पातळ भाजी भाग 43
"मेधा वहिनी अभिनंदन तुझे आणि दादाचे.." वीणा खुश होत म्हणाली
तिला आपल्या साठी खुश झालेले पाहून बरेच टेन्शन कमी झाले होते..तिचेच टेन्शन होते ,तिला हे कळल्यावर ती कशी रेऍक्ट झाली असती..? त्यावर आई कश्या वागल्या असत्या..म्हणून सर्वात आधी विणानेच अभिनंदन केले म्हणजे आता बरीच लढाई जिंकली..
इकडे वीणा जी नमता नमत नव्हती तिने आपल्या वहिनीला आज मिठी मारली ,प्राचीने सगळ्यांच्या नकळत विणाचे स्वप्न कधी पूर्ण करायचा ध्यास घेतला कळले ही नाही..
"काल मी हा स्वप्न पूर्ण करायचा ध्यास घेतला होता अहो..तुमच्या नकळत मी तुमचे लॅपटॉप घेऊन ही संस्था शोधून काढली आणि नाव नोंदणी करून माझ्या अकाउंट वरून फी भरली.."
अरविंद बघतच होता हिला माझ्या मनातले कसे काय कळले ,कसे कळले की मी हाच विचार करत होता..?
"कमाल आहेस बायको..मला अभिमान आहे तुझा..आणि आता तर सगळ्यांचे मन जिंकत आली आहेस तू...आता फक्त कठीण गड बाकी आहे तो कसा जिंकशील.?"
"कोण आई ,आई आणि गड..?"
"हो गड आहे आई कठीण गड,बघ जमतोय का तुला सर करायला ??" तो हळूच कानात बोलत होता आणि बोलता बोलता आईकडे बघत होता..
"तुम्ही आईकडे बघत रहा आणि त्यांना जिंकून ही घेऊन येईल.." ती हसत
इकडे डॉक्टर येणार आहेत हे कळले होते तोच सगळे जण जरा सावरले होते ,पटा पट समोरच्या गालीच्या गोल गोल करत गुंढळून ठेवला ..
"कुठपर्यंत आले आहेत ते डॉक्टर.?" बाबा
"आले आहे ,आले आहेत.." दादा
"जा जरा थोडे काही खायला घेऊन ये मेधा ताईला.." अरविंद प्राचीला इशारा करत म्हणाला
तोच आई ही उठली आणि प्राचीला म्हणाली, "बाळा प्राची तू ही खूप थकली आहेस ,सकाळपासून तूच पळ पळ करत आहेस नुसती..तर मीच काही तरी तिला खायला करून आणते..तशी तिला गव्हाची खीर...बिना तेल तिखट असलेली आणि त्यावर गूळ अशी आवडते.."
हे आईचे बोलणे ऐकताच प्राची लगेच नवऱ्याकडे बघून डोळे उंचावत इशाऱ्याने म्हणते, "बघ गड सर होईल ,आणि तू गडाकडे बघतच रहाशील..अवघड आहे ,कठीण आहे म्हणत.."
त्या दोघांचे इशारे इशारे चालू असतांना इतके वीणा आणि मेधा बघत होत्या आणि हसत ही होत्या..
"खिदळू नका ग..तुम्हाला नुसते दात काढायला आवडते.." रोहित दोघीकडे बघत म्हणाला
तोच विणाने त्याची हळूच कॉलर पकडली आणि हळूच त्याला तिने कानात सांगितले ,"तिकडे बघ जरा...बघ जरा...शिक जरा."
"त्यात काय ,दोघे उभे आहेत..दादा आणि वहिनी.."
"मूर्ख खरी गम्मत तर आत्ता मध्ये मध्ये आहे.."
"म्हणजे..?"
"इशारो इशारो में गप्पा मारल्या जात आहेत रे वेड्या.." वीणा टिपली मारत
"मारू देत तुला काय त्यात..?"
"मला तर भारी cute वाटत आहे आपला दादा.."
"Cute काय त्यात..?? असे पाहू नये पाप लागते..मग आपल्याला ही कोणी असे चोरून बघते आणि मग गम्मत रहात नाही त्यात..."तो
"आता मला माझे स्थळ सापडले..मी तर जाम खुश आहे..पण त्यात दादा वहिनी अमेरिकेला जात आहेत हे ऐकून मन खूप दुःखी आहे..मी मोठ्या आनंदात अभिनंदन केले पण मनातून नको वाटत आहे.." वीणा तोंड पाडत
इकडे मेधा म्हणाली ,"उलट जाऊदे अग.. ते दादाचा प्रोजेक्ट असेपर्यंत चार पाच वर्षे थांबतील आणि येतील परत..पण त्यांना आपणच का आडवायचे.. आपण आपल्या पुरता विचार का करायचा ?? वहिनीने आपला विचार केला..माझा आणि तुझा ही..मला तर म्हणाल्या मी दूर असले तरी वेळोवेळी फोन करून विचारपूस करेन...विडिओ कॉल करून खबर घेईल..जमले तर येईल वर्षाने बाळ बघायला.."
मेधा विणाला चांगले सांगत होती ,रोहित ही म्हणाला "आपण आपले ही भविष्य बघतोच की..मग त्यांनी ही बघितले तर वाईट काय..? अप्पलपोटे पणा नको असा... मी ही जाईल मग तू रहाशील..मग तुझा नवरा येईल तो तुला घेऊन जाईल..मग तुला जावे लागेलच हो ना..?"
विणाला इतका विचार करून आई बाबा बद्दल वाईट वाटत होते ,आम्ही सगळे आप आपल्या वाटेने निघून जाणार..त्यांना कोण सोबत असणार.?
"रोहित्या आई बाबांचे मग काय रे..?"
"अग हा लांबचा विचार आहे..मी कदाचित इथेच असेल.." रोहित तिला जवळ घेत
"चिंता वाटते रे त्यांची खूप. " ती उदास होत
तोच रोहित म्हणतो ,"बाई तू त्या नवरा बायकोचे इशारे इशारे बघत होतीस ,त्यातून मस्त आंनद घेत होतीस तू तेच बघ..पण उदास होऊ नकोस.."
मेधा हळूच विणाला म्हणाली ,"मला वाटते तुझे स्थळ इथलेच असेन..तू कुठेच जाणार नाहीस..त्या माझे सासर ही जवळ आहे मी असेनच इथे..आता आई काकांना मी नाही एकटे सोडणार...आई वडिलांच्या प्रेमाला मी पुन्हा नाही मुकणार..."
वीणा ,मेधा दोघींनी मिठी मारली ,आणि मग रोहित म्हणाला ,"मला ही हवी ही मिठी.."
मेधा ने त्याला ही मिठीत घेतले..
तितक्यात दोघे दादा आणि प्राची इशाऱ्यातून बाहेर आले ,तेव्हा वीणा म्हणाली ,"ही जी आत्ता भाषा होती तुमची..हम्मम्म्म ती कधी शिकलात.."
"अग जमते ती हळूहळू.. जमेल तुला ही हळूहळू पण अट एकच आहे त्याला पार्टनर लागतो बरं.."
तिक्यात दारावर बेल वाजते आणि समोर डॉक्टर उभे असतात...
डॉक्टर ला बघून मेधा आवक होते...आणि ते ही मेधाला बघून आवक होता..
"अरे वहिनी तुम्ही इथे.?? तुम्ही इथे कश्या काय..?"
कोण असेल हा डॉक्टर आणि काय असेल मेधाचे आणि त्यांचे नाते..? त्यांची ओळख कशी कुठली.?
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा