पातळ भाजी भाग 47
"खरंच खूप छान दिसत ही होते पोहे आणि चवीला ही मस्तच होते, आवडले तुमचे कांदे पोहे.." हर्ष एकदम हसत म्हणाला
पण हा हर्षचा होकार समजवा का विणाने आणि तिच्या घरच्या लोकांनी..?
"होकार होता का हा ?" रोहित
लगेच हर्ष त्याच्या कडे पुन्हा प्रश्नार्थक नजरेने बघतो..आणि मोठा श्वास सोडतो
रोहित घाबरून पुन्हा शब्द रचना बदलतो
"नाही म्हणजे मला असे म्हणायचे होत की, हो का..कांदे पोहे आवडले तुम्हाला तर..?"
"मला आवडले पण तुम्ही जे ऐकले ते ही होकारार्थी शब्द होते माझे..."
"हो पोहे आवडले हे होकारार्थी हो...ते...?"
रोहितची आणि मेधाची लगेच लिंक लागली...आणि दोघे सोबत "yessss "
म्हणाले
म्हणाले
सगळ्यांना अजून ही कळत नव्हते काय समजावे.. कसा आहे हा डॉक्टर घडीत होकार घडीत मला करू द्या विचार,घडीत नकार..घडीत माझा कुठे आहे नकार...दोघांना ही करू दया विचार..आणि आता म्हणत आहेत माझ्या कांदे पोहे आवडले..??
"नाही पण मला प्रश्न विचारायचा आहे हर्ष..?"
मेधा लगेच म्हणाली
"वहिनी आता आराम करा ,आणि आता पुढच्या काही फॉर्मलिटी असतील त्या सांगा.."
"तू कोड्यात नको बाबा बोलूस असे.." मेधा
"नाही मी सरळच बोलतो आता.."
"कुठे काय सरळ बोललास तू ,मूळ मुद्दाच कळला नाही आम्हाला... नुसताच वर वर बोलत आहेस आम्ही काय समजायचे नेमके.."
लगेच मोठा श्वास घेत तो मांडीवर थाप मारत उठला..आणि म्हणाला ,"मला तुमची बहीण आवडली आहे ..पण तुम्हाला काहीच कळत नव्हते असे दाखवत आहात...फक्त हे ऐकण्यासाठी की मला ती आवडली आहे.."
त्याने तसा आता रीतसर होकार दिला होता...त्याला वीणा आवडली होती कारण ती चांगली मन गुंतवून ठेवणारी जादूगार निघाली ,अगदी नकार नकार देण्याच्या वेळी चौकार मारला होता..तिच्या सालस रूपाची भुरळ घातली..चंचल मुलगी शांत असल्यावर किती गोड आणि सुंदर दिसते हे रूप दिसले आणि मग ठरवले हीच ती random मुलगी माझी mrs हर्ष होणार..
वीणा ही लगेच उठली ,आणि मेधाच्या बाजूला जाऊन लाजत बसली आणि थोडावेळ लाजण्याचा drama संपवून लगेच उठली..
"ही लाजणारी शांत मी तुम्हाला नक्कीच आवडली असणार..हम्म.!! आणि लगेच तुम्ही होकार कळवळा...आणि तुम्ही होकार कळवता सगळे खुश झाले..वा वा..!! विणाने नशीब काढले पण आता the बॉल is in my court.."
"हो अगदीच मी भुललो तुमच्या साध्या रूपावर.."
ती अशी त्याच्या भोवती फिरून फिरून सांगत होती ,नाक मुरडून म्हणाली "तुम्ही बुलला हो पण सुरुवातीला काय म्हणालात ,कोणी एक random मुलगी काय हम्मम ? मग काय म्हणालात मला डॉक्टर हवी आहे वीणा नको..ठीक आहे...मग म्हणालात की काय म्हणालात...?" वीणा त्याची ही फिरकी घेत होती मुद्दाम
"काय म्हणाला होता हर्ष तू..?" मेधा
"थांब ताई तू ,तू मध्ये दिराची बाजू घेऊन बोलू नकोस...बहिणीची बाजू घेऊन बोल .."
"काय म्हणालो पण मी..?"
"तुम्ही म्हणालात की मी विचार करून सांगतो ,नकार होकार काय असेल ते...नंतर मग मन डगमगले आणि म्हणाले तिला ही विचार करायला वेळ द्यायला हवा.." वीणा
"हो चूक काय होती त्यात मॅडम.?"
"बघा त्यांना हे कळत नाही की स्वतः होकार दिला आहे तर आता तिचा चान्स आहे...तिला ही होकार नकार कलवायचा अधिकार आहे..कारण मी एक अशीच तशीच मुलगी नाही जसे हे मला समजतात..एक सो कॉल्ड ramdom मुलगी नाहीये मी...मला माझ्या चॉईस आहेत...मी ही रिजेक्ट करू शकते...तुम्हाला नकार ही देऊ शकते..."
तिला खरंच एका दृष्टितने त्याचा राग ही आला होता हे काय random म्हणजे काय असते,कोणी मुलगी रस्त्यावर पडलेली असते का?? की तिच्या घरच्यांना इतर स्थळं मिळत नाहीत...आता तर त्याने ह्या बद्दल तिची माफी मागावी हेच तिला वाटत होते..
"मी तुमच्या होकाराची वाट बघेन.."
तो नाराज होत निघाला होता ,तितक्यात आई बाबा तिला रागवत म्हणाले ,"कारटे काय आहे हे,इतके चांगले नाते जे स्वतःहून पुढे येऊन हात मागत आहेत तर होकार दे..आणि काय ग इतके त्या random की काय म्हणतेस ते..? इतकी काय तुला टोचणी लागली त्या शब्दाची.."
वीणा त्याने हात झटकून म्हणाली ,"मला ही होकार द्यायचा आहे..रीजेकॅशन द्यायचे नाही..पण हे नाते सुरू होण्याआधी त्यांनी ही त्यांचे हे शब्द माघारी घ्यावे..कारण त्यांना लग्नानंतर कळेल मी random नाही..मी वेगळी आणि खास आहे."
त्याला आता कळले ही इतकी हट्टी का झाली आहे ,इतकी अडून का बघत होती होकार देतांना.. तो ही पुढे आला
"मला खरंच माफ करा मॅडम मी चुकलो.."
"अजून एक आहे ,ती चूक दुरुस्त करा.."
"कोणती चूक आता..बाप रे किती ह्यांचे बारीक लक्ष असते छोट्या छोट्या चुका ही सुटत नाही..मी माघार घेऊ असे नको वाटायला आता .."
तिने लगेच मेधा ताई आणि प्राचीकडे बघितले आणि डोळ्याच्या इशाऱ्याने त्यांना सांगितले ,कशी वाटली गम्मत..कशी घेतली फिरकी..."मग काय देऊ का होकार तुझ्या दिराला."
"तुझी मर्जी ठरव लवकर नाहीतर त्याला ही खूप मुलींचे स्थळ सांगून येत आहेत हो.."
तितक्यात रोहित म्हणाला, "मॅडम जास्त उशीर घातक ठरू शकतो..व्हा पुढे द्या सिग्नल.."
ती हसत लाजत पुढे गेली आणि,तिने बाजूच्या फुलदणीतून एक प्लास्टिक चे फुल घेतले आणि त्याच्या समोर उभी राहिली आणि हसून डोळा मिचकवला..
"होकार नक्कीच समजू.?"
"आधी एक गोष्ट सांगायची राहिली आहे.."
"काय सांगून टाका मॅडम घस्यात अडकल्या सारखे करू नका.." तो गंभीर होत
"मला वीणा म्हंटलेले आवडते..मॅडम नको" ती
आता तो फूल देण्याची वाट बघत होता ,ती आत्ता फुल देईल नंतर देईल..पण ती हातात फुल घेऊन उभीच इशारे करत होती ,त्याला तिचे इशार कळत नव्हते..
"आता काय हे वीणा..?"
"अरे हे फुल तुझ्या हातात घे आणि गुढग्यावर बसून मला लग्नाला प्रपोज कर तरी.."
तो आणि बाकीचे डोक्याला हात मारून घेत होते..सगळ्यांनी तिला पाठीत एक लावून दिला...
"हे ठीक नाही ,कांदा पोहे मीच करू ,चहा मीच करू..होकार शेवटी मीच देऊ मग यांनी निदान फुल तरी द्यावे की नाही.."
"नुसते फुल ही दिले असते,पण तू आजच गुढग्यावर बसायला सांगतेस हे ठीक नाही नाही.."
रोहित तिला ओरडून म्हणाला आणि सगळे हसत राहिले...
"मग पुढे आपण मेधा ताईच्या सासरी बैठक घेऊ का..लग्नाची तारीख आणि इतर गोष्टी बाबत बोलण्यासाठी ? बाबा म्हणाले
सगळ्यांचे एक मत झाले आणि ठरले की ह्याबाबत आता आत्याला ही सांगायचे..पण आता जर मेधाचे आणि आत्याचे पटत नव्हते तर आत्या ह्या आनंदाच्या निर्णयात मोडता तर आणणार नाही ना..?
क्रमशः
©®अनुराधा आंधळे पालवे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा