प्रेमाचे क्षण गवसले
भाग 13
इकडे पुन्हा मुलाचा फोन येतो ,तो आईच्या फोन वर फोन करतो..
आई तो फोन घ्यायला ही सुनेला हाक मारते..
"अग फोन देतेस का जरा तो..पाठ अकडली खूप.."
"माझे ढीग भर उपकार झालेले चालतील का मग देते सासूबाई..." सून आतून हसत बोलली
सासूबाईने लगेच ,"राहूदे मीच उठून घेते..आता तर लेकीनेच सांगितलं आहे तिला तुम्ही हालचाल करू द्या म्हंटल्यावर पडत्या फळाची आज्ञा "
सासूबाई कशी बशी फोन घेते.."हॅलो बोल बाबा.."
"आई ताईची सासूबाई येणार असल्याने ती म्हणाली आईला घेऊन येऊ नकोस..ती म्हणते सासूबाईला आराम करण्यासाठी आणले आहे तर आई न आलेली बरी.."
"आई न आलेली बरी म्हणते माझीच कार्टी. "
"हो शेवटी ते तुझे हक्कच घर नाहीच ना .."
"तू ही बोलून घे आता.."
"तू आपल्या घरी रहा ,थोड्या दिवसा त्या जातील मग तू जा..ताईला सासूबाईंच्या दिमतीत कमी पडलेली चालत नाही..आणि त्या आल्यावर त्या ही तिला भरभरून जीव लावतात..मग आपण का त्यांच्या मध्ये जायचे..ते बरे दिसत नाही असे.."
मुलाचा आणि मुलीचा ही राग आला होता त्यांना..आगाऊपणा करत आहेत..दोन दिवस तयारी करून घेतली आणि ऐनवेळी नाही म्हणून नकार कळवला...
त्या तोंड पडून बसल्या तशी त्यांना चहाची आठवण झाली ,सुनेने ओतून ठेवला होता तो निदान आपण हळूच घेऊन येऊ..रागात बोलून गेलो पण चहा मात्र चहा असतो तिच्या हातचा म्हणत त्या गेल्या..
आणि अचानक सुनेचा मागून आवाज आला ,
"मग कसा झाला चहा ?? घेतलाच ना शेवटी ढीगभर उपकार करून .." डोळे मोठे करत
"माझ्या घरी आहे मी जावयाच्या घरी नाही.."
"पण चहा तर मी केला होता ,तो तुम्ही घेणार नव्हता..मग स्वतःच मान ही नाही राखला..स्वतःचा शब्द ही नाही पाळला.."
सासूबाई आता रागात म्हणाल्या ,"घेऊ की नको घेऊ चहा..?"
सून म्हणाली ,"तुमची मर्जी..? "
सासूबाई लगेच म्हणाली, "कमी पडलाय की ग..अजून हवा होता..तुला माहीत आहे ना तुझ्या हातचा चहा थोडा घेऊन मन नाही भरत.."
ती आता हसत होती ,त्यांना सांगत होती ,"ताई म्हणत होत्या आईला चहा देऊन तुम्ही मारणार एक दिवस..नुसता गोड चहा दे म्हणाली की तू गोड चहा देतेस..कमी पडला म्हणालीस की जास्त देतेस कधी तरी सरळ नकार देत जा..तिला ही नकाराची सवय लाव..सासू आहे म्हणून काळजी घ्यायची नाही आणि लाड करत जायचे हे पटत नाही..."
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा