पिकनिक भाग ६
सगळंच अधांतरी.
सगळंच अधांतरी.
तिला पाहून बोलण्यासाठी विदिशा समोर आली आणि तिला हाक दिली. पण तिला विदिशा दिसलीच नाही. ती तशीच मागे वळून घरात जायला निघाली. त्यावर विदिशा घाईघाईने तिच्या समोर गेली आणि नमस्कार म्हंटलं. पण ती विदिशाच्या शरीरातून आर पार निघून घरात चालली गेली. विदिशा स्तंभित होऊन विशाल कडे बघतच राहिली.
“विशाल आपण अजूनही भूतांच्या राज्यातच आहोत का?” – विदिशाने जरा त्रासिक स्वरातच विचारलं.
हो असं दिसतंय खरं. पण या लोकांच्या पोषाखांवरून असं लक्षात येतेय की आपण जवळ जवळ 100 वर्ष पुढे आलो आहोत.” – विशाल.
“म्हणजे? या निष्कर्षावर कसा पोचलास तू?” विदिशा आश्चर्याने उद्गारली.
“हे बघ त्या माणसाने बंडी घातली आहे. बंडी म्हणजे साध्या कापडाचं अर्ध्या बाह्या असलेलं बनीयन. आणि डोक्यावर मुंडासं. हा पोशाख साधारण अठराव्या शतकाच्या अखेरीस प्रचलित झाला. म्हणजे 1780 ते 1800 या काळात आता आपण आहोत. आता ही शंभर वर्ष कशी काय ओलांडली गेली हे मला विचारू नकोस. मला माहीत नाही. मी फक्त निष्कर्ष काढला.” – विशाल.
विदिशा त्यांच्याकडे विस्मयाने बघतच राहिली. काही क्षणानंतर म्हणाली,
‘विशाल हे गणित तर फेल गेलं. कालपासून आपल्या पोटात काही गेलं नाही. आता पोटात कावळे कोकलायला लागले आहेत. काही तरी मार्ग काढ न” – विदिशा.
“आपण असं करू, नाही तरी ते आपल्याला बघू शकत नाहीत, मग घरात जाऊन काही खायला प्यायला मिळतंय का बघू. चल.” – विशाल.
दोघं घरात शिरले. सगळीच मातीची भांडी. ती बाई ज्वारीचं पीठ मळून भाकऱ्या करत होती. चूल पेटली होती. दोन गरम गरम भाकऱ्या बाजूच्या पितळेच्या ताटात होत्या. विशाल खुश झाला. त्याने एक भाकरी उचलण्याचा प्रयत्न केला पण हातात काहीच लागलं नाही. त्याने विदिशा कडे पाहीलं आणि अंगठा हलवला.
“भाकऱ्या 200 वर्षांपूर्वी बनवल्या आहेत. आपल्याला मिळणार नाहीत.” – विशाल निराशेने म्हणाला.
“ताट पितळेचं आहे. त्याला हात लावून बघ.” – विदिशा.
ताट उचलल्या गेलं. पण पुढे काय? ताटात काहीच नव्हतं. मग दोघांनी सगळी मडकी उघडून पाहिली. सगळी हात लावल्यावर भुगा होऊन खाली पडली.
“फक्त धातूची भांडी शिल्लक आहेत. बाकी काही नाही. चला. पुढे जाऊ. जंगल आहे काही फळझाडं दिसली तर बघू.” असं म्हणून विशाल उठला. दोघं घरातून बाहेर पडले. अर्धा तास चालल्यावर विदिशा थांबली. विशालने तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं.
“विशाल ताट हातात आलं होतं म्हणजे धातूच्या गोष्टी ठीक राहतात. तू पाहीलंस की आंगणात विहीर होती, म्हणजे बादली पण असेल. आपण परत जाऊ निदान चार घोट पाणी प्यायला मिळालं तर जीवात जीव येईल.” – विदिशा.
विशालला पटलं. दोघेही मागे फिरले. पुन्हा अर्धा तास पायपीट करून ते घरा जवळ आले. आणि आश्चर्याने बघतच राहिले. घर शिल्लकच नव्हतं. पार मोडकळीला आलं होतं. आजू बाजूला खूप झाडा झाडोरा उगवला होता. घराच्या आत मधून आणि शिल्लक राहिलेल्या भिंतीतून सुद्धा झाडाच्या फांद्या बाहेर आलेल्या दिसत होत्या. अंगणात विहीर होती, पण विहिरी जवळ जाणंही शक्य नव्हतं इतकी झुडपं आजू बाजूला होती.
“बहुधा घरातली माणसं घर सोडून दुसरीकडे गेली असावीत” – विदिशा.
“ते वेगळं. पण आपण तर तासभरा पूर्वी इथे येऊन गेलो होतो. मग तासाभरात ही किमया कशी झाली.” विशाल.
“विशाल, मला तर काही कळतच नाहीये. मी काय बोलू?” – विदिशा.
“फक्त तासाभरात पूर्ण घर मोडकळीला आलं? नाही विदिशा, काही तरी घोळ आहे. माझ्या मते, अर्ध्या तासात बराच काळ उलटून गेला असावा.” – विशाल.
“पण असं तुला का वाटावं? अचानक काही लिंक लागली का?” – विदिशा.
“हो म्हणजे मी विचारच करत होतो, पण आता खात्रीच झाली आहे.” – विशाल.
“मलाही कळू दे तुझा सिद्धांत.” – विदिशा.
“सिद्धांत वगैरे काही नाहीये. पण जो अनुभव आपण घेत आहोत, त्यावरून काही अंदाज, अटकळ बांधायचा मी प्रयत्न करतो आहे. तुला सांगतोच, पण तुझा कितपत विश्वास बसेल हे सांगता येत नाही.” विशाल.
“सांग न. तू खूप हुशार आहेस हे आता मी मान्य केलं आहे.” – विदिशा.
“म्हणजे असं बघ, काल रात्री आपण लढाई पाहिली ती साधारण १६९० च्या काळात घडली. मग पहाटे आपण सागरावर गेलो. परत येऊन पाहतो तो तिथे जंगल होतं. मग आपल्याला जंग चढलेली हत्यारं मिळाली. म्हणजे हा काळ दोन तासात ५० वर्ष पुढे गेला होता. मग आपण अजून पुढे गेलो, घर दिसलं तेंव्हा काळ अजून ५० वर्ष पुढे गेला होता. आणि आता परतून आलो तर घराची ही अवस्था दिसते आहे.” – विशाल.
“किती काळ उलटून गेला असावा? काही अंदाज बांधता येतो आहे का?” – विदिशा.
“असा अंदाज नाही बांधता येणार. आपण घरात जाऊ, आणि बघू. काळ किती पुढे गेला असेल यांची कल्पना येत नाहीये, पण गणित बघितलं तर कदाचित अजून ५० वर्ष पुढे गेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.” – विशाल.
“यांचा अर्थ आपण आता १८५० च्या आसपासच्या काळात असू शकतो.” – विदिशा म्हणाली. तिला पण आता या गणितात इंट्रेस्ट यायला लागला होता.
खूप प्रयत्न करून कसे बसे ते घरात शिरले. पण सोडून जातांना सर्व सामान घेऊनच तिथले राहिवासी निघाले असावेत. विशाल विदिशा यांना काहीही सापडलं नाही. निराशेने ते बाहेर आले. बादली मिळेल आणि तहान भागेल हा उद्देश धरून आले होते, पण नन्नाचा पाढा लागला.
“आता काय करायचं? पाण्याच्या आशेने मैल भराचा हेलपाटा पडला. हाती काही लागलं तर नाहीच उलट थकवा मात्र आला.” – विदिशा.
“जे काही समोर वाढून ठेवलं असेल, त्याचा सामना तर करावाच लागेल. जाऊ समोर, काही पर्याय नाहीये. एखादा रस्ता, वाहन किंवा गाव लागे पर्यन्त पुढे जावंच लागणार आहे. चल, अशी हात पाय गाळू नकोस.” – विशाल.
“विशाल, संध्याकाळ होत आली आहे, गारवा वाढत चालला आहे. आपल्या जवळ काहीच नाहीये. मुंबईला जरूर पडत नाही, त्यामुळे स्वेटर पण नाहीये. पण इथे जंगलात आता थंडी वाजू लागली आहे.” – विदिशा.
अर्धा मैल पुढे गेल्यावर एक छोटसं मैदान लागलं. विशाल थांबला.
“काय झालं?” – विदिशा.
“आपण इथेच थांबूया. अंधार लवकरच पडेल. जंगलात थांबण्या पेक्षा जरा मोकळ्या जागेवर रात्र काढू.” - विशाल.
“इथे उघड्यावर?” – विदिशा.
“उघड्यावर नाही. तू बघच आता, मी इथे २BHK फ्लॅट बांधतो. मग तर काही प्रॉब्लेम नाही ना?” – विशाल.
“विशाल, काय बोलतो आहेस? या परिस्थितीत तुला चेष्टा कसली सुचतेय?” – विदिशा.
“अग आपण कॅम्पिंग ला आलो आहोत असं समज आणि एंजॉय कर. आयुष्य सुखाचं होईल.” – विदिशा.
“काहीतरीच काय? असं समजता येईल?” – विदिशा.
प्रयत्न कर जमेल. कुठल्याही परिस्थितीत आनंदी राहिलीस, तर सोल्यूशन नक्कीच मिळतं. कारण चिंते मध्ये डोकं फारसं चालत नाही. ट्राय करून पहा.” – विशाल.
मग विशालने दोन चार फांद्या तोंडल्या. कट्टयार कामाला आली. म्हणाला,
हे आपल्या सरंक्षणाच साधन. मला माहीत नाही पण जंगलात छोटी मोठी जनावरं असू शकतात.” – विशाल असं म्हणाला आणि पुन्हा झाडी कडे वळला.
“बापरे.” विदिशा घाबरली आणि विशालजवळ जाऊन त्याचा हात घट्ट धरला. “आता कुठे जातो आहेस. माझ्या जवळच थांब. मला भीती वाटते आहे.”
“ओके. तू पण चल माझ्या बरोबर.” – विशाल. मग विशालने एक वठलेलं झाड शोधून काढलं आणि त्यांच्या बऱ्याच फांद्या तोडून काढल्या. मग खाली पडलेला वाळलेला काडी कचरा पण गोळा करून मैदानात आणून ठेवला.
“हे आपण काय करतो आहोत?” – विदिशा.
“बघत रहा.” विशाल.
मग विशालने वाळलेली एक मोठी फांदी घेतली. त्यात कट्टयारने एक खोबण तयार केली. दुसरी फांदी घेऊन त्याला जरा टोकदार केलं. आणि मग खोबण केलेली फांदी विदीशाला घट्ट पकडून जमिनीवर दाबून धरायला सांगीतली. आता विशाल ने टोक केलेली फांदी घेऊन त्या खोबणीत रवी सारखी फिरवायला सुरवात केली. विशाल घामाघूम झाला, पण अग्नि पेटला. आता पाला पाचोळा वापरुन आग चांगली पेटवली आणि त्यात लाकडं पण घातली. चार शेकोट्या चार बाजूला ठेऊन ते मध्ये बसले.
आता अंधार पडला होता. पण शेकोट्या असल्याने, जनावरांची भीती नव्हती आणि थंडी पण वाजत नव्हती. विदिशा नवलाने त्यांच्याकडे बघत होती. म्हणाली,
“हे सगळं तुला कसं येतं? कुठे शिकलास?” – विदिशा.
“नुसती माहिती होती. प्रॅक्टिकल आज झालं. आणि यशस्वी पण झालं. आता रात्र कशी जाईल यांची चिंता नाही.” – विशाल.
“विशाल, काल पासून पांण्याचा थेंब पण मिळाला नाहीये, घसा सुकून गेला आहे. खाण्याचा तर विचार सुद्धा मनाला शिवत नाहीये. कसं व्हायचं?” - विदिशा.
“रात्र झाली आहे, शोध मोहीम थांबवावीच लागली आहे. आता जे काही करायचं ते सकाळीच. तू झोप घे. मी जागा राहतो. रात्र भर आराम झाला तर सकाळी फ्रेश वाटेल. शेकोट्या असल्याने थंडी जाणवणार नाही.” – विशाल.
क्रमश:----
पुढचा भाग उद्या – नवीन आव्हानं

दिलीप भिडे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा