दिवाळी आली की सगळ्यांची फराळ करण्याची तयारी चालू होते........ प्रत्येकाच्या घरी फराळाचे नाव जरी सेमच असले तरी ते करण्याची पद्धत मात्र वेगळी वेगळी असते........ यातच नानखटाई हा फराळ खाण्यासाठी सगळ्यांना खूप आवडतो , पण तो बनवण्यासाठी मात्र खूप कष्ट करावे लागतात........ चला तर मग आज आपण नानखटाई घरातल्या घरात बनवण्याची सोपी पद्धत पाहूया.........
नानखटाई
साहित्य
१) पिठीसाखर १/२ वाटी
२) घी. १/२ वाटी
३) मैदा १ वाटी
४) बेसन १/२ वाटी
५) रवा १/४ वाटी
६) बेकिंग सोडा १ चमचा
७ ) इलायची पावडर १ चमचा
१) पिठीसाखर १/२ वाटी
२) घी. १/२ वाटी
३) मैदा १ वाटी
४) बेसन १/२ वाटी
५) रवा १/४ वाटी
६) बेकिंग सोडा १ चमचा
७ ) इलायची पावडर १ चमचा
कृती
सगळ्यात आधी आपण बाऊलमध्ये पिठीसाखर आणि घी एकत्र करून दहा ते पंधरा मिनिट फेटून घेऊया....... नंतर त्या फेटलेल्या मिश्रणात मैदा , बेसन आणि रवा टाकून एकदा हलक्या हाताने ढवळून घेऊया......... त्यानंतर त्या मिश्रणात बेकिंग सोडा आणि इलायची पावडर टाकून त्याचं व्यवस्थित पीठ मळून घेऊया............ मळलेल्या पिठाचे आपल्याला पाहिजे त्या आकाराची नानकटाई बनवून घ्या....... बनवलेल्या नानखटाईला सजवण्यासाठी तुम्ही तुमच्या आवडीच्या ड्रायफूट चा वापर करू शकता..........
प्लेटला खाली बटर पेपर लावून त्याच्यावर ती नानखटाई व्यवस्थित ठेवून द्या....... ज्यांच्याकडे ओव्हन आहे त्यांनी ओव्हनमध्ये वीस ते पंचवीस मिनिट नानखटाई बेक करून घ्या.........
गॅसवर नॉनस्टिक कढई ठेवून त्याच्यात मीठ टाकून स्टॅन्ड ठेवा स्टॅंडवर नानखटाईची प्लेट ठेवून कढई झाकनाने व्यवस्थित झाकून 20 ते 25 मिनिट मिडीयम आचेवर ठेवून द्या.......... तुमची नानखटाई घरच्या घरी तयार होईल........ ही नानखटाई खायला पण खूपच टेस्टी लागते........
एकता निलेश माने
***********************************
( मग वाट कसली बघत आहात लवकरात लवकर तुमच्या घरातही ही रेसिपी करून पहा आणि कशी झाली मला नक्की सांगा............. )
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा