Login

पातळ भाजी भाग 45

पातळ भाजी
पातळ भाजी भाग 45

आई दादा रोहितला मेधा ताईचा इशारा कळला..प्राचीची tube अजून पेटली नव्हती

'मी करते अहो पोहे..आणि चहा त्यात काय."

"तुम्ही राहूच द्या वहिनी..इथे तुमचे पोहे नकोत आम्हाला.." रोहित हसून

इतक्या हर्षला ही काही कळेना ,कांदे पोहे चहा हा कार्यक्रम असा वाटत आहे जणू काय मी पेशेंट बघायला नाही मुलगी बघायला आलो आहे..

"काल आत्या काही बोलल्या होत्या का तुम्हाला हर्षं कोण्या मुलीबद्दल.." मेधा मुद्दाम खडा टाकून विषय लग्नाकडे वळता करत होती.

"काल अत्यासोबत बोलणं झालं होतं माझे..त्या कोणत्या तरी random मुलीच्या स्थळा बद्दल बोलत होत्या..मी माझ्या घाईत होतो आणि तिची एकच घाई होती..मुलगी बघ मुलगी बघ..मी ओपेरशन बघू की मुलगी ??"

"हो खरंय तुमचं..random मुलगी..? पण ती मुलगी भेटली तुम्हाला समोरच आणि तिने जाब विचारला तुम्हाला की तिला असे ramdom का म्हणालात तर..उत्तर द्याल ना ??" मेधा हर्ष ला म्हणाली..
---------


तसे ही वीणाची खट्याळ वागणूक त्याला आवडली होती.?? त्याला ही आत्याने आणलेले ते हेच स्थळ आहे आणि हीच ती माझ्या साठी आत्याने पसंती केली आहे हे माहीत असेल का कदाचित..म्हणूनच तो सतत सतत वीणा जे प्रश्न विचारत होती त्याला उत्तर देऊन गप्प बसवत होता का..?

"आता तुम्ही आमच्या मेधाचे दिर आहात, तर असेच जेवल्या शिवाय जायचे नाही.." आई

"अरे असे नसते ते ,इथे म्हणायचे जेवल्या शिवाय आम्ही तुम्हाला जाऊच देणार नाही.." रोहित

इकडे वीणा लगेच सूर वाढवत ,पण हळूच सुरू खाली

ती ठसकली..आणि म्हणाली, "तसे नाही म्हणत तुम्ही इतरांना ,तुम्ही तर हक्काने म्हणतात, जेवल्या शिवाय आम्ही तुम्हाला जगाचे हलू देणार नाहीत..मग ह्यांच्याच बाबतीत का हलके हलके आग्रह..जरा तरी रेटून म्हणावं ना.."

बाबाने दादाने मेधाने आता तर तिच्या ह्या बोलण्यावर कपाळाला हात मारून घेतला ,आणि तिला सगळे सोबतच म्हणाले ,"गप्प बसायचे काय घेशील तू..इथे होत आहे ते होऊ दे..नाहीतर स्थळ हातचे जाईल.." रोहित लगेच

डॉक्टर विणाच्या त्या वेड्या वागण्या कडे बघून हसला..आणि मनात म्हणाले ,"मुलगी कठीण आहे..पण छान आहे.."

तर आता विणाला डॉक्टरांचा तो एक शब्द खटकला.."मला ह्यांचा एक शब्द खटकला आहे. मला त्याचा त्यांच्या कडून खुलासा हवा आहे.."

तिक्यात मेधा आणि प्राची ज्या तिचे नको ते बोलणे ऐकून घेत होत्या त्या तिला म्हणाल्या

"तू आता जाऊन कृपया पोहे आणि चहा आण ,बाकी जाब विचारूच नकोस.." प्राची

"तसे नाही वहिनी तुला नाही कळले काय घडत आहे इथे..?" मेधा प्राचीला तिच्या कडे खेचत कानात म्हणाली

तशी प्राची डोळे झाकत म्हणाली ,"खरंच काही आहे का जे मला नाही कळले.."

"हो तुला ही नाही आणि दादाला ही नाही कळलेले दिसत काही.."

"डॉक्टरांनी काही केले आहे का, की वीणा कडून काही चुकले आहे का ज्यामुळे तुम्ही वेगळ्या ट्रॅक वर विचार करत आहात आणि आम्ही वेगळा विचार करत आहोत.." प्राची मोठा धीराने सखोल विचारणा करत होती

"हो वेगळा ट्रक,आपण बोललो होतो ना विणाला असा नवरा मिळावा जो तिचे पहिले प्रेम स्वीकार करेन..तो नवरा आम्ही शोधला आहे...अगदी दोन दिवसांपूर्वी सासूबाईने हे स्थळ सुचवलं आहे विणासाठी...विणाला लक्षात आले आहे पण डॉक्टरला अजून ही लक्षात येत नाही.."

मेधाचा आता प्राचीला इशारा कळला होता ,ती ही मनोमन खुश झाली होती..."मुलगा अगदी परफेक्ट आहे हा तर...."

"अरविंद ला माहीत असावे बहुतेक.." प्राची

"दिसत तर नाही तसे काही..?"

"त्याला कसे माहीत नसेल ,त्याला तर घरच्या सगळ्या गोष्टी ठाऊक असतात..कोण आलं ,कोण गेलं..मग आत्या हे बोलत होत्या तेव्हा हे कुठे होते..?" प्राची आठवत होती

मेधा स्वतःच आता हर्षला म्हणाली ,"तुम्ही तसे ही घरी जाणारच आहात तर आमच्या सोबत जेवन करून जा..आणि वाटल्यास "

डॉक्टर ऐकत होते पण पुढे मेधा थांबली अजून काही तरी म्हणायाचे होते म्हणून त्यांनी परत विचारले, " वाटल्यास काय ??"

"आत्याला फोन लावून पहा..कोणते स्थळ होते ते जाणून घ्या..मग ठरवा पोहे खाणार की जेवन करणार ,की स्थळ पक्के करून जाणार आहात ते..?" मेधा खट्याळ हसत म्हणाली

डॉक्टर बघत राहिले त्यांना आत्ता कळले ,की आत्याने काल जे स्थळ सुचवले ते ह्या घरातले होते...आणि ते विणाचे होते तर...

"Ok तर ती random मुलगी वीणा होती तर...म्हणजे आहे तर..."

"हम्म ,तीच ती..आहे..random मुलगी..तुम्हाला आवडेल आमची वीणा ,वेगळी आहे पण मनाने चांगली आहे..खुद तुमच्या आत्याला ही तुमच्या साठी वीणा आवडली आहे..त्यांना आमच्या काकांचा आणि आईचा स्वभाव आवडतो म्हणून त्यांच्या मनात आले की वीणा आणि तुमचे नाते व्हावे.." मेधा

"हम्म,पण विचार ही करावा लागेल त्यावर..इतक्या सहज मी ही निर्णय घेऊ शकणार नाही वहिनी..त्या किती ही चांगल्या असल्या तरी माझी field वेगळी आहे..मी डॉक्टर आहे..मला डॉक्टर हवी आहे.."

डॉक्टरने तर जणू नकार दिला होता..त्याला वीणा आवडली ही होती पण ...?