पिकनिक भाग ७
नवीन आव्हानं
नवीन आव्हानं
“विशाल, काल पासून पांण्याचा थेंब पण मिळाला नाहीये, घसा सुकून गेला आहे. खाण्याचा तर विचार सुद्धा मनाला शिवत नाहीये. कसं व्हायचं?” - विदिशा.
“रात्र झाली आहे, शोध मोहीम थांबवावीच लागली आहे. आता जे काही करायचं ते सकाळीच. तू झोप घे. मी जागा राहतो. रात्र भर आराम झाला तर सकाळी फ्रेश वाटेल. शेकोट्या असल्याने थंडी जाणवणार नाही.” – विशाल.
विदिशा गवतावर आडवी झाली. थोडक्या काळात अतिशय श्रम आणि मानसिक ताण तिने अनुभवला होता. पण पोटात काही नसल्याने झोप लागत नव्हती. शेवटी विशालने तिला त्याच्या मांडीवर डोके ठेवण्यास सुचवले. थोडे आढे वेढे घेत विदिशाने त्याच्या मांडीवर डोके ठेवले. विशाल तिच्या केसांतून हलके हलके बोटं फिरवत होता आणि हलक्या आवाजात रामरक्षा म्हणत होता. त्या ह्रीदम मुळे विदिशाला झोप लागली. काही वेळ गेल्यानंतर विशालच्या लक्षात आलं की शेकोट्या विझत आल्या आहेत. त्या विझून चालणार नव्हतं. शेकोट्या विझत आल्या होत्या म्हणजे ३ तास तरी झाले असतील असा अंदाज त्याने बांधला म्हणजे १० वाजले असावेत. अजून पूर्ण रात्र जायची होती. इंधन घालणं जरुरीचं होतं.
त्याने विदिशाचं डोक खाली ठेवलं आणि शेकोट्यांमधे पाला पाचोळा आणि लाकडं घालायला उठला. अजून चार नवीन शेकोट्या पेटवून मधे मधे ठेवल्या. आता पुढचे २-३ तास पाहायची जरूर नव्हती. तो पुन्हा विदिशा जवळ येऊन बसला. डोळ्यांवर खूप झोप होती, पण विदिशा झोपली असतांना त्याला झोपून चालणार नव्हतं. तो मोठ्या कष्टाने जागा राहण्याचा प्रयत्न करत होता. असाच तास दीड तास गेला असेल, आणि विशालला एक डुलकी लागली. थोड्याच वेळात खडबडून जागा झाला. विदिशा शांत झोपली होती. शेकोटीचा प्रकाश पडला होता, त्या प्रकाशात त्याला विदिशा एक परीच भासली. आता त्याला जाणीव झाली की तो विदिशाच्या प्रेमात पडला आहे. त्याने मनोमन निश्चय केला की सगळं नॉर्मल झालं की पहिलं काम म्हणजे विदिशाला प्रपोज करायचं. विचार करता करता त्याचा पुन्हा डोळा लागला.
अचानक कुठल्या तरी विचित्र आवाजाने त्याला जाग आली. कसल्या तरी शंकेने त्यांची झोप पार उडून गेली. आवाज अजून येतच होता. कान देऊन लक्षपूर्वक ऐकल्यावर कळलं की ही कोल्हेकुई आहे. यांचा अर्थ काही कोल्हे आजूबाजूला फिरत असतील. शेकोट्या पुन्हा मंद झाल्या होत्या. त्यात लाकडं घालणं आवश्यक होतं. आवाजाने विदिशा पण जागी झाली आणि उठून बसली. आता आवाजाची तीव्रता थोडी वाढली होती. विदिशा घाबरली.
“विशाल कसला आवाज आहे हा?” – विदिशा.
“कोल्हेकुई आहे. आजूबाजूला कोल्हे फिरत आहेत. शेकोट्या मंद झाल्या आहेत. लाकडं घालायला पाहिजेत, नाहीतर कोल्हे जवळ येऊन आपल्यावर हल्ला करतील. तू बस मी करतो मॅनेज.” – विशाल.
“नाही, तू मला सोडून कुठेही जाणार नाहीस.” – विदिशा.
“मी कुठेही जात नाहीये. फक्त लाकडं आणि पाला पाचोळा टाकून येतो.” – विशाल.
“पण लाकडं कुठे आहेत?” – विदिशा.
“आजू बाजूला जाऊन तोडणार.” – विशाल.
“मग मी पण येणार तुझ्या बरोबर.” – विदिशा.
“ओके. मग असं कर, शेकोटी मधलं एखादं जळतं लाकूड घे, आणि चल माझ्या बरोबर. आपण लाकडं तोडू, पालापाचोळा गोळा करू. अजून कोल्हे दूर आहेत. ते जवळ यायच्या आत आपल्याला हे काम करायचं आहे.” – विशाल.
काम झालं. शेकोट्या पुन्हा धडाडुन पेटल्या. आता दोघं निश्चिंत झाले.
“कोल्हे सहसा शेकोटी ओलांडून जवळ येणार नाहीत, पण जर तसा त्यांनी प्रयत्न केलाच, तर लगेच एक जळतं लाकूड उचलायचं आणि त्याला भीती दाखवायची. मारायचं नाही. तो जर जखमी झाला, तर पळून जाणार नाही अंगावर येईल. नुसती भीती दाखवायची. लक्षात राहील न?” – विशाल.
विदिशा आता पूर्ण भानावर आली होती. ३-४ तास गाढ झोप झाल्याने मरगळ निघून गेली होती. ती पण एक काठी घेऊन तयारीत बसली. विशाल पण सावध होता. कोल्हे सावध पणे दबकत दबकत पुढे येत होते. हा वाट पाहण्याचा वेळ दोघांनाही असह्य होत होता.
“कोल्हे समोर का येत नाहीयेत?” – विदिशा.
“जंगली जनावरं कशी वागतात याचा अभ्यास नाही माझा. जे काही थोडं फार वाचनात आलं, त्यावरून मी अंदाज बांधतो आहे. पण आता परत गेल्यावर मी याचा पण अभ्यास करायचं विचार करतो आहे.” – विशाल.
काही वेळ असाच गेला. मग अचानक झाडीतून चार कोल्हे प्रकट झाले. त्यांना पाहून विदीशाचा तर थरकांप उडाला. विशालचा हात तिने धरलाच होता पण आता पकड घट्ट केली. विशालने तिच्या खांद्यावर थोपटलं आणि म्हणाला,
“घाबरू नको, कोल्हे म्हणजे काही वाघ नाही. ते आपण बेसावध असण्याची वाट पाहतील. आपण सतत हालचाल करायला पाहिजे. हातातली काठी थोड्या थोड्या वेळाने फिरवत रहा.”- विशाल.
अजून काही वेळ गेला कोल्हे आता समोर आले आणी शेकोट्यांनी जे रिंगण केलं होतं, त्यांच्या सभोवताल गोल गोल फिरायला लागले. आरोळ्या देणं चालूच होतं. आता विशाल आणि विदिशा उठून उभे राहिले.
“विदिशा, शेकोटी मधलं एखादं जळतं लाकूड घे हातात.” विशाल म्हणाला आणि त्याने स्वत:च एक लाकूड काढून विदिशाच्या हातात दिलं. एक आपण घेतलं.
“आता आपल्याला रिंगणाच्या आतून त्यांच्या सारखंच गोल गोल फिरायचं आहे. त्यांची समोर येण्याची हिम्मत व्हायला नको.” – विशाल म्हणाला आणि त्याने रिंगणाच्या आतून फिरायला सुरवात केली. हातात जळतं लाकूड होतंच. विदिशा सुद्धा त्यांच्या मागून फिरत होती.
अधून मधून कोल्हे थोडे समोर यायचे पण लगेच विशाल आणि विदिशा जाळ असलेलं लाकूड त्यांच्या समोर नाचवायचे. आगीला भिऊन कोल्हे मागे सरकायचे. असा खेळ बराच वेळ चालू होता.
“विशाल, आता माझ्यात त्राण उरलं नाही. अजून किती वेळ त्यांच्यावर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवायचं आणि लाकूड घेऊन फिरायचं?” – विदिशा.
“विदिशा दम सोडू नकोस. जीव वाचवण्याचा हा एकच मार्ग मला दिसतो आहे. तसंही माझ्या अंदाजा प्रमाणे आत्ता साडे तीन चारचा सुमार झाला असेल. इथे काही मिळत नाही हे समजल्यावर थोड्याच वेळात कोल्हे निघून जातील. पण तो पर्यन्त किल्ला लढवावाच लागेल.” – विशाल.
आणि विशालचा अंदाज बरोबर ठरला. थोड्याच वेळात कोल्हे निघून गेले. ते जंगलात दिसेनासे झाल्यावर दोघंही श्रांत क्लांत होऊन आडवेच पडले. आधीच पोटात अन्न पाणी काही नाही, त्यातून दोन दिवस आणि रात्रीची पायपीट, विश्रांती नाहीच. अश्या परिस्थितीत थकवा आला नसतं तरच नवल होतं. विदीशाने केंव्हाच डोळे मिटले होते. विशाल जागा राहण्याच आटोकाट प्रयत्न करत होता. कोल्हे परत येऊ शकतील ही भीती होतीच. पण तसं काही झालं नाही आणि थोड्या वेळाने उजाडलं. आणि मग विशालचा ताबा राहिला नाही. त्याला पण गाढ झोपला.
सूर्य डोक्यावर आल्यावर विशालला जाग आली. विदिशा अजून उठली नव्हती. विदिशाच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता. तिचा मलूल चेहरा पाहून विशालला भडभडून आलं. पण तो तरी काय करणार होता? अशी परिस्थिती येईल अशी स्वप्नात सुद्धा कल्पना केली नव्हती.
थोड्या वेळाने विशालने विदिशाला उठवलं.
“विदिशा, आपल्याला निघायला हवं. सूर्य कलायला लागला आहे. कसंही करून अंधार पडायच्या आत जंगल पार करायला हवं.” विशाल.
विदिशा कशीबशी उठली.
“आजच्या दिवस इथेच थांबायचं का? अजिबात शक्ति उरली नाहीये.” – विदिशा.
“पुढे गेलो तर काही तरी चान्स आहे. इथेच जंगलात थांबलो तर खायला प्यायला काहीच मिळणार नाही. देवाचं नाव घे. शक्ति गोळा कर. सर्व ठीक होईल.” – विशाल.
रडत खडत का होईना, दोघं पुढे चालू पडले. नशीब चांगलं होतं तास भर चालल्या वर त्यांना एक ओहोळ दिसला. हर्षवायूच होणं बाकी होतं.
सर्व आटोपल्यावर आणि भरपूर पाणी प्यायल्यावर त्यांना तरतरी आली. आणि पुढे वाटचाल सुरू झाली. आता जंगल विरळ होत चाललं होतं. त्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.
“आता अजून एखादा मैल चालल्यावर कदाचित रस्ता किंवा गाव दिसेल.” विशाल उत्साहाने म्हणाला. हे ऐकून विदिशाला पण हुरूप आला. मैल भर चालल्यावर एक पायवाट लागली. तिथे कडेला एक मोठा दगड होता. विदिशा म्हणाली,
“थोडा वेळ इथे बसू. मला चालणं कठीण होतं आहे.” – विदिशा.
“ओके. बसू. थोडा आराम कर मग निघू. आता जंगल जवळ जवळ संपलं आहे. आशेला जागा आहे.” – विशाल.
दोघंही बसले. हळू हळू विदिशाने पाय लांब केले. विशाल थोडा सरकला आणि तिचं डोक आपल्या मांडीवर घेतलं. पाचच मिनिटांत विदिशा गाढ झोपी गेली. दिवस होता, मोकळी जागा होती, विशालला पण डुलक्या येत होत्या.
“काय हो इथे जंगलात काय करता आहात?” विशालच्या कानावर शब्द पडले. त्याने डोळे उघडले समोर एक माणूस उभा होता. डोळे चोळतच त्याने त्या माणसाकडे पाहिले. त्या माणसाने पुन्हा विचारलं. त्यावर विशालची झोप खाडकन उघडली.
“तुम्ही आम्हाला पाहू शकता? ऐकू शकता?” विशालने विचारले.
“हा काय प्रश्न आहे? तुम्हाला वेड लागलं असेल असं वाटत तर नाही. कोण तुम्ही, कुठून आला आहात आणि या जंगलात काय करता आहत?” – माणूस.
“मी विशाल रामचंद्र गुप्ते. मुंबई. हे कोणचं गाव आहे?” - विशाल.
“ह्या कोण तुमच्या बरोबर आहेत?” – माणूस.
“मी विदिशा विशाल गुप्ते. यांची बायको.”
क्रमश:----
पुढचा भाग उद्या – नवीन समीकरणं

दिलीप भिडे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा