भिलवाडी नावाचे गाव होते. गाव चारही बाजूंनी डोंगररांगांनी वेढलेले होते. सकाळच्या उगवणाऱ्या पहिल्या किरणांनी डोंगरांची शिखरा अगदी उजळून निघायची आणि पायथ्याशी पसरलेलं हिरवं गाव जणू मुकस्मित करायचं.
" तुमचं गाव तर अगदी स्वर्गासारखे आहे. दुरून दिसणारे हे भव्य डोंगर किती सुंदर आहेत. " येणारे जाणारे गावाकडे बघून नेहमी म्हणायचे. पण भिलवाडीमध्ये राहणाऱ्यांना त्या डोंगरांमध्ये सौंदर्यापेक्षा अडथळेच दिसायचे रस्ते नाहीत, पाऊस आला की वाटांचे पाण्यावरचे पूल वाहून जात, आणि सर्वात मोठी गोष्ट गावापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेली शाळा.
त्या गावात एक मुलगा होता आदित्य. नावाप्रमाणेच तेजस्वी आणि हुशार. वर्गात, खेळात, वागणुकीत सगळीकडे हुशार. पण त्याच्या घरची परिस्थिती गरीब. वडील रानमजूर, आई घरकाम करणारी. रोज सकाळी आदित्य शाळेला जायचा तेव्हा कधी गुडघापर्यंत चिखल, कधी दगडांची विळखं, कधी पावसात रस्तेच बुडून गेलेले. अनेक मुलं मधेच शिक्षण सोडून कामावर गेली होती. कुणाला शाळेचा त्रास, कुणाला घरची जबाबदारी.
पण आदित्यचं स्वप्न वेगळं होतं. त्याला वाटायचं
“मी डॉक्टर होणार. गावामध्ये एकही हॉस्पिटल नाही. "
त्याची आजची गेल्या वर्षभरापासून आजारी होती परंतु योग्य उपचार आणि औषध न मिळत असल्यामुळे तिचा दुखणं दिवसान दिवस वाढत होतं. त्याला आपल्या आजीला पाहून खूपच वाईट वाटत असे. आपल्याला आपल्या आजीसाठी काहीतरी करायचं आहे आपल्या गावासाठी काहीतरी करायचं आहे असे स्वप्न त्याच्या डोळ्यात होते आणि ते स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द त्याच्या मनात.
एके दिवशी सकाळी आकाश काळं ढगाळलं होतं. पाऊस कोसळणार असे चिन्ह दिसून येत होते.
" बाळा, आज शाळेत जाऊ नकोस. पाऊस सुरू झाला की रस्ता बंद होईल. " त्याची आई बाहेर वातावरण पाहत म्हणाली.
" आई रस्ता बंद होईल या विचारात जर रोज थांबत राहिलो तर मग मी कसा पुढे जाईल ? " आदित्यने पुस्तक आपल्या हातात घेतली आणि हसून आईकडे पाहत म्हणाला.
त्याची आई तरीही त्याला थांबवणार होती पण त्याच्या नजरेतला हट्ट तिने पाहिला होता.
“ठीक आहे. पण सांभाळून जा. पाय घसरू देऊ नकोस.”
शाळेमध्ये एक शिक्षिका होती. तिने आपल शिक्षण शहरात राहून पूर्ण केले होते आणि नवीनच त्या गावांमध्ये असलेल्या शाळेत शिकवणी घेण्यासाठी आली होती. स्मिता मॅडम. शहरातून आलेली, नव्या विचारांची, आणि मुलांना प्रोत्साहन देणारी. तिच्या बोलण्याने, शिकवण्याने मुलांमध्ये नवे स्वप्न उभे राहिले होते. एके दिवशी तिने सर्व मुलांना प्रश्न केला
“तुमच्या आयुष्यातलं सर्वात मोठं स्वप्न कोणतं?”
कुणी म्हणालं पोलिस, कुणी म्हणालं शिक्षक, कुणी म्हणालं गाडीचालक. असे एक एक करत सगळे विद्यार्थी त्यांना काय बनायचे आहे ते सांगत होते. जेव्हा आदित्यची वेळ आली तेव्हा
आदित्य उठून म्हणाला,
“माझ्या गावात दवाखाना नाही, डॉक्टर नाही. मला डॉक्टर व्हायचंय.”
आदित्य उठून म्हणाला,
“माझ्या गावात दवाखाना नाही, डॉक्टर नाही. मला डॉक्टर व्हायचंय.”
त्याचे स्वप्न ऐकून मॅडमचे डोळे पाणवले. एवढ्या छोट्याशा वयात एवढा मोठ स्वप्न !
दिवसांमागून दिवस जात होते. हळूहळू आदित्य त्याचे शिक्षण पूर्ण करत दहावी मध्ये गेला. मार्ग कठीण, पण मनामध्ये जिद्द अजून ही तशीच होती. त्याच्या दहावीच्या शेवटच्या परीक्षेला एक महिना शिल्लक असताना मध्येच त्याचे वडील आजारी पडले त्यामुळे घरात येणारा पैसा बंद झाला. त्याची आई दिवसभर घरकाम करून दमून जात होती. आदित्य स्वतः शाळेतून घरी आल्यावर शेतात जाऊन काम करत होता. शेतात पूर्ण दिवस काम केल्यामुळे थकवा अंगदुखी होत असली तरी त्याची हिंमत मात्र तुटत नव्हती.
To be continued...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा