Login

पातळ भाजी भाग 39

पातळ
पातळ भाजी
भाग 39


विणाची आज कान उघडणी करण्याची जबाबदारी खुद प्राचीच्या वतीने सासूबाईने घेतली होती.. वचन पुरती चे हे पहिले पाऊल होते


"मी जमते करते ना ,माझी मला अक्कल आहे ग थोडी.." वीणा रागवत

आई विणाला म्हणाली ,"तू काही काम करू नकोस ,फक्त काम वाढवून ठेवू नकोस..मी वैतागते ग पुरती..सगळे मस्त रांगोळीचे रंग भरायचे सोडून रंग खेळा ,जणू लहान आहेस..लग्न करून देण्याची वेळ आली आहे, सगळी कडे रांगोळी सांडत चालली आहे,प्राचीने दोन तास बसून ही सुंदर रांगोळी काढली होती ,त्यात तुझा हातभार नाहीच पण सांडून ठेवलेले रंग घरभर करत गेलीस..त्यात मी इथे साफ सफाई करून वेडी झाले.."

"अग तूच बोलतेस का हे ,सुनेची बाजू घेऊन..?"

"मीच बोलते ,कारण मी आता माघार घेते,माझे वैरी वागणे..तिला महिना भर रहायचे आहे..त्यात काही दिवस माहेरी जाईल मग असे किती से दिवस ती आपल्या सोबत असेन ?? मनात माझ्याबद्दल वाईट भाव घेऊन जाईल ,आणि अरविंद ही नाराज नाराज राहील... त्याला मी वागते ते पटत नाही..पण मन असून ही तो मला अंतर देऊ शकणार नाही ,पण अमेरिकेला जायचे कारण मलाच समजेल सतत.."

आई असे असे बोलून मटकन खाली बसते ,तिला आता हे स्वतःचे वागणे स्वतःवर दबाव निर्माण करत होते ,अगदी चुकीचे वागलो...स्वार्थ ठेवून ,कुहेतु ठेऊन वागणे ठीक नव्हते ,हेच असे वागणे आपले आपल्या छोट्या जावे सोबत ही होते..तिचा तर स्वभाव सगळ्यांना धरून चालणारा होता...सगळ्यांनी म्हणून तिला डोक्यावर घेतले होते..ती आपल्याला ही जीव लावून प्रेम करत ,आदराने पहात...आणि फक्त ती घरात माझ्या पेक्षा प्रिय का ?? म्हणून तिचा दुससाहस ,राग राग करत...हीन वागत..आणि तिला बऱ्याचदा खोटं पाडण्याच्या नादात आपले सत्य बाहेर पडत ,आपण इतरांच्या नजरेतून पडत होता..त्यामुळे तिच्या बद्दल अधिक घृणा मनात पैदा होत...आज हेच असेच चांगल्या प्राची सोबत आपण करत होतो ,तिच्या मध्ये मेधाची आई उमाला बघत होतो...पण हे मुलांना माहीत नव्हते ,त्यांना वाटे आपलीच आई बरोबर आहे ,असेल..पण अरविंद मोठा होता समजदार होता त्याला काकी आवडायची ती त्याला खूप जीव लावायची...तिच्या सोबत माहेरी घेऊन जायची...याचा पाचव्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी पैसे कमी पडले म्हणून तिने तिचे कानातले विकून पैसे माझ्या हातात दिले ,तिने त्याचा गवगवा ही नाही केला...सासूबाईने विचारले तर सांगितले कानातले हरवले कुठे तरी...

ती तंद्रीतून बाहेर आली ,आणि लेकीला म्हणाली ,"तू खबरदार प्राचीला मोठ्या वाहिनीचा मान दिला नाहीस तर.. तू माझ्या वळणावर ,माझें स्वभाव गुण घेतलेस तर...जा आणि स्वतःच्या जबाबदारीने कामाला मदत करते म्हण प्राचीला ,ती तुला मान द्यावा म्हणून विचारायला आली होती ,आणि तू तिला फटकळ सारखे बोलून तिचे मन दुखावले आहेस ,आधी त्याची माफी माग.."

तिला आईचे ही कटकट नको होती ,तेच ते..जरा ही मज्जा करू देत नाही..स्वच्छता आणि आईची मेहनत ते ही रंग खेळावे की नाही असे होते.. मी माझ्या सासरी अशी अजिबात करणार नाही..म्हणेन खेळा रे काय खेळायचे ते ,मी ही येते तुमच्या मध्ये रंग उडवायला..ही साफ सफाई होत राहील..पण ही मज्जा पुन्हा नाही..

"मी तुझ्या सारखी कटकटी आई होणार नाही, मी त्यांना आंनद घेऊ देईल आणि मी ही घेईल..तुझी आपली सारखी कटकट..एकदाची सासरी कधी जाईल असे वाटू लागले आहे..ते माझे घर असेल, तिथे माझी मर्जी असेल..मग दाखवेल तुला कसे सांभाळायचे असते घर..त्या घरातील माणसे..आणि स्वतःचा आनंद ..? "

तिच्या बोलण्यातून आईला फक्त अहंकार दिसला ,काही कामा ना काडीची माझीच लेक आहे ,पण इथेच काम काढू पणा करते तर तिथे काय खाक काम करणार ही..आली मोठी नाकाने कांदे सोलणारी... काय तर म्हणे सासरी माझी मर्जी असेल..!! घ्या इथे तर कोणत्या कामाला पुढे येत नाही ,ती सून आहे ती राबत।असते आणि ही महाराणी फक्त तोंड चालवत असते..बघू आहेतच पुढे लग्नाचे दिवस...हिला लग्न म्हणजे खेळ वाटतो..लग्न म्हणजे खरेदी वाटते..लग्न म्हणजे प्री वेडिंग शूट सारखे स्वप्न वाटते..आज झुलत रहा..सासरचे स्वप्न पहात रहा म्हणावे...आपली मर्जी चालायला आपण पुढे होऊन काम करायचे असते हे माहीत नाही...आई रागावली होती विणाच्या ह्या वागण्यावर.

"होईल सगळे नीट ,पण हे दिवस ही आठवतील तिला ,कशी ती तुझ्याशी बोलायची ,कसे तिचे नखरे असायचे..हे कधी तरी नक्कीच आठवेल बघ..वीणा तुझ्या तालमीत तयार होत आहे..त्यात आता जोड प्राचीची ही आहे .." बाबा म्हणाले

वाटत नाही पण वीणा कधी सुधारणार नाही..जे गुण नको घ्यायला ते जणू घेतले होते...