पिकनिक भाग १३
कसोटी.-२
दादांना कणव आली आणि त्यांनी आमची चौकशी केली. नाव विचारल्यावर, मी तर नाव सांगितलं आणि विदिशाचं सांगणार, इतक्यात विदिशाच अर्धवट ग्लानीत म्हणाली की मी यांची बायको. बरोबर न रघुनाथ दादा?” विशाल.
“हो मला तो प्रसंग अगदी स्वच्छ डोळ्यासमोर दिसतो आहे. असंच झालं होतं.”– रघुनाथ.
“बस, त्याच क्षणी आम्ही नवरा बायको झालो.” – विशाल.
“विदिशा, हे खरं आहे?” – काका.
“हो काका. काही चुकलं का?” – विदिशा.
“काका विदिशा असं म्हणाली तेंव्हा मला काय वाटलं ते शब्दांत नाही सांगता येणार. काका विदिशा सारखी सुंदर, हुशार मुलगी आपणहून जेंव्हा म्हणते की मी तुमची बायको, तेंव्हा कुठला पुरुष आढे वेढे घेईल?” – विशाल.
“बरोबर आहे. अगदी कथा कादंबरी मध्ये दाखवतात, तसंच झालं की. मग तू काय सांगीतलस तिला?” – काका.
“तिला काहीच बोललो नाही पण वर बघून देवाला म्हणालो, की देवा इतकं सुंदर आणि गोड गुलाबाचं फूल न मागता अलगद माझ्या पदरात टाकलंस त्या बद्दल लाख लाख दंडवत. आणि असं म्हणून मी आकाशा कडे बघून हात जोडले.” – विशाल.
“तू देवाला हात जोडलेस होय, मला वाटलं की तू माझेच आभार मानतो आहेस.” – दादा
“मल्टी पर्पज आभार होते ते. तुम्ही सुद्धा देवा सारखेच धावून आलात.” – विशाल.
“आई,” छोटा उज्ज्वल म्हणाला, “विदिशा मावशी गुलाबाच्या फुलातून बाहेर आली? परी आहे का ती?
उज्ज्वल च्या बोलण्यावर सगळेच कौतुकानी हसले. रोहिणीने त्याला जवळ घेतले, एक पापा घेऊन म्हणाली की “बघ तिच्याकडे. परी सारखीच सुंदर आहे की नाही”
“हो, पण तिच्या हातात जादूची छडी कुठे आहे?” – उज्ज्वल.
“छडी अदृश्य झाली आहे. विशाल काका वर जादू केली न, काम झालं, मग छडी अदृश्य झाली.” – रोहिणी म्हणाली. विदिशा मात्र लाजेने चूर चूर झाली. तिने हाताने चेहरा झाकून घेतला.
“विशाल, बेटया भाग्यवान आहेस. पण मग आता इथपर्यंत गाडी आलीच आहे तर उशीर कशाला? पडू द्या अक्षता डोक्यावर.” – काका.
“काका, इथे चार पैसे मिळवण्याची क्षमता नाहीये, तिला कसं सांभाळणार?” – विशाल.
“विदिशाला विचारलं का, तिचं काय मत आहे ते?” – काका.
“काका विशाल म्हणाला ते बरोबर आहे. आम्ही निरक्षर आहोत. जे ज्ञान घेतलं, ज्यात प्राविण्य संपादन केलं, त्याचा आताच्या काळात काहीच उपयोग नाही. अश्या परिस्थितीत आमची पुढची वाटचाल कशी राहणार आहे, हेच जिथे कळत नाही तिथे लग्ना सारखा एवढा मोठा निर्णय कसा घेणार?” – विदिशा.
“बरोबर बोलते आहेस. परिस्थिती अचूक ओळखली आहे तुम्ही दोघांनी. इतकी एकवाक्यता सहसा कुठे दिसत नाही. खरंच प्रगल्भ आहात तुम्ही.” – काका.
“अहो, मी काय म्हणते, आपण करूया न थोडी मदत यांना. विशाल तुमचा धाकटा भाऊच आहे असं समजा. मला आवडेल विदिशा माझी धाकटी जाऊ झाली तर.” – काकू.
काकूंच्या या बोलण्याने सगळा सीनच बदलून गेला. विशाल आणि विदिशाला तर आश्चर्याचा धक्काच बसला. तिच्या डोळ्यात पाणी आलं.
“काकू किती मोठं मन आहे तुमचं, आम्ही कोण, कुठले खरं बोलतो आहोत की खोटं, असा विचार सुद्धा तुमच्या मनात आला नाही.” – विदिशा भरल्या गळ्याने बोलली. रोहिणी बाजूलाच बसली होती, तिने विदीशाला जवळ घेतलं. आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवला. म्हणाली,
“काळजी करू नकोस. आम्ही आहोत न, सगळं ठीक होईल.” – रोहिणी.
“हूं, विशाल बुद्धिमान आहे तो लवकरच वैद्यकी शिकेल. त्याने प्रामाणिक प्रयत्न केला तर माझी खात्री आहे की तो एक यशस्वी वैद्य म्हणून नाव कमावेल.”- काका
तिढा सुटला होता. सर्वांनाच आनंद झाला होता. आता रुटीन फिक्स झालं होतं. विदिशाने कामाचा बराच भार उचलला होतां. विशाल रघुनाथ बरोबर राहून सगळी माहिती करून घेत होता. असेच ३ महीने उलटले. आणि मार्च मधे एक दिवस पेपर मध्ये बातमी आली की, रशिया आपल्या अंतराळयांनातून युरी गागारींन या अंतराळविराला एप्रिल मधे अवकाशात पाठवणार आहे. पृथ्वीच्या प्रदक्षिणा करून तो परत पृथ्वी वर परत येईल. ही बातमी आल्यावर तर घरात जल्लोष झाला. विशाल खरं बोलत होता, याची प्रचिती आली होती. त्या दिवशी रात्रीच्या जेवणात गोड पदार्थ होते. आनंदाचं वातावरण होतं. सर्वांनाच हायसं झालं. आता विशाल आणि विदिशा कुटुंबाचा अधिकृत भाग झाले होते.
दोन एक दिवसांनी रात्रीचं जेवण आटोपल्यावर, शिरस्त्या प्रमाणे सर्व मंडळी ओसरी वर जमली.
“मला असं वाटतं की १९६० पासून २०१० पर्यन्त ज्या काही प्रमुख घटना घडल्या, देशांतर्गत आणि जागतिक, त्या विशाल, तू एका वहीत ज्या क्रमाने घडल्या तश्या सुसंगत लिहून ठेवाव्यास.” – काका.
“पण असं केल्याने काय होईल?” – विशाल.
“तो आमच्या घरातला एक अमोल ठेवा असेल. आपण ती वही जपून ठेऊ. त्या वहिला टाइप करून घेऊ म्हणजे हे हस्तलिखित हाताळल्या जाणार नाही. आणि खराब होणार नाही.” – काका.
“याने काय साध्य होणार आहे?” – विशाल.
“पुढच्या पिढीला कळेल की तुम्ही 50 वर्ष अलीकडे आला होता, आणि त्याचा पुरावा म्हणून ही वही.” – काका.
“काका, असं नाही करता येणार.” – विदिशा.
“विदिशा, असं मधे मधे बोलू नये.” – काकू.
“अहो बोलू द्या तिला. ती आता आपल्या कुटुंबाची अधिकृत सदस्य झाली आहे. तुम्ही एकदा तिला हे सांगितलं आहे, आणि तरीही ती बोलते आहे म्हणजे निश्चित काही कारण असलं पाहिजे. तेवढी ती नक्कीच सुज्ञ आहे. सांग विदिशा, काय अडचण आहे?” – काका.
“काका, मला वाटतं की, जर कुठल्याही कारणांमुळे गोष्टी लिक झाल्या, तर आजच्या परिस्थितीत त्या लोकांना पटतीलच असं नाही. त्यामुळे एखादं संकट सुद्धा घरावर येऊ शकतं.” – विदिशा.
विदिशा असं बोलल्यावर काकूंना आणि रोहिणीला अजूनच गोंधळल्या सारखं झालं.
“अग, सत्य घटना कोणाला का पटणार नाही? आता विशालने सांगितलं की तो गागारिन आकाशात जाणार आहे. आणि ते खरं झालं. तो गेला आकाशात. यात लोकांना न पटण्या सारखं काय आहे?” – काकू.
“काकू, यात आपल्या लोकांचा काही संबंध नव्हता, तो आकाशात गेला काय किंवा नाही, याने आपल्या समाज जीवनात काही फरक पडला नाही. पण आता जसं विशालने त्या दिवशी सांगितलं की चीनने १९६२ साली भारतावर आक्रमण केलं आणि भारताची त्यात दारुण हार झाली. आता सध्या १९६१ साली राजकीय परिस्थिती काय आहे? तर चीन भारत दोस्त आहेत. हिन्दी चीनी भाई भाई हा नारा बुलंद आहे. आम्ही जे सांगितलं ते जर सरकार दरबारी पोचलं, तर देश विरोधी अफवा पसरवतात असा आमच्यावर आरोप ठेऊन आम्हाला अटक सुद्धा करू शकते सरकार. आणि तुम्ही साथ दिली म्हणून तुम्हा लोकांना सुद्धा आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करू शकतात.” – विदिशा.
सगळेच हादरले. असं पण होऊ शकतं हे कोणाच्याच ध्यानात आलं नव्हतं. पण प्रकरण गंभीर आहे हे आता सर्वांच्याच लक्षात आलं.
“तुझं म्हणण बरोबर आहे विदिशा. अश्या अजून किती तरी गोष्टी काळाच्या उदरात असतील की ज्याची आता काहीच कल्पना असणार नाही. आताची परिस्थिती आणि घटनेच्या वेळेची परिस्थिती एकदम विपरीत असू शकते. पण मग काय करायचं? आमची तर खूप इच्छा आहे.” – काका.
“विशाल, तू आम्हाला तोंडी सांग. आणि आपण असं करू, की वही पूर्ण झाली की तिला सील करू आणि त्यावर लिहून ठेऊ की २०११ च्या नंतरच ही वही उघडावी. आणि ही वही आपल्या देव्हाऱ्यात ठेऊ. म्हणजे कोणी हात लावायला धजावणार नाही. आम्हाला सगळ्यांची कल्पना असणार आहे, त्यामुळे आमच्या पैकी कोणीच त्या वाटेला जाणार नाही. आणि २०१० पर्यन्त तू असणारच आहेस.” – रघुनाथ.
“तरी सुद्धा उज्जवल किंवा संपदाच्या कडून किंवा आपल्या पैकी कोणाकडूनही, जर चुकून तोंडून निघून गेलं, तरी आपल्यावर संकट येउच शकतं. उदाहरणार्थ, जवाहर लाल नेहरुचं १९६४ साली देहावसान होणार आहे, असं मी सांगितलं आहे, हे कोणाला कळलं आणि ते जनते मधे पसंरलं की तर लोकं पेटून उठतील. पंडित नेहरूंची लोकप्रियता किती आहे हे सांगायला नकोच. जन भावना कशी असते ते कधीच सांगता येत नाही. घटना घडून गेल्यावर, ६४ साली सर्वांनी ते आपोआपच नियती म्हणून अॅक्सेप्ट केलं. पण लोकांना आज १९६१ साली हे सहन होणार नाही. – विशाल.
विशालच्या बोलण्यावर एकदम शांतता पसरली. नाही म्हंटलं तरी दडपण आलं आहे हे सर्वांच्या चेहऱ्यावर दिसताच होतं. मग रघुनाथ म्हणाला,
“ठीक आहे लिखाण रद्द. पण आम्हाला सर्वांना उत्सुकता आहे. तू आम्हाला सांगू शकतो. पण सांगायचं की नाही हे तू ठरव.” – रघुनाथ.
“ठीक आहे पण आम्हाला थोडा वेळ द्या विचार करायला. मी विदिशाशी बोलतो आणि सांगतो. चालेल न?” – विशाल.
क्रमश:----
पुढचा भाग उद्या – पुन्हा एक वळण

दिलीप भिडे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा