Login

पनीर बटर मसाला

पनीर बटर मसाला
साहित्य
प्रत्येकी १००ग्रॅम काजू, अमूल बटर, खोवा, खोबरा किस, खसखस, तीळ, शेंगदाणे, २चमचे मिरची आले लसूण पेस्ट, थोडी कालमी व विलायची पूड, प्रत्येकी २चमचे कस्तुरी मेथी, धनेपुड, साखर, १चमचा जिरेपूड, तिखट हिंग, हळद, प्रत्येकी १वाटी किसलेला कांदा, टोमॅटो पेस्ट, मीठ, २०० ग्रॅम लोणी, २५०ग्रॅम पनीर.
कृती
काजू, खोबरा किस, तीळ, शेंगदाणे, थोडे एकत्र वाफवून घ्यावे व सर्वांची एकत्रच मिक्सरमधून पेस्ट करावी. १००ग्रॅम लोणी भांड्यात घेऊन चांगले गरम झाल्यावर त्यात कांदा किस घालून गुलाबी रंगावर परता. नंतर तयार केलेली पेस्ट, लसूण, मिरची, आले पेस्ट घालून परता, पुन्हा उरलेली लोणी घालून हिंग, हळद, तिखट, जिरे पावडर, धने पावडर, कस्तुरी मेथी, खवा घालून परता. लगेच टोमॅटो पेस्ट घालून थोडे शिजू द्यावे. हवे तसे घट्ट करण्यासाठी आवश्यक तेवढे पाणी घालावे. एक उकळी आल्यावर साखर, चविप्रमाणे मीठ, थोडा खाण्याचा लाल रंग व अमूल बटर घालून एकजीव करावे. पनीरचे एक इंच लांब चौकोणी तुकडे वरील रश्यात घालून व बारीक कोथिंबीर पेरून पराठा /फुलक्याबरोबर सर्व्ह करा.