पातळ भाजी भाग 49
आता वीणा ही तिला जाळ्यात ओढणार होती ,स्वतःला जर मेधा एकदम हुशार समजत होती आणि त्या नुसार मुदाम ननंद म्हणून प्राचीची परीक्षा घेत होती तर आता साध्या सुध्या प्राचीने ही तिला हिसका दाखवायचे ठरवले..
असा धडा की त्या पुन्हा तिच्या वाट्याला जाणारच नाहीत
बघू प्राची कशी स्वतःला वाचवते आणि मेधाला अडचणीत टाकते ते
-----
"म्हणजे सासूबाई चांगल्या मनाच्या आहेत ,त्या बाबांचा स्वभाव ओळखतात ,आईचा स्वभाव ओळखून आहेत..त्यात वीणा त्यांना बघताच हर्ष साठी योग्य वाटावी म्हणजे माणसाची योग्य पारख आहे तर त्यांना..जसे समोरचा वागतो तश्या त्या वागतात तर हे एकंदर कळले मला.."
प्राचीने आता योग्य तीर मारला ,आणि तो निशाण्यावर लागला ,मेधा गडबदली आणि प्राची तिचा चेहरा बघत होती .
"काय मेधा ताई बरोबर ना मी ओळखले ते."
प्राची हसत म्हणाली...
"ते ते तश्या चांगल्या आहेत ग..! पण सासू सुनात होतेच ना कुठे ही असे वाद..सुरुवातीला धाकात ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न होता, नौकरी करायची कश्याला, घर कामाला बाई कश्याला ?? स्वयंपाक आधी का शिकली नाहीस..? घरातील कामाकडे आणि काय चालले ह्याकडे तुझे लक्षच कसे नसते..? "
"हम्मम असे तर..म्हणजे तुम्ही ही घरात लक्ष देत नसायच्या का ताई.." प्राची मुद्दाम
"मला तर खूप सासुरवास दिला ग ह्यांनी..मी होते म्हणून टीकले तिथे नाहीतर कोणी सून देत नव्हते त्यांना..त्या कजाग होत्याच ,आहेतच तश्या.."
मेधा आता फक्त एक बाजू सांगत होती पण आता तिला लपवा लपवी करणे अवघड झाले होते ,कारण आपण जर प्राचीला ही असेच प्रश्न विचारत आहोत तर ती ही आपली परीक्षा घेणारच हे कळले होते...
मेधाला टेन्शन नको यायला हे सांभाळून मध्ये मध्ये प्राची तिचा सूर ऐकून घेत होती ,तिला अगदीच घाबरून ही सोडायचे मन नव्हते होत पण थोडी सूट दिली ,मान दिला तर लाडक्या ननंद बाई डोक्यावर नको बसायला म्हणून आज जे ऐकवले त्यातून धडा घेणार हे नक्की होते..
"काय मग पुढे बोला नाsssss ताई तुम्ही गड्या.. असे मध्ये थांबू नका मस्त इंटरेस्टिंग आहे मी न ऐकलेली स्टोरी.." प्राची त्यांना लाडात येत म्हणाली
मेधा ही आता मग मूड बदलून प्राचीच्या सोयी नुसार घेत होती..तिला ही हे अति तानायचे नव्हते कारण प्रकरण तिने सुरू केले होते जे मोठी ननंद ह्या नात्याने खरे तर आगाऊपणे सुरू करायला नव्हते पाहिजे..
मेधा ही आता मग मूड बदलून प्राचीच्या सोयी नुसार घेत होती..तिला ही हे अति तानायचे नव्हते कारण प्रकरण तिने सुरू केले होते जे मोठी ननंद ह्या नात्याने खरे तर आगाऊपणे सुरू करायला नव्हते पाहिजे..
मेधाने मोठा श्वास सोडला ,तिकडे अरविंद तिच्या कडे हसून बघत होता..रोहित ही म्हणत होता मी येऊ का गप्पा मारायला ,गप्पा आणि ननंद भावजय ह्यांची बट्टी जमली आहे तर मी ही मध्ये येतो मज्जा येईल...
इकडे आधीच मेधा टेन्शन मध्ये होती ,अजून जर हे आले आणि ह्या प्राचीने गमतीत जर पोल खोल केली हसत हसत तर माझी इज्जत जायची.सगळे मलाच रागात बघायचे...
"बोला मेधा ताई त्यांना ही बोलवू का इकडे..त्यांना ही ऐकायला आवडेल..पण राहू देऊ..त्यांना तर हे आधीच माहिती आहे..त्यांचे घर आहे..आप आपसात मिसळलेले आहेत..त्यांना सगळे माहीत असते..मी तर माहेरी गप्पा मारत असते.."
"प्राची अग खरंच चुकले मी,मी नव्हते असे बोलायला हवे होते..मी स्वतः सासुरवाशीण आहे आणि मी एका त्रासलेल्या नवीन वधूला आणि तिच्या अवस्थेला चांगलीच जाणून आहे तरी मी असे खुडसाळ पणे बोलून गेले मी चूक केली...पण सतत सतत बोलू नकोस..मला त्रास होतंय.."
"आता कळतंय ना,पण मगा स्वयंपाक घरात ही तुम्ही अमेरिकेत जाण्याबद्दल ऐकले आणि लगेच माझ्या कडे संशयाने पाहिले ,जणू मी म्हणाले आपण अमेरिकेला जाऊ..म्हणून मी तिथून निघून आले ,मला कळले तुम्हाला किती ही जीव ओतून जीव लावला तरी तुम्ही सासरच्याच राहणार..ताई ताई करा पण तुम्ही ननंद राहणार हेच खरे हो ना.."
मेधाने आता तिला हात धरून समजवले ,प्राची चिडणे साहजिक होते ,आणि तिने वेळीच खुलासा करणे ही योग्य होतेच..का चांगले वागून सहन करावे..का तर नवीन आहे..ह्या काळात नवीन मुलगी काही बोललेले कान आणि मान पाडून ऐकून घेते..!!
प्राची ही शांत झाली ,तिला एकीला नीट करायचे होते ,जुडायचे ही होते..तिने ठरवले जोडायचे ही आणि वेळ आल्यावर नीट करायची ही हिम्मत ठेवायची..
प्राचीने डोळे पुसले तोच अरविंद ने तिला डोळे पुसताना पाहिले..आणि तो धावतच आला..
"अग प्राची काय झाले ग..?"
प्राचीला वाटले उगाच नको भावा बहिणीच्या नात्यात वाद..नाहीतर ह्यांचे माहेरपण जास्त काळ टिकणार नाही..ते ही माझ्यामुळे..तर तिने लगेच सांगितले
"आपल्या मेधा ताईच्या सासूबाई जरा त्रास देत असतात ,त्यांचे ते ऐकून मलाच रडू आवरले गेलें नाही मला मी आठवले.." ती रडत डोळे पुसत
इकडे तो ही हळवा झाला,त्याने तिला लगेच मिठीत घेतले..तिच्या डोळ्यांचे पाणी पुसले..
तर इकडे मेधाला कळले अरविंद किती जीव लावतो प्राचीला ,हा तर सहन करणार नाही माझे प्राची सोबतच असले तसले वागणे..जर तो स्वतःच्या आईचे ही असे तसे वागणे सहन करत नाही विनाकारण तर मी कुठली कुठे..?
"आता तुम्ही जा ,आणि हर्ष सोबत गप्पा मारा ,आणि जाणून घ्या नीट त्यांच्या बद्दल..पुन्हा वीणा ताईला कसला त्रास नको.." ती
"वीणा ताईला त्रास नाही ,वीणा ताई त्याला त्रास देईल असे हे अनोखे नाते असणार बघ..तुझ्या सारखी मुळूमुळू रडत बसणारी ती नाही बघच..कसे दोन ऐकायचे दोन ऐकवायची सवय ठेव..सगळे सरळ ,जिथल्या तिथे हो की नाही मेधा ताई..तू ही तेच करायची हो ना ?? "
आता तर मेधा गार झाली ,तिच्या कडे प्राची बघत राहिली..
इकडे अरविंद उठून गेला होता..
पुढे काय होईल ,मेधा बाई कशी सरळ होईल बघू..
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा