पिकनिक भाग ५
एफ. आय आर.
“विशाल सर आणि विदिशा दिसत नाहीयेत.” मग सर्व देऊळ शोधून झालं तरी विशाल आणि विदिशाचा शोध काही लागला नाही. अचानक ती दोघं कुठे गेले असतील यांचा अंदाजच लागत नव्हता. भरती आता हळू हळू ओसरायला सुरवात झाली होती, पण एवढ्या पाण्यातून ती दोघं गेले असतील हे शक्यच नव्हतं.
“असे अचानक कुठे गायब झाले असतील?” – उमेश.
“हो न, आणि विशाल सर आणि विदिशा एकमेकांना ओळखत सुद्धा नाहीत. आज सकाळीच त्यांची पालघर स्टेशन वर ओळख झाली. मग ते वेगवेगळे गेले असतील का? पण कुठे जाणार? संभोवताल तर पाणी आहे.” – वसुंधरा.
“वेगळे किंवा बरोबर कसेही गेले तरी छातीभर पाण्यातून कुठे जाणार? त्यांना तर इथली काहीच माहिती नाहीये. धरून चला विशाल सर पोहत गेले, पण विदिशा? तिचं काय? तिला पोहायला येत नाही” – साधना, विदीशाची मैत्रीण.
“काल रात्री ज्या १५-२० नावं आल्या त्यातल्याच एखाद्या नावे मध्ये त्या लोकांनी खेचून तर घेतलं नसेल?” – वसुंधरा.
ते कशाला खेचतील? आणि खेचण्या इतक्या जवळ कोणचीच नाव नव्हती.” – देशपांडे.
“अहो असं काय करता? विदिशा कदाचित काठावर उभी असेल, अंधारामुळे आपल्याला कळलं नाही. तिच्या सारखी सारखी इतकी सुंदर मुलगी दिसल्यावर कोणीतरी मोहात पडलं असेल, आणि खेचलं असेल.” – वसुंधरा.
“हे कारण पटण्यासारखं आहे पण विशाल सरांचं काय? ते का गायब आहेत?” – शशांक
“कदाचित त्यांचं लक्ष गेलं असेल आणि त्यांनी विदिशा साठी त्या बोटीवर उडी घेतली असेल.” – साधना.
“पण त्यांनी आपल्याला का सावध केलं नाही आम्ही पण उड्या मारल्या असत्या.”– नाना
“कदाचित तेवढा वेळ मिळाला नसेल. एका क्षणात निर्णय घ्यावा लागला असेल, तो त्यांनी घेतला.” – साधना.
“अरे मला कळत नाही, आत्ताच वसुंधरा मॅडम म्हणाल्या की अंधारामुळे विदिशा मंदिराच्या कडेवर उभी आहे हे आपल्याला दिसलं नसेल, मग त्या लोकांना तरी ती कशी दिसेल? आणि जर दिसली नसेल, तर ती सुंदर आहे हे कसं कळेल? आणि जर ते कळलं नाही, तर ते कशाला तिला ओढून घेतील? छे हे कारण पटत नाही.” – देशपांडे.
“वसुंधरा मॅडम आपल्या परीने बरोबर आहेत. मी त्यांच्या थियरी शी सहमत आहे. आपल्याला जश्या इतक्या काळोखात होड्या दिसल्या, तसंच विदिशा त्यांना दिसली असेल.” – उमेश.
“मला वाटतं की देशपांडे बरोबर बोलत आहेत. आपण त्यांना दिसलो असतो, तर निर्जन ठिकाणी इतकी माणसं पाहून, एखादी होडी नक्कीच थांबली असती, किंवा कोणीतरी हात हलवला असता, आरडा ओरडा केला असता.” – शशांक.
अशी नुसतीच चर्चा रात्र भर चालली. निष्पन्न काहीच नाही. सकाळ झाली, उजाडलं. पाणी आता पूर्ण ओसरलं होतं. सारंग म्हणाला,
“शशांक, मी, नाना आणि रमेश इथेच थांबून आजूबाजूला नीट बघतो, उजेड आहे कळेल काही तरी. देशपांडे, तुम्ही आणि उमेश, बाकी सर्वांना घेऊन किनाऱ्यावर जा आणि बस मध्ये बसा. आम्ही येतोच मागे मागे.” – सारंग.
विशाल आणि विदिशा नाहीयेत म्हंटल्यांवर कोणाचाच पाय निघेना.
“आम्ही पण येतो शोधायला.” – सगळे म्हणाले.
“नाही, आता थोड्याच वेळात भरती सुरू होईल, थोडं पाणी चढलं तरी आम्ही पुरुष माणसं येऊ शकू. पण तुम्हा बायकांचं काय? अवघड परिस्थितीत भर घालू नका. आम्ही चौघं पूर्ण तपास करू. तो पर्यन्त तुम्ही बस मध्ये थांबा.” सारंग निक्षून सांगितल्यावर सर्व जड पावलांनी किनाऱ्यावर जायला निघाले.
चौघा जणांनी मंदिर आणि सभोवार इंच इंच तपासला. हातात काहीच लागलं नाही.
“वाळूत फसून अडकल्याच्या खुणा पण नाहीत. म्हणजे त्यांनी खाडी पार केली असावी. पण कोणच्या बाजूला गेले असावेत? डाव्या की उजव्या? – रमेश म्हणाला.
“ओके आपण असं करू नाना आणि मी उजव्या बाजूला जातो. रमेश आणि शशांक तुम्ही डाव्या बाजूला जा. समुद्राच्या दिशेने एकदा पाहू मग परत फिरून समुद्राच्या विरुद्ध दिशेने.”– सारंग.
दोन्ही टीम आपापल्या दिशेने निघाल्या. शोधत शोधत समुद्राच्या दिशेने गेल्या. वाटेत जे कोणी भेटले, त्यांना विचारालं पण कोणालाच कल्पना नव्हती.
“काल रात्री किनाऱ्यावर १५-२० होड्या आल्या होत्या त्यातली माणसं कुठे गेले असतील काही कल्पना आहे का?” सारंग ने एक दोघांना विचारलं
“होड्या? इतक्या होड्या इकडे कधीच येत नाही तुम्हाला कोणीतरी चुकीची माहिती दिली असावी. हे काही बंदर नाहीये. तिकडे सातपाटी च्या किनाऱ्याला लागतात होड्या.”– त्या माणसाने सांगितलं.
समुद्राच्या दिशेने जाऊन दिनही टीमला काहीच सापडलं नाही मग तसेच उलट फिरून तपास सुरू केला. एक अर्धा मैल गेल्यावर खाडी संपली. दोन्ही टीम सामोरं समोर आल्या. काहीही मागमूस लागला नव्हता. शेवटी सर्व जण बस पाशी आले. काय झालं ते सर्वांना सांगितलं.
“मग सारंग, आता काय करायचं?” कोणी तरी म्हणालं. पण सर्वांच्या चेहऱ्यावर हाच प्रश्न होता. विशाल आणि विदिशा एकत्र नाहीसे होणं हे एक कोडच होतं आणि विचार कर करून कोणालाही त्याचं उत्तर सापडत नव्हतं.
“आता काय? सातपाटीला जायचं तिथे लोकांशी बोलू. काही उपाय सापडला नाही तर पोलिसांना कळवू. अजून काही करता येईल असं वाटत नाही.” – सारंग.
सर्व जण विषण्ण मनाने सातपाटीला निघाले. पोचल्यावर, सर्वांचे उतरलेले चेहरे बघून रामेशच्या भावाला धक्काच बसला.
“अरे काय झालं? असे काय दिसता आहात?” – पांडुरंग, रमेशचा भाऊ.
सारंगने मग सगळी राम कहाणी सांगितली. म्हणाला,
“१५-२० होड्या आणि त्यात ४०-५० माणसं रात्री बारा वाजता मंदिरंच्या जवळून गेली. कुठे गेली ते माहीत नाही. पण त्याच वेळेस हे दोघं नाहीसे झालेत.” – सारंग.
“खाडीत? आणि इतक्या होड्या? नाही नाही काहीतरी चुकतंय. तिकडे इतक्या होड्या कधीच जात नाहीत. निदान आम्हाला तरी माहीत नाही. तुम्हाला पक्क आठवतंय की होड्या पाहिल्या म्हणून? कदाचित भास झाला असू शकतो.” – पांडुरंग.
“भास एकाला होईल २० जणांना कसा होईल? स्मगलिंगचा तर प्रकार नसेल?” -सारंग
“शक्य नाही. तो विचारच मनातून काढून टाका. आणि स्मगलिंग साठी इतक्या संख्येने होड्या कोणी वापरत नाही. सगळंच चुपचाप करायचं असतं. असा गाजावाजा करून कामं होत नाहीत.” – पांडुरंग.
“तुम्ही इतक्या खांत्रीशीर पणे कसं सांगता आहात?” - सारंग.
कोणाला सांगू नका पण इथले काही लोकं कधी न कधी यात सहभागी असतात. चार पैसे जास्तीचे मिळतात.” – पांडुरंग.
“बापरे मग काल आम्ही सर्वांनीच इतक्या होड्या पाहिल्या त्याचं काय? आणि हो, सगळ्यांच्या डोक्यावर मराठे शाहीत होत्या, तश्या पगड्या होत्या.” – सारंग.
“अहो अश्या पगड्या आता कोणीच वापरत नाही. तुम्हाला सर्वांना भूल पडली असेल. काय आहे निर्जन देऊळ, रात्रीची वेळ मनावर परिणाम होण्याची शक्यता असू शकते. तसंच काहीसं झालं असेल.” – पांडुरंग.
या उत्तरावर कोणाचंच समाधान झालं नाही पण कोणी काही बोललं नाही. शेवटी सर्वानुमते पोलिसांकडे जायचं ठरलं. सर्व जण पालघरला जायला निघाले.
“पण आपण पोलिसांना सांगणार काय? आपल्या कहाणीवर या पांडुरंग दादांनी सुद्धा विश्वास ठेवला नाही, मग पोलिसांची काय रिएक्शन असेल?” – नीलिमा.
“यस, नीलिमा मॅडमची शंका रास्त आहे. सारंग काय करणार आहोत आपण?” – उमेश.
“दोन व्यक्ति अचानक बेपत्ता झाल्या आहेत. पोलिसां कडे रीपोर्ट करण्याच्या व्यतिरिक्त दूसरा पर्याय कोणा जवळ आहे का?” सारंगने विचारले.
अर्थातच कोणाही जवळ याचं उत्तर नव्हतं. मग वरात पालघर पोलिस स्टेशनला पोचली.
सारंगने इंस्पेक्टर राऊत यांना सर्व कथा सांगितली. इंस्पेक्टर साहेब चक्रावून गेले.
“साहेब काय सांगता आहात तुम्ही? असं कधी घडतं का? अहो दोघं प्रेमात पडले असतील आणि संधि साधून पळून गेले. अजून काय?” – इंस्पेक्टर राऊत
“साहेब त्यांना पळून जायचं काय कारण आहे? ते दोघं एकमेकांना ओळखत पण नव्हते. काल सकाळीच त्यांची ओळख झाली. एकाच दिवसांत प्रेम जमलं जरी असेल, तरी पळून जायचं काहीच कारण नाहीये. दोघंही शिकलेले आणि पगारदार आहेत. नाही साहेब, ते नक्कीच पळून नाही गेलेत. त्यांच्यावर भयंकर संकट आलं असणार.”-साधना.
आणि सगळ्यांनीच साधनाच्या म्हणण्याला सहमती दर्शवली. आता इंस्पेक्टर साहेबांची परीक्षा होती. ही केसच विचित्र होती. पण दोन माणसं बेपत्ता झालेली होती त्यामुळे FIR नोंदवणं आवश्यक होतं. त्यांनी मिसिंग रीपोर्ट नोंदवला, आणि म्हणाले की आपल्याला आता स्पॉट वर जाऊन तपास करावा लागेल. कोणाला तरी थांबावं लागेल. रमेश तिथलाच होता, तो तयार झाला. सारंग पण म्हणाला की,
“मी पण थांबायला तयार आहे.” – सारंग. मग बाकी सर्व मुंबईला परत गेले.
क्रमश:----
पुढचा भाग उद्या – सगळंच अधांतरी.

दिलीप भिडे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा