Login

पातळ भाजी भाग 38

पातळ
पातळ भाजी 38

"महिनाभरात तुम्ही जाणार ??" मेधा आवक झाली होती

"हो महिनाभरच आहोत आम्ही अग.." तो

"हे कधी झाले..? तू आधी प्लॅन केला होतास का हा ??" मेधा त्याच्या कडे बघून प्रश्न विचारत होती

एकीकडे आता ती ही प्राचीकडे संशयाने जणू बघत होती..तिला वाटत होते की ह्यातले प्राचीला माहीत असावे..पण ती दाखवत नाही..! ती त्यात कुठेच नाही असे दाखवते की काही वेगळे आहे..?

ती प्राचीकडे संशयाने बघत असतांना लगेच अरविंद म्हणतो..

"मी सांगेन नंतर तुला ताई,पण तू प्राची कडे असे बघू नकोस ?? "

मेधाला आता खजील झाल्या सारखे वाटले ,आपण प्राचीला एकीकडे चांगले म्हणतो ,तिच्या खांद्यावर माहेरपणाची धुरा टाकतो म्हणजे कधी आलो तरी प्राची आपले माहेरपण चांगले पार पाडेल आणि एकीकडे सासुरवास ह्या नजरेतून तिच्या वर संशय घेतो ,आणि ती नजर दादाला दिसावी...हे ठीक नाही..

"मी जरा बाहेर जाऊन येते ,बायका आल्या का बघते तुम्ही दोघे बहीण भाऊ बोला..मी इथे असल्यावर तुम्हाला मोकळे बोलता येणार नाही उगाच.." प्राचीला मेधाची शंका कळली..

ती ह्या अमेरिकेच्या निर्णयाला मला जबाबदार धरत आहे हे तिला कळले..पुन्हा एकदा तिने मेधा कडे पाहिले अन तेव्हा कळले मेधा अजून ही तिच्या कडे बघते..!!

"मी तर सगळ्याच गोष्टी साठी जबाबदार आहे इथे.." प्राची मोठा श्वास टाकत हॉल मध्ये आली

सगळे घर छान सजलेले पाहिले ,आणि तिला वाटले आपण वीणा सोबत बोलायला हवे ,तिच्याशी संवाद वाढवायला हवा ,तिचे स्वप्न पूर्ण करायचे म्हंटल्यावर तिला न बोलता कसे हे स्वप्न पुरती करता येईल..

समोर वीणा राहिलेली आवरा आवरी करत होती ,तिला पाहून प्राची तिच्या जवळ गेली आणि तिला विचारले..

"ताई कसे वाटते घर आता ? काही अजून हवे का ?? कोणती सजावट बाकी आहे का ??'"

"अहो किती प्रश्न विचारत आहात तुम्ही..काही कमी वाटत असेल तर करत बसा ..आता तर तुम्हीच credit घेणार ह्या सजावटीचे ,रांगोळीचे..मग मला का विचारत आहात नसते प्रश्न..आणि हो मी मेधा ताई नाही थोडं गोड बोलून तुमच्या मुठीत यायला...तिला असे भावनिक प्रकार आवडतात मला नाही.."

वीणा असे बोलण्यावर प्राची दुखावली होती ,तिकडून सासूबाई तिला समजवणार होती पण मध्येच वीणा दिसल्यावर त्यांनी तिची वाकडी कान उघडणी करायचे ठरवले होते.. त्यांना आपले वचन निभवायचे होते..महिनाभर सुनेला चांगले वागवायचे होते ,म्हणून त्यांनी वीणा जे बोलली त्याचे उत्तर भले ही प्राचीला देता आले नसले तरी त्या देणार होत्या..

तिने ( प्राचीने ) तसा खूप आधीच स्वयंपाक करून ठेवला ,आणि बाहेर च्या सतत येणाऱ्या धुळीने खराब झालेली फरशी तिने पुसून घेतली..घरात ही फुलांची रांगोळी काढली होती..


त्यात सतत मिरवा मिरव करणाऱ्या वीणाच्या पायाने फरशी अजूनच खराब झाली होती.

कामात व्यस्त असलेल्या प्राचीला हे सगळे बघून आपले माहेर आठवत होते..

तिला माहेरी एकच काम दिले होते आईने ,ते म्हणजे घरातील खालची फरशी ,वरच्या मजला वरची फरशी.. घरातील काचा.. फर्निचर.. आणि शोकेस मधील सर्व धूळ साफ करत राहणे.

तेव्हा कोणी जरी थोडी ही टापटीप ठेवलेली वस्तू इकडे तिकडे केली तर सगळ्या जास्त कामाचा तिला त्रास होत..मग ती ओरडायची..तिला घाबरून सगळे मग तिच्या परवानगीने आत बाहेर करायचे.. तिला वस्तू मागायचे आणि काम झाले की पुन्हा जिथल्या तिथे ठेवायचे.. ती म्हणजे दरारा होती घरातल्यांसाठी.. कामात निपुण पण स्वयंपाक म्हणाल तर अजून तिथे हात बसला नव्हता.

विणाची घाई गडबड पाहून ,तिला ओरडावे वाटत होते पण ते पाहून तिला माहेरची आठवण झाली..आई बाबा दादा समीर आठवले...एकदम चुप म्हणजे चुप बसत..पाय सोफ्यावर घेऊन मांडी घालून बसत..बाहेरचा बाहेर थांबत.. घरातला घरात.. जोपर्यंत फरशी वाळत नाही..तोपर्यंत कोणी ही घरातून बाहेर जात नाही..कोणी ही घरात यायचे ही नाही..हा हुकूम असायचा प्राचीचा..

प्राची इथे ही तेच काम करत होती, आज हळदीकुंकू आहे..म्हणून तिची लगबग सुरू होती..तिचे काम पाहून सासू ही खुश होती..सुनेला हे काम तर छानच जमते..तिची कामाची पद्धत मस्त आहे..पण त्या बघत होत्या इतकी मेहनत घेते आणि हे लोक उठसुठ मध्येच येऊन तिच्या मेहनतीवर पाणी घालत आहेत..

सासूबाई सगळे काम बाजूला ठेवून आधी विणाला पकडते.."अग ती इतकी मेहनत घेत त्याचे काही मोल ठेवशील का ,की तुला लावू कामाला..तसे ही ते तिळाचे लाडू काढ डब्यातून..त्यात वाण आणलेले आणि मोगऱ्याची वेणी घेऊन ये बाजारातून..त्या कामाची तरी आहेस ते कर.."

विणाची आज कान उघडणी करण्याची जबाबदारी खुद प्राचीच्या वतीने सासूबाईने घेतली होती.. वचन पुरती चे हे पहिले पाऊल होते