Login

दुरून डोंगर साजरे... भाग २

दुरून डोंगर साजरे वाटतात पण स्वप्न मात्र त्या डोंगरापलीकडे असतात. जे चढतात, तेच जग बदलतात.
दिवसांमागून दिवस जात होते. हळूहळू आदित्य त्याचे शिक्षण पूर्ण करत दहावी मध्ये गेला. मार्ग कठीण, पण मनामध्ये जिद्द अजून ही तशीच होती. त्याच्या दहावीच्या शेवटच्या परीक्षेला एक महिना शिल्लक असताना मध्येच त्याचे वडील आजारी पडले त्यामुळे घरात येणारा पैसा बंद झाला. त्याची आई दिवसभर  घरकाम करून दमून जात होती. आदित्य स्वतः शाळेतून घरी आल्यावर शेतात जाऊन काम करत होता. शेतात पूर्ण दिवस काम केल्यामुळे थकवा अंगदुखी होत असली तरी त्याची हिंमत मात्र तुटत नव्हती.


आत्ता पुढें,


दिवसभर शेतात काम करत असल्यामुळे त्याला रात्रीच अभ्यास करण्यासाठी वेळ मिळत होता आणि तोही रात्री लक्षपूर्वक अभ्यास करत होता. बाहेर अंधार आणि घराच्या आत दिव्याचा पिवळसर मंद असा प्रकाश. त्यात घरात वडिलांचा सततचा खोकला.
" झोप बाळा, रोज असे रात्रीचे जागरण करून तुला त्रास नाही होणार का ? " आई त्याच्या वडिलांकडे लक्ष देण्यासाठी उठली होती ती आदित्य कडे पाहून म्हणाली.

“आई, दुरून डोंगर खूप सुंदर दिसतात. पण चढायला लागलं की कळतं खरं सौंदर्य त्यात आहे की,  आपण त्या शिखरावर पोहोचण्यात. मी थांबलो तर माझा डोंगर कधीच चढला जाणार नाही.” आदित्यने हसून उत्तर दिले.

आईच्या डोळ्यात अश्रू आले.

“देव तुझं भलं करो.”

आदित्यने दिवस-रात्र मेहनत करून आपली दहावीची परीक्षा दिली. काही दिवसांनी परीक्षेचा निकाल लागला आदित्य शंभर टक्क्यांपैकी ९१% गुणांनी उत्तीर्ण! हे ऐकून संपूर्ण गावात आनंद पसरला . त्याच्या सगळ्या मित्रांनी त्याचे कौतुक केले. त्याचा शाळेमध्ये सत्कार करण्यात आला. पण त्याच्यासमोर आता एक पुढचा महत्त्वाचा प्रश्न उभा होता आणि तो म्हणजे बारावीचे शिक्षण, मेडिकल मध्ये प्रवेश करण्यासाठी फी , पुस्तके...

त्याची हुशारी पाहून गावकऱ्यांनी हात पुढे केला. ग्रामपंचायतीने त्याला शिष्यवृत्ती जाहीर केली. शाळेने ही त्याच्या शिक्षणासाठी काही पैसे गोळा केले आणि सर्वात आश्चर्य ज्यांनी कधी त्याच्या घरात पाय पण ठेवला नव्हता, ते देखील पुढे आले.

एका वृद्ध येऊन त्याच्या आईला म्हणाले,
“तुमचा मुलगा गाव बदलणार. पैसे थोडेच आहेत माझ्याकडे, पण घे. त्याच्या पुस्तकांना उपयोगी पडतील.”

आई भावूक झाली.
“तुम्ही इतके मदत का करता?”

वृद्ध हसला,
“कारण आमचं आयुष्य गेलं. पण त्याचं सुरू होतंय. आणि त्याचं स्वप्न आमच्या सगळ्यांचं स्वप्न आहे.”

आदित्यच्या आदितीला गावकऱ्यांचा आधार मिळाला आणि त्याने त्या सगळ्यांची मदत आपल्या मनात ठेवून बारावीची परीक्षा दिली त्यातही तो अगदी चांगल्या मार्काने पास झाला. या परीक्षेसाठी त्याच्या स्मिता मॅडमनी  त्याला खूप मदत केली. त्याला अभ्यासामध्ये असलेल्या सगळ्या शंका त्या सोडवत होत्या. त्याची रिविजन घेत होत्या.

बारावीनंतर आदित्यने NEET साठी फॉर्म भरला. परीक्षा अवघड होती. पण तो शांत होता. त्याला माहित होतं , स्वप्नाला किंमत लागते. दुसऱ्या दिवशी निकाल लागणार होता. आदल्या दिवशी रात्री त्याच्या घरात शांतता पसरली होती.

" देवा! माझ्या मुलाचं भवितव्य आता तुझ्या हाती आहे. त्याच्या मेहनतीला यश दे... " आदित्यची आई देवापुढे दिवा लावत हात जोडत म्हणाली.


To be continued...
0

🎭 Series Post

View all