नियती - एक भयकथा - भाग 21

Horror

#नियती 
भाग21
सकाळी सकाळी कोणीतरी आमचा दरवाजा जोरजोरात वाजवत होत ..आम्ही दोघे झोपेत होतो ..जाऊन बघतो तर बाबा 
बाबा: अरे काळ आला रे रात्री आपल्या गोठ्यातील सगळं काही जळून खाक झालय बघ ...सगळी जनावर आणि धोंड्यागडी सगळं सगळं गेलं बघ ...गोहत्येचं पाप लागलं आपल्या माथ्यावर
मी : घाबरत - अस कस झालं पण अचानक ? बाबा तुमची काय चूक त्यात तुम्हाला कस पाप लागेल ? तुम्ही नका काळजी करू. ..फक्त आग कशी लागली हे बघायला हवं ..एका माणसाचा जीव गेलाय यात चौकशी तर होणारच ना? शिवाय आपलं नुकसान झालंय कितीतरी ...5 -6 महिने झाले असतील... इन्शुरन्स  केलेला  आहे मी आपल्या सगळ्या इस्टेटीचा ...इतक्यात मुक्ती पण उठून आली ...आम्ही दोघांनी सूचक नजरेने एकमेकांना पाहिलं ...दोघे ओठातच एकसाथ मंदाकिनी? अस बोललो ...भीती पण वाटली खूप ..तिने तिचे  गुण दाखवायला सुरवात केली होती ...मी बाबांना सावरत त्यांच्या रूममध्ये घेऊन गेलो...जनाक्काला बोलवून पाणी मागवलं ते पाजलं ...
मी : बाबा तुम्ही काळजी करू नका मी बघतो सगळं ..त्यांना आराम करायला सांगून मी आणि मुक्ती गोठ्याकडे गेलो . खूप दुर्गंधी पसरली होती तिथे ...सगळं जळून खाक झालं होतं ..स्मशानासारखा वास येत होता तिथे मी ताबडतोब पोलिसांना फोन केला ...आणि सर्व घटना सांगितली  .मुक्तीला खुप रडू येत होतं 
मुक्ती : मी येऊन दोनच दिवस झाले या घरात आणि हे असं ...आणि ती जोरात रडू लागली 
मी : तिला जवळ घेऊन - आग वेडाबाई यात तुझी काय ग चूक ? असे विचार मनात आणायचे नाही ..या सगळ्याला मी जबाबदार आहे ग ..इतर कोणाची काहीच चूक नाही ..ही माझ्या कर्माची फळ सगळेच भोगत आहेत. मी हात जोडून तिला म्हणालो , उलट तूच माफ कर कर ग मला माझ्यामुळे तुला हे सगळं भोगायला लगत आहे ..तिने माझे हात पकडून अस नाही हो म्हणाली आणि मला मिठी मारली ..
इतक्यात जोरात हसायचा आवाज आला : हो तुझ्याच कर्माची फळ भोगतायेत सगळे ...आता कस बोललास ? चल एकतर तू जीव घे स्वतःचा नाहीतर हिचा तरी ...ही एक छोटीशी झलक होती तुझ्यासाठी  ..बघ आज फक्त जनावर आणि तो गडी गेला ...उद्या कदाचित आजून मोठा अपघात होऊ शकतो ...तुझे ....तुझे ..वडील...कदाचित तुझी जनाक्का...किंवा कोणीही बघ आता तूच ठरव काय ते ...मी जाते . .आधीच रात्रपाळी करून हे सगळं काम केलं ना  .आता झोप आलीये मला ...काय रे तुमची झोप उडाली का ? आणि हसतच ती तिथून गेली ..
जनाक्का पोलिसांना घेऊन गोठ्याजवळ आली ..मुक्ती आजूनपण माझ्या मिठीतच होती ..ती पटकन बाजूला झाली 
पोलिस ; काय साहेब कस काय झालं हे सगळं ?
मी : अहो काहीच समजलं नाही बघा ..आम्ही सगळे झोपलोच होतो ना तेव्हा हे सगळं घडलं..कस ? कोणी केलं? काहीच कळत नाहीये ...आमचा धोंडूगडी गोठ्यातच झोपायचा तो पण गेला हो यात..जनावर पण कमीतकमी 25-30 असतील ..खूप मोठं नुकसान झालं हो आमचं...
पोलीस: तुम्हाला कोणावर संशय?
इतक्यात माझ्या कानात कुजबुज ऐकू आली - बोल बोल माझं नाव सांग ..आणि हसत आवाज गायब..माझ्या कपाळावरुन घाम वाहू लागला ..
मी : नाहीं हो साहेब . अस तर कोणावर संशय नाही ..सगळे आपलेच तर आहेत ..इतक्यात कानात आवाज - हो का रे माझ्या राजा ..मी पण तुझीचना ...मी एकदम जोरात ओरडलो - नाही नाही तू नाही
पोलीस : ओ साहेब काय झालं? कोण नाही? काय?
मी: नाही हो.. खूप वाईट वाटत आहे मला सगळ्यांसाठी... अस एकदम भ्रमिष्ट झाल्यासारख होतय ..मी काय बोलतोय मलाच समजत नाहीये..
पोलिस : ओह काळजी घ्या स्वतःची...आता कोण काय करणार ना ...हवालदार चला आत जाऊन बघा काही सापडतय का?आणि हो सगळे फोटो पण काढा ...तपास कामात कामाला येईल आपल्याला ..बराच वेळ त्यांचं काम चालू होतं बिचारे हातात ग्लोव्हज घालून आणि मास्क लावून आत गेले होते..तिथलं काही काही उचलून एका पिशवीत भरत होते ...फोटो काढले गेले ..घरात सगळ्यांचे जबाब घेतले गेले ..कोणालाच काहीच माहीत नव्हतं ...माहीत होतं ते फक्त मला आणि मुक्तीला ..
पोलिस त्यांचं काम करून गेले ..मी बाबांकडे गेलो ते एकटक वरती बघत होते मी खूप हाका दिल्या ..त्यांना खांद्याला धरून हलवलं पण ते काहीच उत्तर देईनात ...मी घाबरून त्यांच्या छातीवर कान लावला ..ठोके ऐकू येत होते ...माझ्या जीवात जीव आला ..इतक्यात ती आलीच ..
ती : आहेत आहेत आजून आहेत .. पण जर तू माझं ऐकलं नाहीस तरर्रर्रर्र..... आणि ती गायब झाली 
माझ्या हृदयाचे ठोके आता वाढले होते ...डोक्यात भयानक चमका येत होत्या ...आता ते फुटेल की काय अस वाटत होतं .. कपाळवरून घामाच्या धारा वहात होत्या .. मी बाबांना घट्ट मिठी मारली , बाबा माफ करा मला ..खूप मोठी चूक केली मी ...आज ती तुम्हाला सगळ्यांनाच भोगावी लागत आहे ...आता याला उपाय एकच ...मी ..मी जातो तिच्याकडे... मग निदान ती तुम्हाला सोडेन तरी ...इतक्यात मागून मुक्ती आली ...तिने माझ्या केसात हात फिरवला 
मुक्ती : अहो काहीही वाईट होणार नाही ..तुम्ही मनात कोणतेही वाईट विचार आणू नका ..
मी : आग मुक्ती आजून काय वाईट होईल माहीत नाही ग ..बाबांची अवस्था बघ 
मुक्तीने पाहिलं आणि ती धावत गेली, येताना गुरुजींचा अंगारा घेऊन आली ...थोडा अंगारा हातात घेऊन ,"जगदंब जगदंब , गुरुमहाराज की जय! जय ..अस म्हणून काहीतरी प्रार्थना केली आणि तो अंगारा बाबांच्या कपाळाला लावला ...आणि काय चमत्कार, बाबा ठीक झाले ...
बाबा : अरे तुम्ही दोघे इथे काय करताय? ते पोलीस आलेत ना ? चला चला काय म्हणतायेत बघूया ..
मी : बाबा गेले ते ...तुम्हाला झोप लागली होती म्हणून नाही उठवलं..
बाबा : हो काय? बर काय म्हणाले ते ?
मी : काही नाही काळजी करू नका म्हणाले ...त्यांना आपल्याविरुद्ध काही सपडलंच नाही ..का बोलतील ते आपल्याला 
बाबा : एकदम रडू लागले - माझी सारी जनावर, माझा जिवाभावाचा धोंडू पण गेला रे ...आणि एकदम मला लहान मुलासारखे बिलगले..
मी : माझे पण डोळे आता पाण्याने भरून आले होते , मुक्ति पण बाजूला रडत होती - बाबा जे झालं ते झालं, तुमचं दुःख मी समजू शकतो पण होनीला कोणी टाळू शकत का? नाहीना ? बाबा सांभाळा स्वतःला ...सर्व काही नीट होईल...झालेल्या नुकसानाची भरपाई पण मिळेल आपल्याला ..आपण नवीन जनावर घेऊ ...धोंडूला मात्र मी नाही आणू शकत बाबा ..आणि माझा ही बंधा फुटलाच...मग मी स्वतःला सावरत - आग मुक्ती जा बर जनाक्काला नाश्ता बनवायला सांग .. बाबांना गोळ्या घ्यायच्या आहेत ना? मुक्तीने होकारार्थी मान हलवली आणि ती तिथून गेली ...
मी : बाबा मी आहे ना ..आजिबात काळजी नाही करायची ( इतक्यात कानात आवाज - तू आहेस म्हणून तर काळजी त्यांना आणि हसत आवाज पुन्हा गायब )मी घाबरलो ...बाबा मी पण जरा फ्रेश होतो आपण सोबतच नाश्ता करू सगळे ..
बाबा : बर पोरा ..जा आवरून घे ...
मी : बाबा प्लिज टेन्शन घेऊ नका ..मला तुमची खूप काळजी वाटत आहे ..
बाबा : पोरा मी ठीक आहे आता ..जा तू फ्रेश हो . मी पण होतो आपण सगळे बरोबरच बसू नाश्त्याला ...
मी : थोडा हुरूपाने- हो बाबा ...आम्ही पण येतो आवरून टेबलावर नश्याला...मनात देवाचे आणि गुरुजींचे आभार मानत मी माझ्या बेडरूममध्ये आलो ...अरे देवा आता हे काय आजून? मी मटकन खालीच बसलो ...
मुक्ती पंख्याकडे एकटक बघत होती ...मी तिला आवाज दिला तर तिचे डोळे वेगळेच दिसत होते ..माझं लक्ष तिच्या हाताकडे गेलं ..अरे देवा तो धागा तिच्या हातात नव्हता..
मुक्तीने आता पंख्यावरून तिचा  मोर्चा माझ्याकडे वळवला होता ...तिचे सगळे केस विस्कटलेले होते ...चेहऱ्यावर बोचकारलेले होते ..त्या जखमांमधून रक्त वहात होते ..डोळे रक्तासारखे लाल लाल झाले होते ...अस वाटत होतं काधिपन तिची बुबुळ बाहेर येतील ...एकूणच ती खूपच भयानक दिसत होती, मला तिच्याकडे पाहवत नव्हते ...मी तिथून बाहेर पळ काढला आणि घरात तिच्या हातातला धागा शोधू लागलो ...इतक्यात जनाक्काने मला पाहिलं 
जनाक्का : काय रे पोरा काय शोधतोस?
मी : ते ..धागा ..
जनाक्का : धागा? कसला र? 
मग मी माझ्या हातातला धागा दाखवला -हा असा धागा...
जनाक्का : असला होय..आरे मघा न्हाणीघरात सापडला मला मी तर तो कचऱ्यात टाकला ..थांब आणते शोधून ..पण का रे कशापायी पायजे तुला ? आणि हाय कुणाचा? तुझ्या हातात तर एक हाय की..
मी : जनाक्का ..तुला सगळं सांगतो नंतर आधी तो धागा दे बर आणून 
जनाक्का पटकन गेली आणि धुवून तो धागा घेऊन आली ..माझ्या जीवात जीव आला तो धागा पाहून ..मी धावतच आमच्या बेडरूमकडे निघालो ..माझ्या मागोमाग जनाक्का पण आली ..हे माझ्या लक्षात आले नाही ...मी आत गेलो तर मुक्ती स्वतःच डोकं जोर जोरात भिंतीवर आपटत होती ...मी खूप घाबरलो होतो ..काय करावं मला काहीच सुचत नव्हतं ...जनाक्का माझ्या मागून आली आणि तिने मुक्तीच्या कपाळावर हात ठेवला तरी मुक्ती डोकं आपटतच होती आणि जनाक्काचा हात आता जख्मी होत होता ..इतक्यात माझं डोकं चाललं आणि मी पटकन मुक्तीचा हात धरला आणि त्यात तो धागा घट्ट बांधला ...त्याबरोबर मुक्ती जोरात ओरडली आणि बेशुद्ध झाली..
हे सगळं पाहून जनाक्का माझ्याकडे पाहु लागली : काय रे देवा ...तुझं नशीब खराब कि रे पोरा ..अशी झपाटलेली पोर गळ्यात पडली की तुझ्या ..आर मग ते गोठा बी हिनीच तर जाळला नसलं ना?
मी: जनाक्का . मी नंतर सगळं सांगतो तुला ..पण आत्ता जे पाहिलस ते बाबांना नको सांगूस ..तुझ्या पाया पडतो ग ..
जनाक्का : हा नाय सांगत. पर लै वाईट वाटतंय पोरा तुझ्यासाठी.. पोरा मी करते माझी काम पर तू सांभाळून राहा बाबा हे काय खर दिसत नाय मला ..काय बाय निस्तीच रुपाण गोरी पर काळीकुट्ट हाय मनानी.. तिच्या डोळ्यात अश्रू तरळले ..तिने ते पदराने पुसले ..आणि मला तिच्यात माय दिसू लागली .....

...
@पूनम पिंगळे
क्रमशः

🎭 Series Post

View all