©®विवेक चंद्रकांत...
बेल कर्कश वाजली. तशी आळस झटकून ती दरवाजा उघडायला गेली. दूधवालाच असावा. तिने दरवाजा उघडला आणि त्याला पाहून स्तंभीत झाली. काय प्रतिक्रिया द्यावे तिला कळेना. तेवढा वेळ त्याला पुरला. तिला एका झटक्यात आत ढकलत तो मध्ये घुसला आणि आत येताच त्याने दरवाजा बंद केला.
एक भीतीची लहर तिच्या अंगातून गेली. तरीही ती हिमतीने म्हणाली..
एक भीतीची लहर तिच्या अंगातून गेली. तरीही ती हिमतीने म्हणाली..
"का आलास परत,?"
" तुला मारायला आलो आहे. "
"का? आधी मारायचे ते पुरेसे नाही झाले का?"
"नाही. आज त्याहून जास्त मारायचे आहे. तशी चूकच केलीय तू?"
"मी काही चूक केलेली नाहीये. आणि केलेली असेल तरी तुझा संबंध नाही. तुझ आणि माझं नाते कधीच संपले आहे. तू तर आतापर्यंत दुसरे लग्नही केले असेल."
"हो लग्न केले आणि मुलगाही झाला. आणि तू का नाही केलेस लग्न?"
"पहिल्या लग्नाचा इतका कटू अनुभव आल्यावर पुन्हा लग्न नको वाटते. तुझे वागणे आठवते. नको... नकोच ते. सोड तो विषय आणि कृपया करून जा माझ्या घरातून. मी राहते आहे सुखाने राहू दे मला आता."
" जातो.आधी मला सांग तू ही गोष्ट मला का सांगितली नाही? का लपवून ठेवली? "
", कोणती गोष्ट? आणि मी का लपवून ठेवू? आणि तुझा फक्त 1 फोन येतो महिन्यातून पैसे टाकल्याचा. तेवढाच आपला संबंध."
तो तिला पकडून पलंगावर बसवतो. स्वतः खाली बसतो.. तिचा हात हातात घेत काहीसा भावनावश होऊन म्हणतो.
"मागच्या महिन्यात तुला ब्रेस्ट कॅन्सरची शंका आली. नंतर तो डिटेक्ट ही झाला. सगळ्या तपासण्या झाल्या. तू एक फोन तरी केला?"
"तुला सांगून तू काय करणार होता? धावत आला असतास?"
"हो नक्कीच आलो असतो. आता आलो तसा"
"हे बघ आपला घटस्फोट झाला आहे अगदी एकमेकांबद्दल कटू भावना घेऊन.. तेव्हा मी मेली काय आणि जगली काय..."
तो तिच्या तोंडावर हात ठेवतो.
"प्लीज असे बोलू नको. अजूनही प्रेम करतो तुझ्यावर. दुसऱ्या कोणाचा विचारही केला नाही कधी."
तो तिच्या तोंडावर हात ठेवतो.
"प्लीज असे बोलू नको. अजूनही प्रेम करतो तुझ्यावर. दुसऱ्या कोणाचा विचारही केला नाही कधी."
"म्हणून दुसरे लग्न केले,मुलगाही झाला."
"कसले लग्न ? कुठला मुलगा? वेडाबाई मी सांगतो आणि तू विश्वास ठेवते. पहिल्या बायकोला मारठोक करणाऱ्या, तिला घटस्फोट घेण्यास भाग पाडणाऱ्या पुरुषाला कोणी मुलगी देईल? जाऊ दे सर्व. काय म्हणाले डॉक्टर.,"
"काय म्हणतील? ऑपेरेशन सांगितलं. नंतर किमान सहा महिने chemotherapy... रेडिओथेरपीचा निर्णय नंतर घेतील."
"आणि पैशाची व्यवस्था?"
"काही तू दिलेले आहेत. Tempoarary नौकरी करते तिथले थोडे साठवले. आणि तू पोटगी देतो त्याच्यात भागवते सगळे. भाऊंही देणार आहे थॊडे."
"भाऊ? त्याने आणि तूझ्या वहिनीने तुला इतकी चांगली वागणूक दिली की तुला आता रूम घेऊन वेगळे राहावे लागतंय."
तिच्या डोळ्यात टचकन पाणी आले. तो हलक्या हाताने पुसतो.
"हे बघ मी एक निर्णय घेतला आहे. मी आता तुझ्यासोबत काही दिवस इथेच राहील. तुझे ऑपेरेशन..chemo सगळे झाल्यावर जाईल... सहा महिन्यांनी "
"आणि तुझी नौकरी?"
"मी work from home घेतलंय."
"Thanks, एवढे सगळे माझ्यासाठी केल्याबद्दल. पण नको, मला पुन्हा तुझ्याबरोबर राहायचे नाही. जुन्या आठवणी फार वाईट आहेत. ती भांडण, ती मारहाण, नको. मी माझे करेल मॅनेज. तू आला, भेटला हेही माझ्यासाठी कमी सरप्राईज नाही."
"मी बदललोय... या दोन वर्षात खूप. पण मी म्हणतो त्यावर विश्वास ठेव असेही म्हणणार नाही. मी तुला कोणत्याचं नात्यात बांधत नाही. मी फक्त इथे राहणार. तुझी ट्रीटमेंट संपली की जाणार. विचार कर. कदाचित ट्रीटमेंटचा खर्च तू करू शकशील. पण ऑपेरेशन नंतरची काळजी कोण घेईल तुझी.? Chemo नंतर अशक्तपणा येत जातो त्यावेळी कोणीतरी सोबत नको? मान्य आहे, माझ्याकडून खूप चूका झाल्यात. पण आता मला काही नको, तुझ्यासोबत राहील, जमेल तशी मदत करेल, ज्या दिवशी तुला वाटले त्या दिवशी तू मला सांग.. मी निघून जाईन. मी तुझी परवानगी घ्यायला आलो आहे. दोन दिवसात मी कार माझे सामान घेऊन इथे येतो. लगेचच ऑपेरेशन करून टाकू. फक्त एकदाच मला संधी दे. "
"तुझ्या सांगण्यावर विश्वास कसा ठेऊ? किमान तूझ्या वागण्यावर?"
"माझ्या पप्पांवर तर ठेवशील? त्यांना सांगूनच आलोय इथे."
" ठीक आहे. पप्पांबद्दल अजूनही आदर आहे मला.आयुष्यात काही चांगले चांगले घडेल या आशेवर तर माणूस जगतो. "
"नक्कीच चांगल घडेल. तू बरी होशील. 100%. मी आहे ना सोबत." तो तिच्यासमोरं उभा राहून तिच्या खांद्यावर आश्वासक थोपटतो. तिचा बांध फुटतो. ती त्याच्या गळ्यात पडून रडू लागते. तो तिला थोपटत स्वतःचेही अश्रू पुसतो.
"हे बघ आता अजिबात रडायचे नाही. अगोदर फार रडवलंय मी तुला. आता परत नको."
तो खिशातून चॉकलेट काढतो.
"हे घे. तोंड गोड कर."
ती डोळे पुसते. चॉकलेट चे कव्हर काढून. अर्धे तोडून त्याच्या तोंडात टाकते. आणि हसत म्हणते.
"आता आजूबाजूचे लोक काय म्हणतील? हा कोण माणूस आला इथे राहायला.?"
"त्यांना सांग हा माझा टाकलेला नवरा."
"ए.. काहीतरीच काय म्हणतो रे". ती त्याला प्रेमाने चापट मारते आणि पुन्हा एकदा त्याला घट्ट मिठी मारते.
तो तिच्या पाठीवर हात फिरवत राहतो.
तो तिच्या पाठीवर हात फिरवत राहतो.
त्या स्पर्शात खूप काही असतं........
©®डॉ.विवेक चंद्रकांत वैद्य. नंदुरबार
(कृपया लेखकाच्या नावासहितच share करा )
(कृपया लेखकाच्या नावासहितच share करा )
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा