Login

प्रिया आज माझी भाग ५४

Lovestory
प्रिया आज माझी भाग ५४


डिसेंबर- जानेवारी 2025-26
दीर्घकथा लेखन स्पर्धा


त्याने सोडल्याबरोबर ती तिथून चटकन निसटून आपल्या रूममध्ये आली. त्याच्या मिठीत तिचे मन खुश झाले होते पण मेंदू तिच्या मनात आलेले सर्व विचार झटकून टाकत होता.

"इथे गर्लफ्रेंडला घेऊन आले आहेत...माझ्या मागे हे सर्व करीत आहेत आणि तोंडदेखल्या बोलत आहेत की आय मिस यू...आज मी प्रत्यक्ष त्या दोघांना एकत्र पाहिले म्हणून नाहीतर मला कुठेतरी वाटत होते की त्यांचेही माझ्यावर प्रेम आहे...पण नाही ....खोटे आहे ते...मी गेल्यावर ते पुन्हा आपल्या प्रेमाकडे परत गेले...आणि आता मला पाहिल्यावर उगाच काहीपण बोलत आहेत. "

"नाही, आता मी त्यांच्यात पुन्हा गुरफटणार नाही. मी स्वतःच्या पायावर उभी आहे.. एकटी राहायला शिकले आहे...इतके दिवस एकटी भाड्याने राहत होते तेच बरे होते...रागिणीचे ऐकले नसते तर बरे झाले असते... ती म्हणाली, माझ्या घरी येऊन राहा...माझा बंगला आहे...इथे तुला आमची सोबत होईल...इथे आले नसते तर त्यांचा सामनाही झाला नसता."


विचार करताना तिचे शब्द मंदावले...त्याचा विषय पुन्हा निघाला होता ना...स्वर पुन्हा हळवे झाले होते...आणि पुन्हा सरीवर सरी बरसु लागल्या.


"शेखर का आलात पुन्हा...."


तिने बेडवर स्वतःला झोकून दिले तसे तिच्या हातून बामाची बाटली निसटून बेडवरून घरंगळत खाली पडली.


"त्यांचे डोके दुखत होते ना...ते खरे होते की मला बोलवण्याचा बहाणा होता..."
तिने डोळे पुसले आणि ती पुन्हा उठून बसली.


"मी पण ना ही टॅब्लेट आणि बाम परत घेऊन आले...तिथे ठेवले असते तर त्यांनी लावले असते ना. आता पुन्हा तिथे कशी जाऊ...गेले तर त्यांना वाटेल हिला माझ्याशिवाय करमतच नाही.

नको...पुन्हा न गेलेलेच बरे."


****

रात्री डिनरच्या वेळेस

राहुल, त्याच्या बाजूला रागिणी आणि तिच्या बाजूला प्रिया असे बसले होते. मिहिका जिने उतरत आली.

"शेखर अजून आला नाही ... त्याचा रूम बंद होता म्हणून मी त्याला कॉल केला नाही...काय झाले...तो ठीक आहे ना?तू कॉल केला होतास का?"
राहुलने तिला विचारले.


"नाही...मी टॅब्लेट घेऊन गेले होते तेव्हा त्याने दार खोलले नाही. नंतर मला मेसेज केला की त्याची तब्ब्येत ठीक नाही तो डिनरला सुद्धा येणार नाही. "


"मी पाहून येतो...."


"नको राहुल...तो आराम करत असेल..."
मिहिकाने त्याला रोखले.


प्रियाच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले.


"त्यांची तब्ब्येत खरोखरच ठीक नाही..."
ती उठली.

"पियू...काय झाले?का उठलीस?"रागिणीने विचारले.

"माझा फोन..."

ती फोनचा बहाणा देणार होती पण तो तर तिच्या हातातच आहे हे तिच्या लक्षात आले.

"इयरफोन आत चार्जिंगला लावला होता.. मी बटण बंदच केले नाही बहुतेक...आणि ह्या ड्रेस मध्ये थोडे अन्कमफोर्टेबल वाटतेय...मी चेंज करून येते. "


आता हिच्या ड्रेसला काय झाले या नजरेने रागिणीने तिच्या ड्रेसकडे आणि तिच्याकडे पाहिले आणि ती असे का करीत आहे हे तिने ओळखले.

"पियू..."

प्लीज...प्रियाने इशाऱ्यानेच रागिणीला विनवले.

"गाईज तुम्ही डिनर सुरू करत आहात का? कारण मला भूक लागली आहे. "
त्या दोघींकडे पाहत मिहिकाने तोंड कसेसेच केले...जणू काय तिच्यालेखी त्यांची काही किंमतच नव्हती.

"रागिणी... जीजू..तुम्ही सुरू करा मी येतेच."

प्रिया तिथून निघून आपल्या रूममध्ये आली आणि तिने म्हटल्याप्रमाणे आपला ड्रेस बदलला. पण हे सर्व करताना सुद्धा तिच्या मनात त्याचेच विचार सुरू होते.

मनाचा हिय्या करून तिने बामाची बाटली आणि टॅब्लेट घेतली...आणि या खेपेस नॉक न करता ती सरळ त्याच्या खोलीत शिरली.

तो बेडवर टेकून पाय मोकळे सोडून समोरील भिंतीकडे पाहत विचार करीत बसला होता. तिला पाहताच तो तिच्याजवळ गेला.

तिने हातातली बामची बाटली आणि टॅब्लेट त्याच्या हातात ठेवली.

"ही टॅब्लेट घ्या...तुम्हाला बरे वाटेल आणि डोक्यावर जरा बाम चोळा. "

ती रुक्षपणे म्हणाली आणि रूममधून बाहेर निघून आली. त्याला मात्र तिच्या ह्या कृतीवर हसू आले.

"माझ्यावर राग आहे तरी माझी इतकी काळजी!!!"

ती बाहेर पडताच तिच्या मागून तो ही आला.
रागिणी त्या दोघांकडे आळीपाळीने पाहू लागली.

नक्की यांचे काय चाललेय?

ती रागिणीच्या बाजूला बसली.

"शेखर... कम ऑन बेबी.. ये इथे बस. "
नाईलाजाने तो तिच्या बाजूला जाऊन बसला.

तिचे त्याला बेबी म्हणणे प्रियाच्या काळजावर असंख्य वार करीत होते.

मिहिका त्याला पोळी वाढत होती इतक्यात प्रियाने समोर असलेला भाताचा आणि डाळीचा बाऊल त्याच्या पुढे केला.

मिहिकाने चमत्कारिकरित्या तिच्याकडे पाहिले.

"मला वाटले तू त्यांना जेवण वाढत आहेस ना.. राईस आणि डाळ माझ्या पुढ्यात होती म्हणून मी पुढे केली. "प्रिया म्हणाली.

शेखर तिच्याकडे पाहून मंद हसला. व त्याने आपले ओठ हलवले.

"बायको..."
तो जे बोलला ते तिला कळले पण मिहिका मात्र त्याच्या तोंडाकडे पाहू लागली.

"काय बोलतो आहेस तू...तुला भात नको का?"

"हवा आहे.. मी रात्री फक्त दाल राईस खातो. "
शेखर म्हणाला आणि त्याने आपल्या ताटातली पोळी काढून ठेवली.

मिहिका प्रियाकडे संशयाने पाहू लागली.
पण प्रियामात्र रागिणीशी बोलण्यात व्यस्त होती आणि राहुल जेवणाचा आस्वाद घेण्यात गुंतलेला होता.


रात्री शतपावली करत असताना राहुल आणि मिहिका बोलत पुढे जात होते पण शेखरचे लक्ष प्रियावरच होते.

"पियू...हा तुझा नवरा मिहिका बरोबर आलाय खरा पण त्याचे पूर्ण लक्ष तुझ्याकडेच आहे...बघ आताही एखाद्या मजनू सारखा तुझ्याकडेच पाहतो आहे. "

"ते उगीचच ...मी समोर आहे म्हणून मला तसे दाखवत आहेत. माझ्यावर इतके प्रेम असते तर मिहिकाबरोबर नसते फिरले. इथेही ते तिच्याबरोबरच आले आहेत ना!"

"हो गं ...तू म्हणते आहेस तेसुद्धा मला पटत आहे..पण मी कालपासून पाहत आहे...तो मिहिकाशी खूप कमी बोलत आहे...मी जे पाहत आहे ते खरे असले तर पियू तू खूप लकी आहेस...तुला पाहून त्याचे मन भरतच नाही... नाहीतर माझा नवरा बघ. मैत्रीण आल्यापासून त्याला बायको दिसतच नाही. "

राहुल मिहिकाशी हसत खिदळत गप्पा मारीत होता. काहीतरी जोक झाल्यावर ती दोघं एकमेकांना टाळ्या देत होती.

रात्रीचे अकरा वाजले.

"राहुल, मिहिका.....मी झोपायला जात आहे. "
शेखर बंगल्यात निघून गेला. राहुल आणि मिहिका अजूनही गहन गप्पा मारण्यात गुंतले होते.

"रागिणी...मला झोप आली आहे. आता जाऊ या का?"

"हो..मलाही." जांभई देत रागिणी म्हणाली आणि तिने जाताना सूचकपणे राहुलकडे पाहिले.

"मिहिका...आमच्या मॅडम आत जात आहेत...त्यांना फॉलो नाही केले तर उद्याचा महत्त्वाचा दिवस वाया जाईल. लेट्स गो. "


****

प्रिया तिच्या रूमजवळ आली. तिने शेखरच्या बंद दाराकडे पाहिले व एक उसासा घेतला. ती आपल्या रूमचे दार खोलणार इतक्यात तिच्या पोटावर कोणीतरी पकडले आणि दुसऱ्याच क्षणी ती शेखरच्या रुममध्ये होती.

*****

क्रमशः


सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही.