पातळ भाज
भाग 42
भाग 42
आईला वीणा काही बोलली नाही पण तिची रागातील नजर जणू आईकडे बघून आग ओकत होती..
"तू जा इथून ,नकोय तू इथे माझ्या समोर "
असे विणाच्या मनात आईबद्दल येत होते पण तिने राग व्यक्त केला नाही...प्रसंग बघून आवरला राग..
"आई आहे पण एक चांगली काकू ही होऊ शकत नाही ही बाई. खूप संताप होत आहे..पण आई आहे ,आणि मर्यादा आडव्या येत आहेत.. काही होऊ दे मेधा ताईला हिच्या मुळे बघ मी आईला माफ करणार नाही रोहित्या. " वीणा
"मी काय म्हणते आता अति चर्चा नको, आईला ही चूक कळली आहे आपण त्यांना अति टोचून बोलत राहिलो तर त्यांच्या मनाला दुःख होईल ना..हो ना रोहित भाऊजी ? "
प्राचीने विणाला ही हात लावून सांगितले आता नको चर्चा आता ताई कडे लक्ष देऊ..म्हणत रोहित ,विणा, प्राची तिला हवा घालत होते ,तितक्यात मेधाची हालत बघून कोपऱ्यात रडत उभी असलेली काकू पुढे आली ,आणि तिने मेधाचे डोके आपल्या मांडीवर घेतले ,तिच्या कडे बघून बोलू लागली..
"मेधा मी तुझी आई व्हायला हवे होते ,मी तुझा सतत राग राग करत राहिले..मी तुझा तिरस्कार करत राहिले..तुला कधी लेकीची माया नाही लावली..तुला पोरकी समजत राहिले ,परके केले..तुला खूप वाटायचे की मी वीणा इतकी तुझी काळजी घ्यावी ,माया लावावी पण मी ते मुद्दाम करत नसायचे..मला माफ मला माफ कर..एक संधी अजून दे..ह्या आईला आई होण्याची संधी दे..पण कृपया अशी स्वतःला त्रास करून घेऊ नकोस..उठ आणि मला हवे तितके बोलून घे ,मला जाब विचार होतीस मला जाब विचार..मी मोठे पाप केले आहे त्याची कठोर शिक्षा दे.."
त्यांनी तिला आवाज दिला ,आणि कोण जाणे ती ही शुद्धीत आली.. तिने डोळे उघडले तर तिच्या डोळ्या समोर काकू होती ,तिचे डोके त्यांनी मांडीवर घेतले होते..आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू होते..तिच्या डोक्यावरून हात फिरवत होत्या...आज त्या वेगळ्या जाणवल्या...आई जाणवली त्यांच्यात ..तिला अचानक आई अशी हाक मारावी वाटली..आणि
"आई आई.." मेधा ने लगेच बिलगली
"मेधा आई म्हणून तू मला शिक्षा दिली जणू..पण ही शिक्षा मी कायम भोगायला तयार आहे..ह्या शब्दासाठी तू अतुरली होती आणि मी तो ऐकायला लागू नये तुझ्या कडून म्हणून जबाबदारी झटकून टाकत होते...
प्राचीला सगळ्यात जास्त आनंद झाला होता ,वीणा ही खुश झाली होती..रोहित ने लगेच दादाला कॉल करून बोलवून घेतले..अंबुलेन्सला नको म्हणून सांगितले होते..पण डॉक्टर येत होते..
"आता जीवात जीव आला ताई आमच्या " प्राची
"हो बघ ताई अर्धा तास खूप कठीण होता ,हे बघवत नव्हतं..मी तर आता चक्कर येऊन पडते असे वाटत होते हा.." वीणा तिला किस करत म्हणाली
"Bp लो होत असतो ,असेच घरी ही होते..ते ही खूप घाबरतात..आम्हाला असे कोणी नसते अश्या वेळी सोबत करायला.." मेधा
मेधा आता काकुला हळूच म्हणाली ,"आता तू चूक कबूल केली आहेस ,आता पुन्हा पुन्हा त्यावर माझ्या आईला त्रास झालेला मला नाही आवडणार..तसे ही तो past होता..गेलेले माणूस माफ करते..त्यात आईने माझी जबाबदारी तुलाच सोपवली होती मला लक्षात आहे...तू बाहेर उभी होतीस पण तिने मला सांगितले होते आता इथून पुढे ती उभी आहे ती तुझी आई आहे...मोठी आई...ती जरी रागावली तरी तू आईवर रागवू नकोस.. कधी कधी आई खूप उशीर बाळाला जवळ घेते..पण घेतेच.. तू मात्र तिचा पदर सोडू नकोस..मी असेन नसेल तीच असणार आहे.."
हे बोलून मेधाला तर काकूने कवटाळून घेतले होते ,खऱ्या अर्थाने उशिरा का असणे तिने हे आईपण स्वीकारले होते..मेधाची आई झाली होती
"सगळे खुश आता ,आता आपली आई,आई झाली आहे.. तसे ही मी लहानपणी म्हणत होते आई माझ्या ही पेक्षा कोणी तरी लहान बहीण आण... ही वीणा ताई खूप त्रास देते..ही नको.."
रोहित पुन्हा त्रासिक वातावरण हलके फुलके करत सगळ्यांना हसवण्यासाठी पांचट जोक मारत होता...
"हे बघ बघ बाकी कोणी हसो की न हसो त्या दोघी तुझी बहीण आणि वहिनी हसल्या...पण मला तू कधीच हे चिरी मिरी जोक सांगून हसवू शकत नाहीस..." वीणा
"वीणा ताई तुम्हाला ही आता एका बंधनात बांधण्याची मी आणि मेधा ताईने जबाबदारी उचलली आहे " प्राची मेधा कडे जाऊन बसत म्हणाली
"नसेल बंधन मी गळ्यात मारून घेणार नाही हा.."
"तुमचे आवडते बंधन आहे ते.." प्राची मुद्दाम कोड्यात बोलत होती वीणा चिडत होती
"मी लग्न करणार नाही ,कधीच जोपर्यंत माझे स्वप्न पूर्ण होत नाही..कोणी त्याला परवानगी देत नाही तोपर्यंत.." विणा नाक मुरडत
तिचे नाक मुरडले तोच रोहितने तिचे नाक पकडले ,आणि तो म्हणाला ,"जरा ऐक तर कोणते स्थळ आले आहे ,आवडले तर हो म्हण ,नाहीत नो म्हण..मेधा ताईच्या सासूने आणलेले स्थळ असेल तर फुकटात घरी डॉक्टर येत जाईल.."
"नको रे कश्याला चिडवतोस तिला. " दादा तिचे नाक ओढत
"तू पण तेच कर.." वीणा त्याचा हात चावत
"वीणा ताई मी वहिनी आहे ,आणि मी मेधाताई च्या सोबत मिळून हे स्थळ बघून आलो आहोत..स्थळ खूप चांगले आहे..तुम्हाला आवडेल नक्की.." प्राची तिला अजून चिडवत
विणा आता सगळ्यांकडे रागाने बघत होती ,आधी दादाकडे बघत म्हणाली ,"काय हे कसले स्थळ आणले आहे वहिनीने..?"
"माहीत नाही बुवा !!" खांदे उडवत
मग तिने रोहित कडे पाहिले ,"काय तुला माहीत असेलच हे स्थळ प्रकरण..?"
"नाही मला स्थळ घरी आल्यावर कळते.."
"मग आई बाबा तुम्हाला माहित असेलच ना ?"
"नाही " बाबा
"वहिनीने आणले असेल ,मेधाला माहीत असेल तर आणि त्यांना आवडले असेल त्या बघून आल्या असतील कधी तर ठरवू पुढे.."
विणा हात पाय आपटत म्हणाली ,"मला लग्नाला सक्ती करायची नाही..मी मग सरळ त्यांना सांगेन कोणी तरी दुसरे आहे माझ्या आयुष्यात.. मी दुसऱ्या वर प्रेम करते...तेच माझे पहिले प्रेम आणि तेच शेवटचे प्रेम...आणि सांगेन तुम्हाला जर माझ्या सोबत लग्न करायचे असेल तर माझ्या सोबत त्याला ही स्वीकारावे लागेल.."
वीणा असे बोलतच सगळे जोर जोरात हसू लागले होते ,एकमेकांना टाळ्या देत होते..तिला वाटले सगळ्यांना राग येईल तिच्या अश्या बोलण्याचा पण कोणी ही तिला तिच्या बोलण्याला सिरीयस घेतले नव्हते ,उलट रोहित आणि दादा पोट धरून हसत होते ,इकडे मेधा ही बऱ्या पैकी सावरली होती..तिचा मूड ठीक झाला होता..
"काय वेडी आहेस ग तू विणा. "
"काय झाले?"
"तू तर मुलांना तुझ्या आजूबाजूला ही फिरकू देत नाहीस मग हे कधी घडले...पहिले प्रेम..शेवटचे प्रेम..आणि नवऱ्याला सांगण्याची इतकी हिम्मत कुठून येईल.."
तिक्यात प्राची सगळ्यांना शांत करत म्हणाली, "आम्ही ठरवले आहे की वीणा ताई आपले पहिले प्रेम ,शेवटचे प्रेम पूर्ण करून मगच त्यांच्या सासरी जातील.. आणि त्यांनी म्हंटल्या प्रमाणेच होईल..जो कोणी ही मुलगा येईल त्याला त्या सांगतील की तिच्या सोबत लग्न करायचे असेल तर त्यांच्या पहिल्या प्रेमा सहीत त्यांना स्विकारले पाहिजे.. नाहीतर लग्न नकोच.."
हे ऐकताच वीणा प्राची कडे बघत राहिली आणि तिचे डोळे आनंदाने भरून आले..तिने न राहून वहिनीला मिठी मारली...
"माझे स्वप्न माहीत होते तुम्हाला..?" वीणा प्राची कडे बघत तिला हात जोडून माफी मागणार तोच प्राची म्हणाली
"स्वप्न पूर्ण करणार ना ?? कारण हे तुमचे पहिले प्रेम आहे..ते तडीस घेऊन जा..बाकी स्थळ वर्ष भर वाट बघू दे..मग ठरवू..तोपर्यंत आम्ही अमेरिकेहून येऊ..लग्नासाठी
हे म्हणताच सगळ्यांचे चेहरे पडले ,अमेरिकेला जाण्याचा ह्यांचा निर्णय पक्का झालेला दिसत आहेच तर...? म्हणजे घर सोडून लांब जाणारच आहेत तर..? त्यात प्राचीची ही साथ आहेच तर..?
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा