पातळ भाजी भाग 46
"हम्म,पण विचार ही करावा लागेल त्यावर..इतक्या सहज मी ही निर्णय घेऊ शकणार नाही वहिनी..त्या किती ही चांगल्या असल्या तरी माझी field वेगळी आहे..मी डॉक्टर आहे..मला डॉक्टर हवी आहे.."
डॉक्टरने तर जणू नकार दिला होता..त्याला वीणा आवडली ही होती पण ...?
"पण काय हर्ष..?"
"वहिनी मला वाटतंय की मी होकार ही देऊ शकत नाही सहज ,आणि नकार ही.."
"बरं जेवून तर जा ,पोहे ही झाले आहेत.." प्राची हळूच
"नको खरंच नको.." डॉक्टर
"नको लगेच होकार नकार पण विणाच्या हातचे पोहे खाऊन बघा तर.." मेधा
इकडे रोहितला ही वाईट वाटले ,तो आता त्यांना म्हणाला ,"खरे तर तुमच्या आत्याने आम्हाला तुमच्या स्थळाबद्दल आग्रह केला होता..त्यांचे मन दुखवायला नको म्हणून बाबा तेव्हा हो बघू..सांगू म्हणाले होते...पण आज तुम्हाला पाहिले आणि वाटले जावई म्हणून तुम्हाला होकार द्यायला हरकत नाही..पण ठीक आहे तुमचे ही मत आहे..तर आम्ही आग्रह करत नाही.."
हर्षने रोहित कडे हसून पाहिले ,त्याला वाटले आपण तसे ही आत्याला म्हणालो होतो ,की तुझे उपकार मी कधी ही विसरणार नाही...रघुवीर दादाने माझ्या शिक्षणासाठी केलेले उपकार कधी ही फिटणार नाहीत..पण हे थोडे तरी ओझे कमी करण्याचा प्रयत्न करेन..त्यासाठी तुला वचन देतो की तू म्हणशील तिथे लग्न करेन...
"नाही मी काही नकार देत नाही पण विणाला आणि मला वेळ लागू शकतो विचार करायला.."
"नकार देऊन पुन्हा विचार कराल असे विणाचे स्थळ आहे हर्ष.."
डॉक्टर तर मेधाचे बोलणे ऐकून शांतच झाले..
"आम्हाला हे नाते आवडेल हर्ष.." मेधा
"पण जरा घाई होते ना ,मी आलोय कश्यासाठी आणि वहिनी तुम्ही बोलताय काय.?? मला एकदम पेचात टाकले तुम्ही..काल आत्याने आज तुम्ही.." तो गोंधळून गेला होता
"हर्ष आत्यांच्या शब्दाला आमच्या घरात खूप मान आहे..म्हणून .."
"राहू दे मेधा बाळ चर्चा पुढे नको वाढवू.." बाबा मेधाला समजावत
तसे आता रोहित आणि अरविंद इतर गप्पा मारत होते ,त्यांना ह्या शहरात येऊन किती वर्षे झाले ,किंवा ते कुठे रहातात..शहर आवडते का ?? आणि बऱ्याच राजकीय गप्पा मुद्दाम मारत होते जेणे करून त्यांना लग्न हा विषय काढल्यावर बुजल्या सारखे होऊ नये..
"तुम्ही आज जेवण करून जावे असे वाटते बाकी तुम्हाला आवडेल तसे करा. " अरविंद
"नाही ठीक आहे पोहे जमतील,चहा जमतोय कधी ही..आवडतो.." हर्ष आता खुलला
"आम्ही पाहुणे आल्यावर सगळे असेच गप्पा मारतो..आम्हाला घरी कोणी आल्यावर खूप आंनद होतो..बाबा तर आवडीने जेवण करण्याचा आग्रह करत असतात म्हणून तुम्हाला ही तसा आग्रह झाला, त्यात इतर काही वैयक्तिक कारण नाही.." अरविंद
"नाही its ok..मला ही माहीत नव्हते वहिणीचे माहेर ह्याच शहरात आहे ते..हा योगायोग "
"विणाला सांग ये घेऊन लवकर..त्यांना उशीर होतंय.." बाबा असे म्हणताच स्वतः उठले तर हर्ष म्हणाला
"असू द्या बाबा तुम्ही बसा ,मला इतका ही उशीर होत नाहीये..आहे निवांत वेळ मी थांबू शकतो..घे द्या त्यांना त्यांचा वेळ..."
"असू द्या बाबा तुम्ही बसा ,मला इतका ही उशीर होत नाहीये..आहे निवांत वेळ मी थांबू शकतो..घे द्या त्यांना त्यांचा वेळ..."
रोहित ने लगेच त्यांना मस्त टेकायला उशी दिली ,आणि त्यांना विचारले ,"आम्ही जरा जास्तच वाहत गेलो ,म्हणजे आमचेच आम्हाला पटले नाही..आता जरा त्याबद्दल रेग्रेट फिल होतंय.."
"नाही त्याबाबत मी विसरलो ही..आत्याने स्थळ सुचवले म्हणजे खास असावे.. त्यात त्यांचा मान राखत होते मी ही समजू शकतो.."
हर्ष आता हळूहळू पूर्वपदावर येत होता ,त्यात समोरून वीणा पोहे घेऊन येत होती ,ती ह्या स्थीतीत शांत आणि संयमी मुलगी वाटत होती..
तिची नजर पोह्याच्या प्लेट कडे होती ,म्हणून अगदी हळूच चालत होती..तिच्या केसांच्या बटा तिच्या चेहऱ्यावर राहून राहून येत होत्या..
तो तिच्याकडे बघतच होता ,तिला आता कुठे निहाळून बघत होता ,तिचे हसू संथ होते..कांती गोरी गोरी ,डोळे काळे भोर.. आणि उंचीला ही त्याच्या पेक्षा कमीच...आता ती मनात घर करत होती...त्याला जणू भास होत होता की तिने छान साडी नेसून ,केसात गजरा माळून पोहे घेऊन येत आहे...तिचा सुगंध मनात भरला होता.. तो एक टक बघत राहिला
"अग अग हळू चल पडशील.." मेधा
हे ऐकताच त्याची धुंदी उतरली ,"पोहे घ्या.."
"Thank you.. छान दिसत आहात.." तो
ती लगेच म्हणाली ,"पोहे छान दिसत नसतात ते चविष्ट असतात, पण त्यासाठी चव न घेता स्तुती करायची नसते..ते आधी चव घेऊन बघत असतात..."
त्याला हसू आले आणि त्याने ,"हो खरच मी विसरलो.. पण मी पोह्यांना छान दिसता असे म्हणलोच कुठे..मी तर तुमच्या ?" हर्ष
"तुमच्या काय तुमच्या ?" वीणा
"वीणाssss अति होतंय, ते पाहुणे आहेत..त्यात ताईच्या सासरचे आहेत...ह्याचे भान राहूदे.." आई म्हणाली
"हो घेते शांत.."
तितक्यात पुन्हा एक घास घेऊन हर्षने ने स्पष्टीकरण दिले..
"तुमच्या घरातील त्या समोर ठेवल्या त्या मूर्तीला बघून म्हणालो.."
"मग जिला छान दिसतेस म्हणालात तिच्या जवळ जाऊन म्हणा.." वीणा
त्याला हे कळत नव्हते की ,ती त्याची का फिरकी घेत होती...नकार दिला म्हणून असे असेल का ?? तिचे तिरसट वागणे हे दाखवत होते की, मला हा आवडला पण ह्याने मला नकार कसा दिला...नकार देणे हे तर कारण नसेल ??
हर्षने आता ठरवले की जिला छान दिसतेस म्हणालो आहोत आपण ते तिच्या जवळ जाऊन म्हणावे...ती आवडली आहे हे तिला सांगावे..नाहीतर उशीर होईल ..आणि लग्न operation कोणी दुसरेच पूर्ण करून घेऊन जाईल...
"खरंच खूप छान दिसत ही होते पोहे आणि चवीला ही मस्तच होते, आवडले तुमचे कांदे पोहे.." हर्ष एकदम हसत म्हणाला
पण हा हर्षचा होकार समजवा का विणाने आणि तिच्या घरच्या लोकांनी..?
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा