझ्यामुळे मला हे पाहायला मिळालं".विरेन
"युअर वेलकम." रजनी
बोलत बोलत मंदिराजवळ आले.
रजनीने  प्रसादाचा डबा पुजारीकाकांच्या हातात दिला.
दोघही देवाचं दर्शन घेऊन बाहेर आले.
थोडं थांबुया का इथे
हो, थांबुया. इकडे बसूया. म्हणत ती तिथल्याच एका कट्ट्यावर बसली.
तो पण तिच्या बाजूला बसला.
तिने त्याच्या हातात एक छोटासा डब्बा दिला.
हे घ्या ,खा. भूक लागली असेल ना.
हिला कस कळलं असा विचार करत त्याने डब्बा उघडला. आणि शिरा खाऊ लागला. तिनेही थोडासा शिरा खाल्ला.
एक विचारू. रजनी
हो, विचार ना.
'मी कशी दिसतेय. म्हणजे आई बोलली चांगली दिसतेय.  पण आई काय नेहमीच छान दिसते बोलते. दादा आणि बाबा झोपले आहेत ना ते खर सांगतात. दादा तर सारख सांगत असतो. असे केस बांध, अशी ओढणी घे.  मग तुम्हाला विचारलं.ड्रेस ठीक आहे ना."
"Ok. खूप छान दिसतेस. एकदम राजकुमारी . आणि ड्रेस तर खूपच सुंदर . हा रंग तुला खूप  खुलून दिसतो.
"थँक्स. हा ड्रेस मीच शिवलाय. "
"अरे वाह, तुला ड्रेस शिवता येतात."
"हो, ड्रेस, स्कर्ट,ब्लाऊज येत मला. माझ्या आईकडून शिकतेय मी लहानपणापासून.आणि मला कपडे शिवायला खूप आवडतं."
"मग काय टेलरिंग च दुकान सुरू करायचं का."विरेन
"हो, ती अगदी निरागसपणे बोलून गेली
"पण दादा नको बोलतो , माझ ठरलं होतं. आता टेलरिंगचा कोर्स करणार होते मी 10चा रिझल्ट लागल्यावर. नंतर  फॅशन डिझाईनिंग  शिकायचंय होत.
पण दादा खूप ओरडला.'
'का पण तुला जर आवड असेल तर शिक "
दादा बोलतो,की तू अभ्यासात हुशार आहेस 12 वि तरी पूर्ण कर.
"हो, तू अभ्यासात हुशार आहेस. मला वाटत तू ग्रॅज्युएशन तरी करावंसं. आणी त्याच्याबरोबर हे पण शिक. तु पण खुश तुझा दादा पण खुश."विरेन
"हा  मस्त आयडिया आहे. "रजनी
"आता मी तुला एक विचारू
"हा विचारा की"
"तू मला अहो विरेन का बोलतेस."
"ते तुम्ही मोठे आहेत ना"
"काय सारख मोठे आहात ना फक्त 5 वर्षानी मोठा आहे.आणि तसही आता आपण फ्रेंड्स आहोत तर मला विरेन म्हंटलस तर जास्त आवडेल.
"बर ठीक आहे.पण आई ओरडली तर."
"आई का ओरडेल."
"तिनेच सांगितलंय ना, आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या लोकांना अहो जाओ करायचं. "
"मग  लोकांना कर ना. मी लोक आहे.
"Ok  विरेन. ठीक आहे"
"ठीक आहे"
"तू काय करणार आहेस कॉलेज झाल्यावर"
"M.B.A.  करायचंय. त्यासाठी पुण्याला जाणार आहे.
"अरे वाह छान आहे."
अशाच गप्पा रंगल्या होत्या. तितक्यात आईचा फोन आला.
"Hello, विरेन अरे घरी यायचंय की नाही. अकरा वाजले.
हो, आई निघतच आहोत. येतो पटकन.
"रजनी चल लवकर.  किती वाजलेत बघ,वेळ कसा गेला कळलंच नाही."
"बापरे,अकरा  विरेन चल घरी जाऊ.
  दोघेही घरी आले.   अंगणात खूप सुंदर रांगोळी काढली होती.
दोघही एकत्रच घरात गेले. आणि एकदम वरून गुलाबाच्या पाकळ्या त्यांच्या अंगावर पडल्या. आणि घरातले सगळेजण एकसुरात ओरडले, हॅपी बर्थडे रजनी....
आणि त्याच्या लक्षात आले, सकाळपासून आपण हिला बर्थडे  विश पण नाही केलं. आता ति सगळयांच्यामध्येच उभी होती.
दुपारची जेवण झाली .संध्याकाळच्या बर्थडे पार्टीची तयारी सुरू झाली. 
अमर त्याच्या मित्राची बाईक घेऊन केक आणायला गेला.
सगळी घरातलीच माणस होती.  भिंतीवर happy बर्थडे च पोस्टर  लावलं होत.
हॉल मध्ये टेबलवर केक ठेवला होता. बाजूने 15 मेणबत्त्या लावल्या होत्या..
रजनी हळूहळू ड्रेस सांभाळत टेबलजवळ आली.  तिने व्हाईट कलरचा लॉंग वन पीस घातला होता.  गळ्यात डायमंड नेकलेस, हातात  व्हाइट बांगड्या , कानात डायमंडचे टॉप्स आणि कपाळावर एक  डायमंड टिकली. एखाद्या परिसारखी दिसत होती.
तो तिला नेहमीसारखं बघतच होता .टाळ्यांचा आवाज झाला तसा तंद्रीतून बाहेर आला.
रजनी केक कापत होती .तिने सर्वाना केक भरवला.
आणि एक छोटासा केक चा पीस घेऊन ती त्याच्याकडे आली.
"Now, u can wish me "रजनी
Oh, सॉरी मी  ते विसरूनच गेलो.  हॅप्पी बर्थडे .
"थँक्स.."
"रजनी, इकडे ये गिफ्ट नको का." Rekha
नंदा ने तिला पूर्ण घुंघुर वाले पैंजण दिले. तिला खूप आवडले  .लगेच घातले. शारदाने तिच्यासाठी सुंदर ग्रीटिंग आणलं होत.
अजयने नेहमीप्रमाणे तिला  पैसे दिले.
आजी आणि आजोबानि पण तिला पैशाच पाकीट दिल.
अमरने तिला न्यू स्मार्टफोन दिला.
"वाह दादा, थँक्स "
"अग, आता तू कॉलेज ला जाशील म्हणून. काय  जाणार आहेस ना."
" हो, दादा जाईन."
"तुम्ही सर्वानी गिफ्ट दिलेत . मी तर काहीच नाही आणलं."
"इट्स ok."रजनी
नाच गाणी करत बर्थडे साजरा झाला.
********
जेवण झाल्यावर सगळे अंगणात गप्पा मारत बसले.
"उद्या सकाळची गाडी आहे.   गप्पा पुरे आता.चला  लवकर झोपायला पाहिजे".  नन्दा
सगळे घरात आले .विरेन पण आत जातच होता, त्याने रजनीला रिक्षात बसलेले पाहिले.
"तू इथे काय करतेस.  दमली असशील. चल झोप आता."
"हा माझ्या आयुष्यातला सर्वात बेस्ट बर्थडे  आहे."रजनी
"आहे? बर्थडे  झाला. दिवस संपायला आला."विरेन
" हो,  पण दिवस अजून पूर्ण संपला नाहीये. आणि माझं  एक गिफ्ट पेंडिंग आहे ना."रजनी
"सॉरी, मला खरच माहीत नव्हतं. नाहीतर मी पण काहीतरी आणलं असत. तुला काय हवंय सांग  मी तिकडून तुला पाठवून देईन.'विरेन
"पण मला आताच पाहीजे. जे तू मला देऊ शकतो.
अस काय आहे."विरेन
"माझ्यासाठी एक गाणं म्हण  ना. मला शारदा ताईने सांगितलंय,तू गाणं शिकला आहेस. तुला गिटार पण वाजवता येते.
हो, पण त्याला 3 वर्ष होऊन गेली. विसरून गेलोय  गाणं .गिटार वाजवतो ती नेमकी नाही आणली.आता मी पूर्ण लक्ष अभ्यासावर ठेवलंय."
"अस थोडीच असत.मी ऐकलय तुला गुणगुणताना , आज माझा वाढदिवस आहे .प्लिज"
"Ok, रडू नकोस. म्हणतो .कुठलं म्हणू."
"कुठलंही. एक कडवं म्हंटल तरी चालेल."

विरेन ने गाणं सुरू केलं....
(कहो ना प्यार है मधलं गाणं आहे)
चांद, सीतारे,फुल और खुशबू
ये तो सारे पुराने है
ताजा ताजा कली खिली है
हम उसके दिवाने है।
हम्मम हम्मम हहहमम्म्मम्म
काली घटाये,बरखा सावन
ये तो सब अफसाने है
ताजा ताजा कली खिली है
हम उसके दिवाने है।
   "मॅम, आता खुश का ."विरेन
"हो, थँक्स."रजनी
गुड night.  जा आता झोप."विरेन
"Good night"रजनी
******
ते चौघे ही परत त्यांच्या घरी मुंबईला निघाले होते .घरातले सगळे त्याना सोडायला गावच्या वेशीपाशी आले होते.
गाडी वेळेत आली होती,चौघपण जागेवर जाऊन बसले .
दादा, जरा खाली जा ना माझी आवळा सुपारीची  पुडी रजनी च्या हातातच राहिली. शारदा
ठीक आहे
रजनी, तूझ्याकडे  आवळा सुपारी आहे ना  शारदाची दे पटकन गाडी सुरू होईल.
हे घे, तिने पुडी त्याच्या हातात ठेवली.
विरेन जरा खाली वाक ना ,तुला काहीतरी सांगायचंय
हा बोल म्हणत तो थोडासा झुकला
ती त्याच्या कानात हळूच बोलली,  I love you आणि पटकन मागे झाली.
2 सेकंद त्याला काही  कळलच नाही, तो काही बोलणार तर शारदा हाक मारत होती, गाडी सुरू झाली होती.
तो पळतच त्याच्या जागेवर जाऊन बसला.
रजनी, सेम टू यु खिडकीतूनच जोरात ओरडला.
*********

क्रमशः
मधुरा महेश
( कथेचा भाग कसा वाटला नक्की सांगा)
Thank  you.









 

0

🎭 Series Post

View all