Login

पातळ भाजी भाग 35

पातळ
पातळ भाजी

भाग 35


"मी पण देईल तुझी साथ ह्यासाठी..विणाचे स्वप्न पूर्ण होतांना पहायचे आहे हे माझे स्वप्न आहे वहिनी.."

मेधाला कळले होते ,इथे आता आपले माहेरपण करायला आपली वहिनी आली आहे..काकुला कधी जमले नाही ते प्राची करू बघत होती..

मला मेसेज मध्ये लेक म्हणाली होती ,मी ह्या घरची लेक..ते वाचून मन भरून आले होते..ह्यासाठी तरी प्राचीला आपण सासुरवाशीण म्हणून त्रास होऊ देता कामा नये..

मोठी ननंद असलो तरी पाठरखीन होऊ शकतो ना आपण तिची..?

आता मेधा आणि प्राची एकमेकींना मिठीत घेतात..ननंद भावजय एका स्वप्नपूर्तीच्या पाठीमागे लागतात..


मेधाला मनापासून वाटले आपली प्राची वहिनी नक्कीच चांगली मुलगी आहे..कालचा मेसेज हा अरविंदने पाठवला नसून तो नक्कीच प्राची वहिनीने पाठवला असेल..

कारण इतका मोठा मेसेज अरु लिहिणे शक्यच नाही..तो सरळ जे काही बोलतो ते तोंडावर बोलतो..त्याला मी वागले ते आवडणं शक्य नव्हते..

आणि त्यात तो पुन्हा मेसेज करणे शक्य नाही ,हा मेसेज प्राचीने केला असला तरी त्याला ही माहीत असेल आता हा प्राचीने लिहिला आहे..

"वहिनी तुझ्या बद्दल मला वीणा बोलली होती..की तू हवी तशी नाही तू तर येताच काकुला आवडेनाशी झाली..म्हणून मी ही मनात तेच घेऊन बसले होते ग.."

"होते ताई तसे कधी कधी, चूक माझी ही होऊ शकते..पण चला तुम्हाला निदान कळले तरी मी कशी आहे हो ना,की अजून ही शंका आहे काही मनात.."

"आता तर क्लीअर झालेच चांगलेच, आता कोणी किती ही काही ही वाईट सांगो मी तर अनुभव घेतला आहे..जी वहिनी नंदेला माहेरपणाला ये म्हणते ,आठ दिवस रहा म्हणते..जी भावाच्या वतीने नंदेला मेसेज पाठवते ती वहिनी वाईट कशी असू शकते ,हो ना वहिनी..हम्मम. "

प्राची आता तर आवक होऊन बघत होती ,मेधा ताईला हे कसे कळले..की मी तो मेसेज पाठवला आहे..की मी आहोंच्या वतीने त्यांना घरी येण्याची विनंती केली ते...तिला काही सुचत नव्हते..

"तुम्हाला कसे कळले हे ताई...मला माफ करा.."

"अग माफ मला करा..मी तुमच्या बद्दल नको ते विचार मनात आणून तुमची तक्रार दादाकडे केली..तुम्ही तर आमच्या पेक्षा लहान असून तुम्ही आमच्या भावना ओळखून वागतात..आमचे मने जपतात..विणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता तत्पर आहात.. हे कमाल आहे. कोण वहिनी हे करेन.."

प्राचीला आता कळत होते आपण जे जे मनापासून करतो ते नक्की पोहचते ,आणि सगळेच त्याला डावलणारे नसतात, पण मेधा ताईने तिला ओळखले ह्यातच भरून पावले.

सासूबाई येऊन जाऊन डोकावून बघत होती ,नेमके ह्या दोघी काय काय बोलत आहेत ,किती वेळच्या बोलत आहेत..ही वीणा कुठे गेली आहे, तिला पाठवते जरा ह्यांचे बोलणे ऐकायला...ती आल्यावर तरी भिड चेपेल ह्या दोघींची... कश्या लगेच एकरूप झाल्या आहेत..


आमची सून तर गप्पीष्ट आहेच ,लगेच काम सोडून गप्पा मारत बसली की बसते..

"उठा ग दोघी लागा थोडे तरी काम करू ,कुठे गप्पा माराव्यात कधी माराव्यात कळत नाही ह्या प्राचीला ,ती तर ती मोठी नणंद तिने तरी तिला लावावे कामाला तर ती ही येऊन गप्पा मारत बसून आहे.."

रोहित म्हणाला ,"आई भाकर तुकडा ओवाळून टाकला आहेस ना जस्ट तू ताई वरून..आता पाच मिनिटं ही नाही झाले तिला येऊन...तू प्रेमाने तिला घरात घेऊन...तर लगेच तिने आल्या आल्या वाहिनीवर रुबाब दाखवावा अशी अपेक्षा कशी करू शकतेस...मारू दे गप्पा.. ननंद भावजय जर अश्या बोलल्या नाहीत तर नाते गोड आंबट कसे व्हायचे...तू हे विणाला ही शिकव ,कारण उद्या माझी वाली ही येणार आहे.."

आईने त्याला हे ऐकवल्याबद्दल दोन धपाटे ठेवून दिले ,पण इकडे दोघी उठल्या ,गप्पा मारत स्वयंपाक घरात गेल्या..सगळे स्वयंपाक घर मेधाला माहीत होते म्हणून ती पटापट काम करायला लागली..

"मी सगळे करते तू फक्त बघ..पुढच्या वेळी तू कर मी बाळ घेऊन बसेन.." मेधा म्हणाली

ती काय बोलली हे हम्म ,हम्म करत प्राचीने ऐकले पण तिच्या लक्षात आले नाही..

आणि नंतर लक्षात येताच तिने मेधाला मिठी मारली ,"वा ताई किती मोठी आनंदाची बातमी.."


मेधा असे बोलून प्राचीकडे बघू शकत नव्हती ,तिला ही बातमी सर्वात आधी सगळ्या घरच्यांना द्यायची होती ,तेव्हा ठरवले होते प्राची कोण कुठली तिला आपण आपल्या आनंदात सहभागी का करून घ्यावे.. पण आता तिने ही आनंदाची बातमी सर्वात आधी प्राचीला का द्यावी..का तिलाच द्यावी वाटले असावे..?