Login

पातळ भाजी भाग 48 रेपोस्ट

पातळ
पातळ भाजी
भाग 48

अरविंदला आता विणाचे स्थळ जमणार म्हणजे अमेरिकेला जाता जाता एक आनंदाची बातमी घेऊन जाणार हे पाहून मनात आंनद झाला होता..

प्राची ही त्याचा आंनद पाहून खुश होती.. पण तिला आता एक शंका येत होती ,ती आत्ता सध्या कोणाला ही त्या बाबत सांगू शकत नव्हती


प्राची लगेच मेधा ताईकडे जाते ,"तुम्हाला आज आराम हवा होता ,आवश्यक होता ताई.."

"अग आरामात आहेच की मी.." मेधा


"नाही आराम म्हणजे आराम हवाच..आणि आज हे असे होत आहे नुसता गलबलाट आहे घरी. "


"हा तर हवाच ना प्राची वहिनी..मी खुश आहे आणि त्यामुळे मी दुखणे विसरून गेले ग अगदी.."


"हो हे स्थळ कसे अचानक जुळले कमाल झाली ही तर.." प्राची आनंदात म्हणाली

"हो अगदी मनी ना ध्यानी घडून आले.." मेधा

"ह्यालाच म्हणतात योग जुळणे.."


"असे सहज नाही जुळले आधी फासे पडले होते मग त्या नुसार हे योग जुळले..." मेधा तिला समजावून सांगत होती

तेव्हा प्राची लक्षात आणायचा प्रयत्न करत होती " हे मी असतांना झाले की त्या आधी..?"

"तू असणारच घरात अशी काय करतेस परवा आल्या होत्या की त्या, तू असतेस की नाही घरात..तुला लक्षात ही राहू नये..की तू घरातल्या घरात असून ही घरातच नसतेस गsss..! की माहेरी फोन मध्ये असतेस सतत..हे घर आता तुझे आहे लक्ष देत जा..मिसळून जात जा जरा.."

प्राचीला हे बोलल्याचा राग आला होता ,खरे तर ती जुळते घेत होती पण असे कोणी मनाला लागेल असे बोलले की मन होत नसे मिसळून जाण्याचे ह्या सासर च्या लोकांत...अजून लोकच आहेत हे तिचे मन म्हणत होते..

इतकी चांगली बोलते मेधासोबत ,तिची काळीज घेते प्राची तरी मेधा तिला टोमणे मारतच होती..

"मी उठते इथून ताई किती ही करा परक्या मुलीला सहज कोणी आपलेसे करत नाही हेच बरोबर.." प्राची रागात

मेधाला कळले तिला राग आला होता मेधाच्या तुसड बोलण्याचा ,तिने उगाच पुन्हा वाद नकोत म्हणून सावरून घेतले..

"बस ग खाली तू,इतकी पटकन रागावतेस कशी ?" मेधा हात पकडत म्हणाली आणि एक कुश्चित हसू आणत तिने विषय बदलला..

"मी तशी ही फार दिवस नाही ह्याचे दुःख करते,पण जाता जाता मला ही भावना निर्माण होईल की बरं झालं आपण लांब रहायला जात आहोत..." प्राची मनातले बोलून गेली

"अग सासरी मिसळ म्हणाले तर त्यात राग येण्यासारखे काय होते हम्म?" मेधा प्राचीला खुन्नशीने म्हणाली..तेव्हा तिला प्राचीचा राग आला

"मी चांगली आहे पण मर्यादेत आणि थोडी मर्यादे पलीकडे..मला हे असे दुट्टपी वागणे नाही समजत म्हणून मी सरळ वागते..जमले तर बोलते नाहीतर अंतर ठेवून रहाते...पण समोरच्या ते करायला भाग पाडत नाही जे आपण स्वतः आपल्या सासरी करत नाही.." प्राचीच्या बोलण्याचा इशारा आता मेधाला कळला होता..

मेधाने तरी पुन्हा आता तिला डीवचण्याचा नाद सोडला होता आणि हे आपल्याला भारी पडू शकते जर आपण आपली मर्यादा ओलांडली आणि प्राचीचा अपमान केला तर..

"बरं सॉरी वहिनी जास्त बोलते मी.."

"असू द्या तुम्ही आहातच किती दिवस अश्या ,तुम्हाला घेईल सहन करून.." प्राची

मग मेधाने लगेच कानाला खडा लावत विषय तिथे नेला जिथे प्राचीला माहीत नव्हते की या आधी हे स्थळा बाबत बोलणे कधी झाले.. म्हणजे वातावरण थंड होईल..


"आधी माझ्या सासूबाई आपल्या ह्या घरी आल्या होत्या ,त्या बराच वेळ थांबल्या होत्या..जेवण करून गेल्या होत्या आणि त्यांना विणा कडे बघून काय वाटले आणि त्यांना हर्ष आठवला.."

"मग काय पुढे.?" प्राची


" आणि त्या म्हणाल्या विणासाठी स्थळ आहे...तुम्ही हो म्हणा मी लगेच हर्षला फोन करते..त्याला मुलीच्या बाबतीत सांगते..आणि त्यांनी फोन केला ही होता लगेच तिथल्या तिथेच..."

"तुमच्या सासूबाई इतरांचे चांगले करतात म्हणजे, इतरांच्या मुलीला चांगले स्थळ मिळण्यासाठी इतके कोण करते..तरी तुमच्या शी असे कसे वागू शकतात त्या ,प्रश्नच पडतो..नेमके कुठे चुकते ..?"

"अग त्या लोकांना दाखवायला चांगले वागतात ,त्यांना माहीत आहे की मेधाचा माहेरी मेधा माझ्या बद्दल वाईट सांगत असेलच..मग काय त्या मी किती चांगली सासू आहे हे भासवण्यासाठी चांगल्या वागतात काय ,काकांना भेटायला दरवेळी न चुकता घरी येतात काय.. आणि त्यांच्या सोबत गप्पा तर अश्या मारतात की जणू त्या खूप चांगले ओळखतात आपल्या घरच्यांना..त्यांची ही सवय आता मी चांगलीच ओळखून चुकले आहे..मी ओळखते पण इतरांना अजून त्या कश्या आहेत हे कळलेलं नाही..त्यांना आतून बाहेरून चांगलीच ओळखते...त्या आता जरी आल्या तर त्या तुझी ओळख विचारतील ,तुझे बाबा काय करतात ,तुमचे गाव कोणते..मग त्या गावात त्यांची हमखास ओळख निघतेच..मग तू त्यांच्या नात्यातली निघशील...तुला म्हणतील तू तर आमच्या जवळची निघालीस की ग..मग आता आपण दोघी नाते वाईक म्हणतील..पण तू ही लगेच विरघळशील.."

"असे काय..!! पण असे कोणी का करेन.? त्यांना मुळात बोलायला आवडत असेल तर त्या ओळख काढतील..काका म्हणजे तुमचे काका आणि काकू स्वभावाने चांगले आहेतच मुळात तर मी माझ्या माहेरी उगाच का त्यांची बदनामी करू..का तर ते मला सासुरवास करतात म्हणून इतरांच्या नजरेत पाडू..? मी तसे माझ्या पुरते माझ्या घरात वाईट वागेन ,रागवेन.. भांडण करेन पण तिऱ्हाईत घरी का आपल्या घरच्या सुनेला बदनाम करेन ,किंवा सून आपली बदनामी करते तर मी का जाऊन सारवासारव करून येऊ...पण तुम्ही म्हणत आहात तर घेते पटून.."


आता वीणा ही तिला जाळ्यात ओढणार होती ,स्वतःला जर मेधा एकदम हुशार समजत होती आणि त्या नुसार मुदाम ननंद म्हणून प्राचीची परीक्षा घेत होती तर आता साध्या सुध्या प्राचीने ही तिला हिसका दाखवायचे ठरवले..

असा धडा की त्या पुन्हा तिच्या वाट्याला जाणारच नाहीत

बघू प्राची कशी स्वतःला वाचवते आणि मेधाला अडचणीत टाकते ते..