Login

दुःख

दुःखावरील कविता

जीवनी दुःख आले की
देऊ नये नियतीला दोष
बसू नये कवटाळून
जीवनी दुःखाचे कोष

नवी आशा मनी बागळू
लवकर पडू त्यातून बाहेर
मिळेल आयुष्यात
पुन्हा सुखांचा आहेर

आयुष्यात कधीतरी
द्यावा दुःखालाही स्थान
दुःख नंतर येतच असते
सुखांचे आनंदी पान

दुःखाशिवाय सुखाची
कळतं नसते किंमत
दुःखच देते जीवनात
लढायला हिम्मत