पिकनिक भाग ४
बिकट परिस्थिती – २
“विशाल तू गोंधळात भर घातली आहे. कन्या नक्षत्र कसं समजणार?” – विदिशा.
“Y कसा असतो? खाली शेपूट आणि वर दुभंगलेला. आता दोन्ही Y ची शेपटी जोडली तर जो आकार तयार होईल ते कन्या नक्षत्र. पण हे आडवं उभं कसाही असू शकेल आपण फक्त डिझाईन बघायचं झालं.” – विशालने सविस्तर समजावलं.
“तुला एवढं डीटेल मध्ये कसं माहिती?” – विदिशा.
“इतिहास आणि खगोल शास्त्र हे माझे आवडीचे विषय आहेत. या दोन्ही विषयावर असलेली बरीच पुस्तकं मी वाचली आहे. अजूनही जी आर्टिकल येतात ती वाचतो. आपोआपच ज्ञानात भर पडत जाते.”– विशाल.
पण तू तर या दोन विषयांच्या ऐवजी अर्थशास्त्र निवडलं. त्यातच मास्टर्स केलस. हे कसं? आई वडिलांची इच्छा?” – विदिशा.
“नाही, अर्थशास्त्र हा पोटा पाण्याचा विषय. बाकी दोन आवड. इंट्रेस्ट, हॉबी.” – विशाल.
“हुशार माणसांची गोष्टच वेगळी. आमचं काय, डिग्री घेता घेताच दम निघाला.”– विदिशा.
“आणि हे कोण बोलतंय एक मास्टर डिग्री होल्डर आणि ते ही लंडन वरुन. वा.”-विशाल.
“बरं ते जाऊ दे. आपण जी लढाई पाहिली ती कोणच्या काळातली असावी? काही आकलन होतंय का? नाही म्हणजे तू इतिहासाचा तज्ञ आहेस म्हणून विचारलं. सहज कुतुहल म्हणून.” – विदिशा आता चावण्याच्या मूड मध्ये होती. ताण तणाव दूर झाल्याचं लक्षण होतं ते. विशालला ते कळलं तो हसला. म्हणाला,
“सगळं टेंशन दूर झालेलं दिसतंय चिमटे काढायला सुरवात झालेली दिसते आहे म्हणून म्हंटलं. काय! बरोबर न?” – विशाल
“मग तुम्ही घेतली आहे न टेंशन ची जबाबदारी, मग? पण काळ सांगा न. तुमची पण प्रश्नाला बंगाल देण्याची हातोटी विलक्षण आहे.” विदिशा म्हणाली अजूनही तिच्या चेहऱ्यावर मिश्किल हसू होतं. सगळं ताण निवळल्याचं लक्षण होतं ते.
“मला वाटतं की ज्या वायुवेगाने मराठे आले, जे योजलं होतं, म्हणजे छावणी नष्ट करायची हा उद्देश. एखादा झंझावात यावा आणि सगळं भुई सपाट करून शांत व्हावा या पद्धतीने छावणी नष्ट करून मराठे दिसेनासे पण झाले. अश्या छोट्या छोट्या हल्ल्यांची आखणी आणि कार्यान्वित करणं हे संभाजी महाराजांच्या मृत्यू नंतर राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत सुरू झालं. यांचे सरदार होते धनाजी जाधव आणि संताजी घोरपडे. यांच्या अश्याच अनेक हल्ल्याने मोगल सेना अगदी जेरीस आली होती. म्हणजे हा काल साधारण १६९० ते १६९५ हा असावा.” – विशाल.
“अरे देवा, इतकं सटीक आणि सखोल विश्लेषण! विशाल मला माफ कर. मी गंमतीने म्हणाले, तू मनाला नको लावून घेऊस. तू खरंच ज्ञानी आहेस. पण यांचा काय अर्थ लावायचा? आपण ३०० वर्ष पूर्वीच्या काळात फेकल्या गेलो आहोत का?” – विदिशा म्हणाली आणि तिच्या चेहऱ्यावर चिंतेची छटा उमटली. अर्थात अंधारामुळे विशालला ते दिसलं नाही पण आवाजात जो फरक पडला त्यामुळे त्याला ते जाणवलं.
“नाही मला तसं वाटत नाही. कारण आपण त्या काळात गेलो असतो, तर बसलेल्या मराठ्यांना आपण दिसलो असतो. पण तसं झालं नाही. म्हणून मला असं वाटतं की आपण आपल्याच काळात आहोत.” – विशाल.
”पण मग आपण जी लढाई प्रत्यक्ष पाहिली, त्याची संगती कशी लावायची?” – विदिशा.
“मलाही माहीत नाही. पण तर्क नक्कीच लढवू शकतो. मला असं वाटतं की आपण ज्या वेळेस खेचल्या गेलो त्यावेळेस खेचणारी शक्ति प्रबळ असली पाहिजे पण नंतर ती क्षीण झाली असणार म्हणून आपण वापस आपल्या काळात आलो. पण त्या विवक्षित क्षणी आपण बोटीत फेकल्या गेलो, ते बोट पुढे निघून गेल्यामुळे आपण बोटीतच राहिलो. आपण त्या काळात गेलोच नाही म्हणून कोणी आपल्याला पाहिलं नाही. पण क्षीण असूनही ती शक्ति अजूनही आपल्यावर कार्य करते आहे म्हणून आपल्याला त्या काळातल्या गोष्टी दिसल्या. अर्थात हा फक्त तर्क आहे. यांची पुष्टी करता येणार नाही. तुझं काही वेगळं मत असेल तर सांग.” – विशाल.
“मी काय बोलणार? माझं तर डोकच चालत नाही.” – विदिशा म्हणाली. “अरे थांब एक मिनिट, तो शुक्र तारा आहे का? साऊथ ईस्ट ला दिसतो आहे. बघ.”
“अरे हो. खरंच की नुकताच उगवला आहे. चला आता चार वाजले असावेत. म्हणजे अजून दोन तासांनी उजाडेल.” – विशाल.
मग बराच वेळ विदिशा आकाश निरीक्षण करत होती. विशालला प्रश्न विचारात होती आणि विशाल तिच्या शंकांचं निरसन करत होता. मग अचानक विदिशा म्हणाली,
“आपण खाडी वर जायचं का?” – विदिशा.
“कशाला?” – विशाल.
“अरे, असं काय करतोस? सकाळची काही कर्म असतात. सध्या तरी मला समुद्रा शिवाय दूसरा पर्याय दिसत नाही.” – विदिशा.
“चल. पण खाडीत फार दूर जाऊ नकोस. समुद्र किनारे विचित्र असतात.” – विशाल.
“ओके. मी लक्षात ठेवीन.” – विदिशा.
सगळं आटोपल्यावर विदिशा म्हणाली की,
“आपण थोडावेळ इथेच किनाऱ्यावर थांबायचं का? उजाडल्यावर मंदिर दिसेल आणि आपल्याला जाता येईल.” – विदिशा.
“अग आपण मेन लँड वरच आहोत. मंदिरात जायचं आणि पुन्हा वाळू तुडवत जमिनीवर यायचं?” – विशाल.
“पण मंदिर दिसल्यावर आपण कुठे आहोत हे तर कळेल.” – विदिशा.
“तू म्हणतेस तर थांबू आपण. पण ही खाडी आहे नदी नाही. ही फार तर मैल दोन मैल असेल. सातपाटीची खाडी आहे म्हणजे आपण त्याच परिसरात कुठे तरी असणार आहोत. थोडं चालल्यावर एखादा रस्ता, गाव, किंवा माणूस भेटेल. चिंता करू नकोस.” – विशाल.
तरी पण विदिशाच्या मताला मान देऊन दोघंही किनाऱ्यावरच थांबले. उजाडलं. पण खाडी मध्ये मंदिर कोठेच दिसेना. पाणी जवळ जवळ पूर्ण ओसरलं होतं.
“नानाने सांगितल्या नुसार सहा तासांचा हिशोब धरला तर आत्ता सकाळचे सहा वाजले असावेत.” – विशाल म्हणाला.
“”विशाल, मंदिर कुठे आहे?” – विदिशा.
“माहीत नाही. कदाचित खाडी वळण घेत असेल, म्हणून दिसत नसेल किंवा आपण खाडीच्या टोकाला आलो असू.” – विशाल.
“मग आता?” – विदिशा.
“आता काय? चालत जायचं. मघाशी म्हंटलं त्याप्रमाणे एखादा रस्ता, माणूस किवा वाहन भेटेल, मग सर्व प्रश्न सुटतील.” – विशाल.
विदिशा जवळ दूसरा पर्याय नव्हता. ती तयार झाली. दोघं जण ज्या दगडावर बसले होते, तिथे आले. आणि त्यांच्या आश्चर्याला पारावार उरला नाही. जिथे त्यांनी लढाई पाहिली होती ते एक मोकळं मैदान होतं आणि जिथे छावणी पडली होती आणि तिथेच लढाई झाली होती. पण आता तिथे दाट जंगल होतं. आणि मैदानाचा मागमूस पण दिसत नव्हता.
“हा काय प्रकार आहे? मैदान कुठे गेलं?” विदिशा जरा मोठ्या आवाजातच बोलली.
विशालला पण काही कळत नव्हतं. त्यांची पण मती गुंग झाली होती. तो नुसताच विदिशाकडे बघत राहिला. थोडा वेळ ते तसेच विस्मयाने बघत राहिले. आता स्वच्छ प्रकाश पडला होता, त्यामुळे भास अभासाचा प्रश्न नव्हता.
“चल आपण समोर जाऊ. काय भानगड आहे ते तरी कळेल.” – विशाल.
दोघं जंगलात शिरले. एक छोटीशी पायवाट दिसली, तेवढ्याने सुद्धा त्यांना आनंद झाला.
“पायवाट आहे म्हणजे नक्की समोर वस्ती आहे.” – विशाल म्हणाला. विदिशाने मान डोलावली. अजून समोर गेले तर तिथे त्यांना पुसट अश्या लढाईच्या खुणा दिसल्या. एक दोन जंग चढलेल्या तलवारी दिसल्या. थोडं समोर गेल्यावर एक कट्टयार दिसली. ती विशालने उचलून घेतली.
“विशाल, जंग चढलेली कट्टयार कशाला घेतली? जखम झाली, तर इंजेक्शन घ्यावं लागेल.” – विदिशा.
“या निबीड जंगलात आपण दोघंच आहोत. वेळ आहे प्रसंग आहे उपयोगी पडेल. तू लोड घेऊ नकोस.” – विशाल.
थोडं समोर गेल्यावर त्यांना नारळाची ३-४ झाडं दिसली आणि खाली पण दोन तीन नारळ पडले होते. कट्टयार उपयोगाला आली. दहा बारा तास झाले होते पाण्याचा थेंब पण मिळाला नव्हता. निदान तहान भागली आणि खोबरं खाऊन थोडी भूक पण भागली चेहऱ्यावर जरा टवटवी आली. विशाल बघत होता, मलूल झालेल्या विदिशाच्या चेहऱ्यावर तरतरी आली. तिचा उजळलेला चेहरा पाहून विशालच्या लक्षात आलं की विदिशा खूप आकर्षक आहे. तो तिच्याकडे मंत्रमुग्ध होऊन बघतच राहिला. विदिशाच्या ते लक्षात आलं.
“विशाल, असं काय बघतो आहेस? काही चिखल लागला आहे का चेहऱ्यावर?” – विदिशा.
“नाही. असंच. विदिशा आजवर कधी तुझ्याकडे लक्षच गेलं नव्हतं पण तू खूप सुंदर दिसते आहेस.” – विशाल.
“धन्यवाद. पण विशाल, परिस्थितीचा फायदा घ्यायचा विचार तर नाही ना तुझ्या मनात?” – विदिशाचा आता या वेळेस तिचा स्वर कोरडा होता.
“अग काय बोलते आहेस तू? तुझ्या मनाला तरी पटतंय का? मी असा तसा वाटतो का तुला?” विशाल खेदाने म्हणाला.
“सॉरी विशाल, मी असं बोलायला नको होतं. तुला दुखवण्याचा माझा मुळीच हेतु नव्हता. पण परिस्थिती अशी आहे की चांगले विचार मनात येतच नाहीत. प्लीज माफ कर मला.” – विदिशा.
“दॅट इज ओके. चल माफ केलं. पण पुन्हा असे विचार मनात आणू नकोस. आपण इथे दोघंच आहोत. एकमेकांबद्दल असा अविश्वास मनात आला तर सगळंच कठीण होऊन जाईल.” – विशाल.
“खरं आहे. मी आता लक्षात ठेवीन. माझी चूक मला कळली आहे. सॉरी” – विदिशा.
पुन्हा जंगलात वाट काढणं सुरू झालं. अर्ध्या तासानंतर, त्यांना एक झोपडी वजा घर दिसलं. अंगणात खाटे वर एक वयस्कर माणूस बाळाला घेऊन उन्हात बसला होता. एक माणूस घरातून बाहेर आला, त्यांच्या हातात कोयता होता, बहुधा शेतात जात असावा. धोतर आणि बंडी असा त्याचा पोशाख होता. डोक्याला मुंडासं होतं. त्यांची बायको धावतच बाहेर आली, तिच्या हातात फडक्यात बांधलेली शिदोरी होती. ती काय बोलली ते काही ऐकू आलं नाही.
तिला पाहून बोलण्यासाठी विदिशा समोर आली आणि तिला हाक दिली. पण तिला विदिशा दिसलीच नाही. ती तशीच मागे वळून घरात जायला निघाली. त्यावर विदिशा घाईघाईने तिच्या समोर गेली आणि नमस्कार म्हंटलं. पण ती विदिशाच्या शरीरातून आर पार निघून घरात चालली गेली. विदिशा स्तंभित होऊन विशाल कडे बघतच राहिली.
क्रमश:----
पुढचा भाग उद्या – एफ. आय. आर.

दिलीप भिडे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा