Login

नातं भाग 2

ही एक घरगुती कथा आहे.
नातं भाग 2

रोहनला सृष्टी आवडायला लागली होती. सृष्टी देखील रोहनला सकारात्मक प्रतिसाद देत होती. कधी त्यांनी एकमेकांचे नंबर घेतले चॅटींग केले बाहेर भेटत होते. हे श्वेताला समजले देखील नाही. सृष्टीच्या भावाने तिचे आणि रोहन सगळे चॅट वाचले फोटो पहिले आणि रागाच्याभरात पोलिसांकडे गेला होता.
काय केलेस तू हे? आज तुझ्यामुळे पोलीस आपल्या दारात आले. श्वेताचा आता चांगलाच पारा चढला होता. रोहनची मामी आम्हाला काही तुमच्या विरोधात कम्प्लेंट करायची नव्हती. आमची पण मुलगी आता मोठी होतीये. आम्हाला तिच्या भविष्याची काळजी आहेच कि... शेजारपाजारचे लोक नाव ठेवतील म्हणून आम्ही प्रकरण जडत वाढू दिले नाही. सृष्टीची आई शांतपणे परिस्थिती सावरत होती. तुमचे खूप उपकार झाले. तुम्ही या बसा ना. तो या पुढे असे नाही वागणार मी खात्री देते तुम्हांला. आंटी एम सॉरी चूक झाली. पुन्हा असे नाही करणार. असे म्हणून सृष्टीच्या घरचे सगळे घरी गेले. सृष्टीला तिची चूक उमगली होती. पण रोहन मात्र अजून शांतच होता. श्वेताने पाणी आणले रोहन जवळ येऊन बसत त्याला म्हणाली. "हे घे पाणी पी. वेळीच हे प्रकरण लक्षात आले म्हणून बरे झाले. असे का वागतो आहेस जास्त बोलत नाहीस. आई ची आठवण येते का? रोहनच्या डोक्यावरून हात फिरवत श्वेताने विचारले आणि रोहन च्या डोळ्यातून अश्रू ओघळले. मामी मला खूप एकटं एकटं वाटतं काहीच करमत नाही असे बोलून रोहन हमसून हमसून रडायला लागला. त्याची ती अवस्था बघून श्वेता अगदी विरघळून गेली. रोहनला छातीशी घेऊन डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, काळजी करू नकोस बाळा आम्ही आहोत ना. थांब मी कॉफी करून आणते मग आपण दोघे एखादा पिक्चर बघू नाहीतर बाहेर फिरून येऊ तुला जरा बरे वाटेल. असे म्हणून श्वेता कॉफ़ी करायला आत गेली आणि रोहन तसाच चालू फॅनकडे एकटक बघत बसला. श्वेता आणि रोहन गार्डनला गेले. शॉपिंग केली. बाहेरच रोहनच्या आवडीच्या ठिकाणी चायनीज खाल्ले. घरी आल्यावर श्वेताने देवाजवळ दिवा लावला. रोहनला देखील घरातले वातावरणाने प्रसन्न वाटले. उद्या पासून काय काय करायचे याचाच विचार रोहन करत होता. तेव्हड्यात रोहनचा मामा घरी आला आणि श्वेताने सर्व हकीकत मामाच्या कानावर घातली.
0

🎭 Series Post

View all