भाग - 35
( मागच्या भागात आपण बघितले - अनिश आसावरीला बोलतो कि तू माझ्यात अडकून पडू नकोस आयुष्यात पुढे जा - आता पुढे )
आसावरी घरी येते, तीला अनिशच्या बोलण्याचं खुप वाईट वाटतं, ती मनात म्हणते - माझं चित्राचं प्रदर्शन आणी दोन दिवसांनी अनिशचा बर्थडे झाला कि लगेचच निघणार मी, अनिशलाचं माझ्या प्रेमाची कदर नाही आहे तर इथे तरी कशाला राहू मी....
दोन दिवसांनी चित्राचं प्रदर्शन झालं, आसावरीचं चित्र एका मोठ्या व्यापार्याने विकत घेतलं, त्याला ते चित्र प्रचंड आवडलं होतं त्याने खुशीने ठरलेल्या किमतीपेक्षा अधिक किंमत दिली होती चित्राला, त्यामुळे आसावरी खुप खुश होती.
प्रदर्शन संपल्यावर सगळे तिचं अभिनंदन करत होते, तीही प्रत्येकाचे मनापासून आभार मानत होती. एवढ्यात आसावरीच्या खांद्यावर कोणी तरी हात ठेवला, तीने मागे वळून पाहिले, तिच्याचं कॉलेजमधला मुलगा केदार होता, तीला त्याला बघून आश्चर्य वाटलं, त्याचं एकेकाळी आसावरीवर एकतर्फी प्रेम होतं, पण तीला तो आवडतं नव्हता....
केदारने आसावरीचा हात हातात घेतला आणी म्हणाला अगं प्रदर्शन बघायला मित्रांबरोबर आलो होतो, तुझं चित्र बघितलं, खुप अभिनंदन तुझं.. तीने त्याच्या हातातला हात सोडवण्याचा प्रयत्न केला कारण तिथे अनिश आणी पारस पण जवळचं उभे होते, तीने त्याचा हात सोडवून घेतला पण तरीही अनिशने ते बघितलं होतं.
आणी अनिश तिच्या जवळ गेला, आसावरी म्हणाली, अनिश हे माझ्या कॉलेजमध्ये होते, हे केदार जाधव.. आणी हे माझे मित्र अनिश आणी पारस आसावरीने पण ओळख करून दिली.
केदार अगदी फ्रँकली सर्वांशी बोलत होता, सगळी चौकशी केली त्याने, आसावरी, अनिशचे मोबाईल नंबर पण त्याने घेतले, माझं ऑफिस इथे जवळचं आहे, असं बोलून केदारने त्याचं कार्ड पण आसावरीला दिलं, पुन्हा नक्की भेटू असं आवर्जून तो आसावरीला प्रेमाने बोलत होता, त्याची ती आसावरीबरोबर बोलण्याची पद्धत बघून अनिशच्या मनात चलबिचल झाली....त्याला ते केदारने आसावरीचा हात हातात घेणं पण खटकलं होतं...
सर्व घरी आले, अनिश अस्वस्थ होता, त्याला रात्रभर आसावरीचं स्वप्नात दिसत होती. त्यामुळे त्याला नीट झोपच लागली नाही. उठायलाही उशीर झाला. ड्रायव्हरला गाडी काढायला सांगुन तो बाहेर आला. तर बाहेर आसावरी झोपळ्यावर बसलेली त्याला दिसली, तीने अनिशला बघून हाय केलं, अनामिक ओढीने तो व्हीलचेअरवर बसूनच तिच्याजवळ गेला, तिच्या नुकत्याच धुतलेल्या केसांमधून पाणी गळत होतं, ती सुंदर दिसत होती, अनिश तिच्याकडे बघतचं राहिला, तीला लाजल्यासारखं झालं...
अनिश असं चुटकी वाजवून तीने म्हंटल, तसा अनिश भानावर आला, त्याच्या मनात आलं हिला सांगून टाकावं माझं पण हिच्यावर प्रेम आहे, मला पण हळूहळू तू आवडायला लागली आहेस, हे शब्द अनिशच्या अगदी तोंडावर आले होते तोच त्याचा मोबाईल वाजला..
मोबाईलवर केदारचं नावं बघून तो चकित झाला आणी त्याने आसावरी पासून जरा दूर जाऊन फोन उचलला, हॅलो अनिश मला तुम्हाला भेटायचं होतं केदार बोलला, आसावरीला सांगू नका, तुमच्या ऑफिसमध्ये मी येऊ कां, असं त्याने विचारलं, अनिश बोलला बरं दहा वाजलेत तुम्ही बारा वाजेपर्यंत या आपण बोलू...
केदारचं बोलून ऐकून त्याच्या मनात धस्स् झालं, त्याने आसावरीकडे वळून पहिलं, आणी त्याला त्याच्या कुबड्यांची आठवण झाली, तो भानावर आला, आणी ऑफिसला जायला निघाला आणी गाडीत बसून विचार करू लागला, कां भेटायचं असेल, काय काम असेल ह्या केदारचं माझ्याकडे, विचार करतच तो ऑफिसला पोचला, त्याने सेक्रेटरीला कळवलं - केदार जाधव आले कि त्यांना लगेचच आत पाठव.
सव्वा बाराच्या दरम्यान केदार आला, कॉफी पिऊन झाल्यावर त्याने बोलायला सुरवात केली, मला आसावरीबद्दल बोलायचं आहे तुमच्याशी. अनिशची शंका अचूक ठरली, त्याला वाटतंच होतं कि ह्याला आसावरीबद्दल बोलायचं आहे असं...
हा केदार बोला ना - असं बोलून अनिशने त्याला होकार दिला.
केदार बोलू लागला - मी खुप वर्षांपासून आसावरीवर एकतर्फी प्रेम करतो, मी तीला कां आवडतं नाही हे मला माहीत नाही, कदाचित तिच्या घरची परिस्थिती माझ्या घरच्या परिस्थितीपेक्षा चांगली होती ती श्रीमंत घरची आहे, आणी मी तेव्हा मध्यमवर्गीय होतो, पण आता तसं नाही आहे माझी आर्थिक स्थिती सुधारली आहे माझं स्वतःच ऑफिस आहे, माझा स्वतःचा छोटासा कां होईना पण एक फ्लॅट आहे..
काल तीला बऱ्याच वर्षांनी बघितल्यावर ती मला पहिल्यापेक्षा अजूनच सुंदर आणी कॉन्फिडन्ट वाटली, ती मला माझ्या आयुष्यात हवी आहे प्लिज तुम्ही मला यात मदत करू शकाल कां...
केदार आसावरीबद्दल अगदी भरभरून बोलत होता आणी अनिशच्या मनावर आघात होतं होते, त्याने स्वतःच्या मनावर कंट्रोल ठेवत म्हंटल, “हो नक्कीच. मी तुम्हाला नक्की मदत करेन, मी आसावरीशी ह्या विषयावर जरूर बोलेन. थँक यु सो मच म्हणत केदार जायला उठला, अनिश त्याला बाय ही नीट म्हणू शकला नाही.
तो खुर्चीवर बसून विचार करू लागला, आसावरीसाठी केदार सुयोग्य जोडीदार आहे, त्याचं बरेच वर्षांपासून तिच्यावर प्रेम आहे, यासाठी आसावरीला तयार करायलाच हवं, केदार बरेच वर्ष तिच्यासाठी थांबला आहे...
त्या दिवशी घरी आल्यापासून अनिशच वागणं बदललं, तो आसावरीबरोबर अंतर ठेवून वागू लागला, तो तीला टाळू लागला. या ना त्या कारणाने तो तिच्यापासून दूर पळे.
हळूहळू हे आसावरीच्या लक्षात यायला लागलं. पण तीला याचं कारण माहित नव्हतं. तीने अजून एक दिवस वाट बघून अनिशचा खास मित्र पारसशी बोलायचं ठरवलं..त्याला तीने फोन केला पण तो ही म्हणाला कि मला काहीच कल्पना नाही आहे.
अजून एका ठिकाणी चित्रांचं प्रदर्शन लागणार होतं, तिथल्या आयोजकांचा फोन आल्यावर आसावरीचं जाणं अजून पाच - सहा दिवस लांबलं. अनिश ते ऐकून मनोमन खुश झाला.
दुसऱ्या दिवशी अनिशचा वाढदिवस होता प्रेरणाताई आणी आसावरीने मिळून छान एका हॉटेलमध्ये वाढदिवस साजरा करायचं ठरवलं, आणी जास्त कोणी नाही पण घरचीच ही चौघं आणी पारस आणी अनमोल अनिशचे मित्र अश्या सगळ्यांनी मिळून वाढदिवस सुंदर साजरा केला अनिश खुश झाला.
दोन दिवसांनी आसावरी प्रदर्शनची जागा बघण्यासाठी तिथे गेली, तिथून निघताना तीला केदार दिसला, तिच्या मनात शंकेची पाल चुकचूकली, ह्याला कोणी सांगितलं मी इथे आज येणार आहे ते असं तीला वाटलं, तीने विचारलं तू इथे कसा तर तो म्हणाला, अगं माझ्या ऑफिसच्या कामासाठी सहजच इथून जातं होतो तेवढ्यात तू ह्या हॉलमधून बाहेर पडताना दिसलीस. केदारला खरंतर अनिशने हे कळवलं होतं.
चलं, समोरच्या कॉफीशॉप मध्ये कॉफी घेऊ, त्याच्या आग्रहापुढे आसावरी नाही बोलू शकली नाही. इकडं तिकडचं बोलून झाल्यावर केदारने तीला विचारलं लग्नाबद्दल काय ठरवलं आहेस, अजून काहीच ठरवलं नाही आहे तिच्या ह्या अलिप्त उत्तरावर केदार शांतच बसला.
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - आसावरी आणी केदारचं नातं पुढे जातं कि आसावरी अनिशबरोबर तिचं आयुष्य घालवते.)
वाचकहो - कथेचे भाग पोस्ट करायला जरा उशीर होतो आहे त्याबद्दल क्षमस्व...
( माझी त्यबेत बरी नसल्यामुळे जरा भाग पोस्ट करायला उशीर झाला त्याबद्दल सर्वांना सॉरी )
( माझी त्यबेत बरी नसल्यामुळे जरा भाग पोस्ट करायला उशीर झाला त्याबद्दल सर्वांना सॉरी )
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा