नेहमीप्रमाणे मोनिका आपली सेकंड शिफ्ट संपवून घरी निघाली. बराच उशीर झाल्यामुळे केदारने तिला तिच्या घराजवळ ड्रॉप केले आणि निघून गेला.
तेवढ्यात कॉलनीतच राहणाऱ्या अनिता काकू हसत हसत पुढे आल्या.
त्यांना पाहताच मोनिकाच्या चेहऱ्यावर वैतागल्याचे भाव आले. याला कारणही तसेच होते..अनिता काकू नेहमीच कॉलनी मध्ये राहणाऱ्या लोकांच्या विनाकारण चौकश्या करायच्या. लोकं या प्रकाराला वैतागले होतेच पण वयस्कर बाई म्हणून दुर्लक्ष करायचे.

हल्ली २ - 3 वेळा त्यांनी एक मुलगा मोनिकाला सोडायला येतो हे पाहिले होते आणि मुद्दामून त्या बाहेर आल्या होत्या.
काय गं मोनिका आज तुला उशिर झाला आणि कोण हा तुला सोडायला येणारा? तुझा बॉयफ्रेंड आहे वाटतं..
काय गं मोनिका आज तुला उशिर झाला आणि कोण हा तुला सोडायला येणारा? तुझा बॉयफ्रेंड आहे वाटतं..
मोनिकाने तेवढ्याच अदबीने उत्तर दिलं..नाही हो काकू माझ्या टीम मध्ये आहे इथे पुढेच राहतो म्हणून कधीतरी मला सोडायला येतो.
अनिता काकू हसत हसत म्हणाल्या..हो का ? पण मी त्याला २ - ४ वेळा पाहिले आहे तुला सोडायला आलेलं... बघ बाई तुझं अफेयर असेल तर सांग बरंच आहे ना. जोडा काही वाईट नाही हा..आजकाल ची पिढी अशीच आहे हो... अफेयर असेल तरी सांगत नाहीत. आपल्या जाधव ताईंची नीता पण साधी भोळी पण लग्नाचा विषय काढताच तिच्या हिरोला घेऊन आली की नाही.. हल्ली काय काय ऐकायला येत. प्रेमासाठी काळ वेळ वय पण पाहत नाहीत लोकं.

हे ऐकून मोनिका चिडली आणि तिने ठरवले या बाईला तिच्याच भाषेत ऐकवले पाहिजे नाही तर उद्या उठसुठ कोणालाही काहीही विचारेल आणि बदनामी करेल.
मोनिका प्रेमाने म्हणाली नाही हो काकू ..जर असतं तर नक्कीच सांगितले असते जेव्हा कोणी आवडेल तेव्हा कळवेनच. पण एक विचारू का?
अनिता काकू... हो हो बोल ना..
मोनिका ... तुमच्या दाराशी जो भाजीवाला येतो अर्धा एक तास तुम्ही भाजी घेता त्याच्याशी तुमचे विवाहबाह्य संबंध आहेत का ?
मोनिका ... तुमच्या दाराशी जो भाजीवाला येतो अर्धा एक तास तुम्ही भाजी घेता त्याच्याशी तुमचे विवाहबाह्य संबंध आहेत का ?
अनिता काकू काहीश्या रागानेच बोलल्या अगं काहीही काय विचारतेस तो बिचारा खूप दुरून येतो म्हणून मी त्याला माणुसकीच्या नात्याने चहा पाणी देते मग म्हणून काय आमचं प्रकरण आहे का ?
मोनिका... नाही हो मला वाटलं तसंच काही असू शकतं तुम्ही चहा पाणी करताय तर...मग त्यादिवशी तुमचे मिस्टर ज्या बाईंची बॅग घेऊन त्यांना घरी घेऊन आले होते त्यांच्याशी नक्कीच संबंध असतील तुमच्या मिस्टरांचे? तुम्ही घरी नसता तेव्हा सावध राहायला हवं..तुमच्या मुलाचे आणि मोलकरणीचे देखील प्रेम प्रकरण होऊ शकते.
अनिता काकू ही सर्व ऐकून रागाने संतापल्या....तोंडाला येईल ते बरळू नकोस...माझे मिस्टर ज्यांची बॅग घेऊन आल्या ती माझी जाऊ आहे.. माझ्या नवऱ्याची वहिनी.. आणि माझ्या घरी काम करायला येणाऱ्या बाईना २ मुली आहेत माझा मुलगा त्यांना बहीण मानतो ताई बोलतो ..समजलं का तुला ? कुठंच नातं कुठे नेतेस?
मोनिका तेवढ्याच जोशात म्हणाली...सुरुवात कोणी केली? स्त्री पुरुष म्हणजे फक्त प्रेम प्रकरण संबंध लफडी असलाच विचार येतो का ? निखळ मैत्री नसू शकते का ? तुम्हाला आता समजलं का मी नक्की मित्र म्हणजे काय म्हणतं होते आणि तुम्ही कुठे काय जुळवत बसलात? नातं सोडून थेट नर मादी हेच दिसलं तुमच्या डोळ्यांना.
अश्याच संशयी स्वभावामुळे कित्येक लोकांचे संसार बरबाद झाले आहेत. लहान लेकरं अनाथ झाली आहेत. त्यामुळे इथून पुढे असे करू नका नाही तर उद्या तुम्हाला पण लोकं असे प्रश्न विचारतील तेव्हा उत्तर द्यायची तयारी ठेवा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा