डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा
प्रिया आज माझी भाग 15
आजचा हा दिवस प्रियाच्या आयुष्यात आलेला सर्वात अनपेक्षित, आणि रात्र अविस्मरणीय.
कुठल्याही मुलीच्या आयुष्यात लग्नानंतर येणारी पहिली रात्र खास असतेच......पण प्रियाच्या वाट्याला जे आले होते ते जरा वेगळेच होते.
प्रिया शेखरच्या रुममध्ये आली. रूम बऱ्यापैकी मोठी होती. रुमला लागूनच बाल्कनी होती. ती बाल्कनीत आली. मुंबईच्या घरात एक बेडरूम सहज तयार होईल इतपत बाल्कनी होती. बाल्कनीत एक माणूस बसेल असा झोपाळा होता आणि बऱ्यापैकी रुंद आरामखुर्ची ठेवलेली होती. त्याच्यासमोरील एका टेबलावर इंग्रजीतील दोन पुस्तके ठेवलेली होती.
एक थंड हवेची झुळूक आली तसे तिने हाताची घडी घातली. डिसेंबर महिना असल्यामुळे वातावरणात बऱ्यापैकी गारवा होता. शेखरचे घर विसाव्या माळ्यावर होते. पण तरीही बाल्कनीला ग्रील नव्हते. फक्त चार फुटाची एक काचेची पारदर्शक भिंत होती. एवढ्या उंचीवरून खाली पाहताना तिला थोडी भीतीच वाटली. कारण ती राहत असलेले तिचे घर सातव्या माळ्यावर होते आणि तिच्या ऑफिसची दहा मजली इमारत होती तरी तिचे ऑफिस दुसऱ्या माळ्यावर असल्यामुळे इतक्या उंचावरून ती प्रथमच पाहत होती.
आज गुरुवार होता. समोर एका मंदिरात आरतीचा घंटानाद सुरू झाला. तिच्या सासूबाई .... सुमन परांजपेनी तिला जेव्हा शेखरची खोली दाखवली तेंव्हा त्यांनी त्या मंदिराबद्दल सांगताना सांगितले की ते महालक्ष्मीचे मंदिर आहे. तिने घड्याळात पाहिले . सात वाजले होते. नकळत तिचे हात जोडले गेले.
*****
*****
रात्रीचे आठ वाजले होते तरी शेखर अजून रुममध्ये आला नव्हता. तसे परांजपेंचे चार बेडरूम हॉल किचनचे प्रशस्त घर होते. पण तरीही त्या दोघांना एकांत मिळावा म्हणून सुमन परांजपे आपल्या बहिणीबरोबर पुण्याला निघून गेल्या होत्या . आता या क्षणी घरात प्रियाच होती. वरात घरी आली आणि शेखरला कोणाचा तरी फोन आला म्हणून गृहप्रवेशाच्या पुढल्या विधी पार न पाडता तो तडकाफडकी तसाच निघून गेला. जाताना सुमनताईंना दोन तासांनी येतो असेच सांगून गेला.
त्यांनाही या गोष्टीचे फारसे नवल वाटले नाही कारण अलीकडच्या दिवसात तो किती बिझी होता हे त्यांना चांगलेच ठाऊक होते. त्यांनी घरात जमवलेली गर्दी पांगवली. कारण शेखरचे लग्न अशा परिस्थितीत झाले होते की बाहेरून घरी परत आल्यावर त्याचा इतर विधी करायचा मूड नसणार ही त्यांना समजून चुकले.
काहीही केले तरी त्या दोघांना एकत्र आणणे गरजेचे होते. आपण जर इथे राहिलो तर त्या दोघांमध्ये फार थोडा संवाद होईल किंवा होणारच नाही त्यासाठी निदान काही काळाकरीता तरी आपले इथून दूर जाणे गरजेचे आहे असे त्यांना वाटले आणि म्हणून त्या आपल्या बहिणीबरोबर पुण्याला निघून गेल्या. पण जाताना त्यांनी प्रियाला पूर्ण घर दाखविले. शेखरला सकाळी नाश्त्याला काय आवडते...त्याच्या सवयी काय हे ही थोडक्यात सांगितले. घराच्या, तिजोरीच्या किल्ल्या तिच्या हवाली केल्या.
"सुमामावशी, तुम्ही नका न जाऊ. "
"प्रिया आता मी तुझी मावशी नाही. शेखरबरोबर तुझीही मी आईच आहे. मला आई म्हण"
"आई...."
म्हणताना तिला गलबलून आले तसे सुमन ताईंनी तिला मिठी मारली.
म्हणताना तिला गलबलून आले तसे सुमन ताईंनी तिला मिठी मारली.
"उगी.... नको रडू...तुझी आईच आहे मी ...आणि मी इथून जात आहे ते तुमच्या दोघांसाठी....तुमच्यात संवाद व्हावा म्हणून. तू ज्या परिस्थितीत शेखरशी लग्न केलेस ते तर माझ्यावर उपकारच केले आहेस. "
"नाही आई... असे नका म्हणू."
"तुला माहीत आहे त्याचे दुसऱ्या कुणावर तरी प्रेम होते...तरी तू त्याच्याशी अशा प्रसंगी लग्न केलेस..आता तुम्हाला एकत्र आणणे हे माझे काम आहे. थोडे दिवस दोघेच राहिलात तर एकमेकांची सवय होईल म्हणून मी जात आहे.
बरं आता मला उशीर होत आहे...खाली विद्या (सुमन ताईंची बहिण) माझी वाट पाहत असेल. येते मी. तू काळजी घे...स्वतःचीही आणि शेखरचीही. "
त्यांनी प्रियाच्या गालावरून हात फिरवून हाताने तिचा पापा घेतला.
त्यांचाही पाय जडवला होता... डोळे दाटले होते...पण मोठ्या प्रयत्नाने त्यांनी आपले अश्रू रोखून धरले आणि तिचा निरोप घेतला.
********
शेखर कोणाशीतरी बोलतच रुममध्ये आला पण रूममध्ये बाल्कनीमध्ये पाठमोऱ्या उभे असलेल्या प्रियाला पाहून तो थबकला.
"हॅलो, शेखर."
"हा आई..."
तो तिच्याकडे पाठ करून म्हणाला.
तो तिच्याकडे पाठ करून म्हणाला.
"शेखर ,...मी मावशीबरोबर पुण्याला जात आहे. "
"आई...पण आता लगेच का."
"असेच... मावशीपण म्हणाली...आणि तिथे तुझे शंकर काका आहेत ना ते आजारी असतात त्यांनापण पाहून यावे म्हणते. "
"आई...तू फार दूर गेली नसशील तर ये प्लीज. बाकी आपण आल्यावर बोलूया. "
"अरे पण शेखर मी नाही येत आहे ..."
शेखरने काहीसे वैतागूनच फोन ठेवला. त्याने क्षणभर डोळे मिटले आणि एक दीर्घ श्वास घेतला.
प्रिया बाल्कनीतून रुममध्ये आली.
प्रिया बाल्कनीतून रुममध्ये आली.
तिला पाहताच त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले.
"तू हे जाणूनबुजून केलेस ना?"
तो काय बोलतोय हे तिला कळेनासे झाले होते.
क्रमशः
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा