Login

पातळ भाजी शेवटचा भाग 50

पातळ
पातळ भाजी भाग 50


वीणा ताईला त्रास नाही ,वीणा ताई त्याला त्रास देईल असे हे अनोखे नाते असणार बघ..तुझ्या सारखी मुळूमुळू रडत बसणारी ती नाही बघच..कसे दोन ऐकायचे दोन ऐकवायची सवय ठेव..सगळे सरळ ,जिथल्या तिथे हो की नाही मेधा ताई..तू ही तेच करायची हो ना ?? "

आता तर मेधा गार झाली ,तिच्या कडे प्राची बघत राहिली..

-------

"राहुद्या मेधा ताई आता ना झाले गेले विसरून जा मी काही बोलले नाही ,आणि तुम्ही काही सुरुवात केली नाही असे समज..आंनद घ्या..पण लक्षात ठेवा चांगल्या व्यक्ती सततच चांगल्या राहतील असे नाही..चांगले वागणे परिस्थिती नुसार आणि माणसा नुसार बदलते ,बदलावेत लागते..मी त्यावर नेहमी अमल केले आहे..पण हे तुमच्या बाबतीत नको व्हायला ,माहेर न तुटण्याची जबाबदारी ही सर्वस्वी जबाबदारी लेकीचीच असते ,वहिनी तर निम्मंत असते जोडून ठेवण्याचे..उद्या अजून कोणी येईल..तिला तुम्ही बोलायला जाल ते कसे कोण सहन करेन.."

मेधा ही तिला होकार देत पुन्हा नमते घेते..आणि पुन्हा प्राची तिच्या गळ्यात पडते.

"मग सांगू का गम्मत पुढची.?"

"हो हो मग सांगा सांगा.."


"खूप आग्रह केला तुम्ही हे स्थळ पहा..पण काका तेव्हा त्यांचे मन ठेवण्यासाठी हो बोलून तर गेले होते..मग ह्यांना ही त्या म्हणाल्या बघ सांग त्यांना ,हर्ष चांगला आहे..पण माझे आणि त्यांचे वाद झाले आहेत ग...मी त्यांना ही गोड बातमी देणार होते पण नेमके वादावर गेले प्रकरण..इतके ही हे म्हणाले तू इथे राहू नकोस ,लगेच माहेरी जा..अरविंदला बोलव..तुझ्या माहेरी सुख घे..तिथे काळजी घेणारे असतील...शेवटी माहेर आहे..इथे राहिलीस तर तुला ह्या अवस्थेत खूप त्रास होईल ,त्रासच होईल..."

मेधा पुन्हा हे सांगून प्राचीला भावनिक करण्यासाठी तिने रडणे सुरू केले ,आणि बिचारी प्राची नाही म्हणता भावनिक झाली ही..


प्राचीने रडणाऱ्या मेधाला सावरायचा प्रयत्न केला, तिचा bp लो झाला होता तसा व्हायला नको म्हणून ती तिला धीर देत होती..सासरी त्रास मिळत आहे हे तिने आत्ता प्राचीला सांगितले होते ,पण या आधी सांगितले ही नव्हते..आणि म्हणूनच त्या घरी आल्या..त्यात ही इथे आराम नाही.. आणि त्यात सासुबाईचे ते सत्य अजूनच जिव्हारी लागले होते...जे विसरायचा अविर्भाव तर आणत आहेत पण विसरले जाणे शक्य नाही..आता फक्त माहेर असावे टेकायला आणि बाळाला मामा असावेत आजी आजोबा असावेत म्हणून निमूठ हे कडवे सत्य गिळून घेत आहेत..काकुला आई म्हणत आहे..पण ज्याचे त्याला माहित आहे .

"चला आता आपल्याला पुढे ही कार्यक्रम पार पडायचे आहेत...तुमचा दोन्ही कडून मान मोठा आहे...एकीकडून काकू तर एकीकडून मावशी होणार आहात ताई...तुमचाच पायगुण आहे..की वीणा ताईला दोन दोन आनंदाच्या बातम्या मिळत आहेत..आणि ह्या पिल्लुचा ही.." प्राची मेधाचा पोटाला हात लावत म्हणाली..

"आंनद तर आहेच मोठा..हेच मी नेहमी विणासाठी मागत असते ,तीच आधार होती माझा ह्या घरात काका नंतर.."


"ताई खरंच सांगू का तुम्हाला मला जे कळते त्या नुसार, जर अगदीच सासुरवास असेल तर तुम्ही तुमच्या लेव्हल वर निवाडा करा..मी किंवा इतर कोणी ही ह्यात पडले तर नाते उसवत जातील ,सांभाळता येणार नाहीत ,आणि मग भाऊजी आईला ही सोडू शकणार नाही..बाकी तुमची मर्जी..त्यासाठी घ्या एक पाऊल मागे ,सांगा त्यांना ही गोड बातमी..आणि बघा तर काय होईल...आणि ही बाळाच्या मावशी काकांची ही बातमी सांगा..त्या धावत येतील की त्यांचे म्हणणे ऐकले कोणी तरी..त्यात बाळ होऊदे दे असे ही म्हणत असतील त्या तुम्हाला ,तर ते ही सांगा तुमचे ऐकले आहे आई..आता आजी होण्याची करा घाई.."

"हो ग खरंच करावा वाटतो फोन पण त्या परत तश्याच वागल्या तर....मी पुन्हा दुःख करत बसेन ग.." मेधा


तेव्हा सगळे त्या दोघींकडे आले होते ,आई ,बाबा,वीणा आणि रोहित अरविंद त्यात विणाच्या बाजूला हर्ष उभा होता..

"वहिनी आत्या सोबत बोला ,त्या खूप खुश आहेत ,त्यांना तुम्ही आता तुमची ही गोड बातमी सांगून डबल खुश करा आम्ही तर आमची बातमी कळली आहे..पण वाटले तुमची बातमी आम्ही का सांगायची...ही बातमी तर होणाऱ्या आईने होणाऱ्या आजीला सांगावी..तो तुमचा हक्क.."

मेधा सगळ्यांकडे बघत होती ,तिला वाईट वाटत होते की मी ही हिम्मत करू शकत नाही त्यांचे माझे कधीच पटले नाही तर मी त्यांना कसे सांगू..त्या त्यावर रागावतील..मलाच उशिरा सांगितली..सगळ्यात आधी माहेरच्यांना सांगितली..

"ताई सांग मला हे बघायचे आहे की त्या कश्या आनंद व्यक्त करतील.."

"हो ग मेधा सांग त्यांना कळू दे ही बातमी लवकर..आणि येऊ दे पळत आपल्या घरी .."
बाबा म्हणाले

आईने ही मम म्हणत आग्रह केला...आणि हिम्मत एकवटून मेधाने फोन केला..

"आई तुम्हाला काही सांगायचे होते.."

"हो हो कळले ते लग्न पक्के करण्यासाठी आपल्या घरी येणार आहे तुझ्या माहेरचे..मला वाटले तसेच केले तुझ्या काकांनी ,मानच ठेवला माझा..आणि हर्ष ही खुश आहे खूप..त्याने ही मान ठेवला माझा..पण तू ..?"

"हो आई मला तेच सांगायचे आहे ,मी ही मान ठेवला आहे हो तुमचा..तुम्हाला नातू हवा होता ना..तर त्याची गोड बातमी द्यायला फोन केला आहे..बघा आता माझ्याशी पुन्हा ह्यासाठी तुम्ही भांडायचे नाही हा कधीच..मी जशी तुमची इच्छा पूर्ण केली आहे तशी तुम्ही ही ....माझी इच्छा पूर्ण कराल ना..?"

फोन वर बोलता बोलता मेधाला रडू अनावर झाले होते ,तिला सासूबाईला ही बातमी देत असताना उर भरून येत होते..तिने रडू आवरता येत नसल्याने फोन ठेवला

तोच सासूबाईंचा फोन परत आला आता त्यांचे उर भरून आले होते आणि त्या मेधाने दिलेली बातमी ऐकून खूप भारावून गेल्या होत्या...

"मेधा मला मरण्याच्या आधी तू आजी होण्याचे सुख दिलेस हेच खूप मोठे उपकार आहेत ग पोरी ,आता मी बघ तुला अजिबात त्रास होऊ देणार नाही ,तुझी लेकी सारखी काळजी घेईल मी तुझे इच्छा अगदी पूर्ण करेन...मी आताच पळत येते तुला घरी घेऊन यायला..आणि तू फक्त बसायचे आणि घरात काय कसे व्हावे ते तू तुझ्या आवडीनुसार होते का सांगायचे..त्यात ही लगीन घाई आली आहे ती ही तू बसून राहून तयारी करायची..सुखी रहा पोरी.."

सासूबाई खुश होत्या हे पाहून मेधा खुश होती ,सगळे खुश होते ,आता लग्न ही आणि बाळंतपण ही ह्यात घरातले अगदी उड्या मारत होते..

तर इकडे प्राची आणि अरविंद आता सगळ्यांना शांत करत सोबत बसून त्यांची मनाची तयारी करत हे सांगायला उभे राहिले होते की आता

"ह्या तयारी आमची साथ ही फक्त महिनाभर असेल..त्या नंतर आम्ही आमचे स्वप्न पूर्ण करायला अमेरिकेला जाणार आहोत आणि ते पक्के झाले आहे..दोघांचा व्हिसा तयार होत आहे..पण त्यात कोणी ही नाराज व्हायचे नाही..आम्ही लग्नासाठी आणि बाळाला बघायला नक्की येऊ..."

आईला बाबा म्हणाले," सगळ्यांचे स्वप्न पूर्ण करणाऱ्यांची ही स्वप्न पूर्ण व्हायला हवेत ना मग अरविंद आणि प्राचीला आपण हसत निरोप देणार आहोत ,एक महिना ते सोबत आहेत ,त्यात प्राची काही दिवस माहेरी जाणार असेलच..निदान तोपर्यंत सगळ्यांनी तिला आठवणीत राहतील असे क्षण देऊ.."

बाबांचे म्हणे पटले होते सगळ्यांनी त्यांचे ही अभिनंदन केले होते ,आता ते थांबणार नव्हते..ते आपली नवी सुरुवात करणार होते ..

कथा कशी वाटली नक्की कळवा ,ही 50 भागांची कथा लिहिण्याचे धाडस पहिल्याच वेळेस केले आहे ,काही चढ उतार आले आहेत..वाचक येऊन गेले जोडले गेलेले.. पण मी हिम्मत खचू न देते पुन्हा वाचकांसाठी लिहीत राहिले देवाचे नाव घेऊन..आवडली असल्यास कंमेंट करत जा कारण सोपे नसते घर सांभाळून ,नौकरी सांभाळून आणि स्वतःचे मूड सांभाळून लिहिणे..पण काही नियमित वाचक बळ देतात त्यांच्यासाठी लिहिते हे मनाला समाधान..

©®अनुराधा अंधाळे पालवे

अष्टपैलू स्पर्धा 2025 साठी लिहिलेली ही दीर्घ कथा..