खरेदी भाग दोन
तुम्ही काही म्हणा पण शॉपिंग म्हटली की आम्हा महिलांना फारच उत्साह येतो बाई कुठलंही काम करण्याचा! मग ते स्वयंपाकासारखं अगदी कंटाळवाणं आणि नावडीचं काम का असेना!
शॉपिंगच्या केवळ नावाने आमच्या मनात अनेक कल्पना आणि दृश्य नजरे समोर येतात. त्यातल्या त्यात साड्या हा महिलांचा अगदी वीक पॉईंट! दुखती रगच म्हणाना. मी तर म्हणते की खरेदीला जायचं या केवळ विचारानेच अनेक सखींच्या अंगावर मुठभर मास चढत असेल. काहीजणी तर भाजी फोडणी घालता घालता हळद, तिखट,मीठ भाजीत घालताना, अनेक रंगांच्या, डिझाईनच्या, पोतांच्या, प्रकारांच्या साड्यांच्या दुकानात अगदी मनानेच पोहोचलेल्या असतात. तर काहीजणी पोळ्या लाटता लाटता, स्वतःच्या केवळ कल्पनाशक्तीनेच साड्यांच्या दुकानातल्या सेल्समनला ‘या रंगात ते डिझाईन आणि त्या डिझाईन मध्ये हा रंग.’ यासाठी नुसतं बेजार करून सोडत असतात.
पण ती बिचारी हे सगळं बोलत असताना इतर महिलांच्या चेहऱ्यावरचे भाव मात्र असे होते जणू काही तिने फार मोठा जघन्न्य अपराध केला आहे.
पण ती बिचारी हे सगळं बोलत असताना इतर महिलांच्या चेहऱ्यावरचे भाव मात्र असे होते जणू काही तिने फार मोठा जघन्न्य अपराध केला आहे.
“किती निरागस आणि निष्पाप आहेस ग तू!”आवाजात शक्य तितका उपरोध आणत दुसरीने तिची कान उघडणी करणं सुरू केलं. “नवरा शॉपिंगला नेत असताना त्याला चांगलंच चुंगलं करून खाऊ घालायचं हे कुठल्या शास्त्रात आणि अती प्राचीन ग्रंथात लिहिलं आहे ते तरी सांग! समस्त हौशी, शॉपिंग प्रेमी महिलांच्या नावावर तू धब्बा आहेस धब्बा! इतक्या मेहनतीने, इतक्या वर्षांच्या अथक प्रयत्नांनी, शॉपिंग करणे हा केवळ महिलांचा, त्यातल्या त्यात केवळ बायकोचा जन्मसिद्ध अधिकार आहे यासाठी जीवाचं रान करणाऱ्या, अहोरात्र झटणाऱ्या, स्वतःच्या बडबडीची आणि अश्रूंची आहुती देणाऱ्या, समस्त महिलांच्या तोंडाला तू आज पान पुसलीस!” आणि मग माझ्याकडे मोर्चा वळवून, अंगाचा ती पापड झालेली ती संतापलेली महिला मला म्हणाली, “सन्माननीय अध्यक्ष महोदया, ह्या सदस्येला आपल्या या ग्रुपमधून आत्ताच्या आत्ता निलंबित करा!” त्या महिलेचा असा रणचंडीकेचा अवतार बघून बिचारी शॉपिंगला जाणारी मैत्रीण भयातिशयाने थरथर कापू लागली.
थरथर कापणाऱ्या मैत्रिणीच्या मदतीला दुसरी एक सखी धावून आली, अतिशय समजावणीच्या सुरात ती तिला सांगत होती, ”अगं ज्यादिवशी नवऱ्यासोबत, लग्नाचा वाढदिवस, किंवा स्वतःचा वाढदिवस किंवा दिवाळी, दसरा, व्हॅलेंटाईन डे अशा काही विशिष्ट कारणांसाठी खरेदी करायला जाताना घरी स्वयंपाक नसतो करायचा! स्वयंपाक तर सोडच नाश्ताही नसतो बनवायचा, अगं नाश्ता काय साधं स्वयंपाक घरात पाऊल सुद्धा टाकायचं नसतं! काय समजलीस? समजावून सांगणाऱ्या मैत्रिणीचा स्वर समजावण्याचा होता की जरबेचा याचाच मी विचार करत होते तेवढ्यात तिसऱ्या मैत्रिणीने तीला आणखी एक सल्ला दिला.
पुढल्या भागात बघूया त्या मैत्रिणीने काय सल्ला दिला
©® राखी भावसार भांडेकर. नागपूर
सदर कथा हि संपूर्णतः काल्पनिक असून या कथेतील घटनांचा आणि पात्रांचा वास्तवात कुणाशीही कुठलाही संबंध नाही तसा तो आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा, तसेच ही कथा राखी भावसार भांडेकर यांची असून प्रकाशनाचे सर्व हक्क लेखीकेकडे राखीव आहे. या कथेचे व्हिडिओ बनवण्यास परवानगी नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा