प्रेमाचे क्षण गवसले
भाग 14
"सगळे ताईंचे ऐकणार का आता..?"
"हो कारण तुम्ही जरा ही हालचाल करत नाहीत..जागा सोडत नाहीत..काम करत नाहीत..मन रमवत नाहीत..गोड खातात पण गोड बोलून आमचे मन सांभाळत नाहीत..."
सासूबाईने रिकामा कप पुढे केला ,अजून चहा हवा म्हणून पण सुनेने सरळ नकार दिला आणि निघून गेली...
******
इकडे समर्था आणि शशांक घरी आले होते ,त्यांनी घरात येताच आजी कडे जाऊन बसले.. तिला किस करत होते..लाड करत होते..मिठीत घेऊन तिला माझी आजी ग ,पिल्लू आजी ग..घराची शांती जणू..
आजी ने दोघांना दूर लोटले..त्यांना लाडात चपटा मारल्या..आणि डोक्यावर हात लावून बसली
"नेहमीच असे करते आपली आजी नाहीतर बघ सोनूची आजी.." समर्था रागात म्हणाली आणि तोंड फुगून बसली
"काय सोनूची आजी ?? " आजी रागात
"किती फ्रेंडली वागते तिच्या सोबत.." समर्था डोळे फिरवत
"घ्या तुम्हीच राहिला होतात,तिचे कौतुक करण्याचे.." आजी नाक मुरडत
शशांक लगेच समर्थाला हात लावून गप्प करत म्हणाला," तुला पण काही कळत नाही ,कुठे कोणाशी बोलते भान ठेव..नाही आपली आजी तशी तर रडत बसणार का ?? सोनूची आजी ती सोनूची आजी..आपली पण काही कमी नाही..जातांना आजीने पैसे दिले ना आपल्याला हे सोनूची आजी देईल का ???"
शशांक असे लाडिगोडी करत होता आणि आजी मनात हसत होती, शशांक तिचा गुणाचा होता म्हणूनच ती त्याला पैसे द्यायची..
आजीने च्या आवडीचे फायदे ही घेत होते ,सर्रास बाहेर आजीला सांगून जायचे ,पण आईला सांगून जात नसत..आईची घरात काहीच चलती नाही याचा पुरेपूर फायदा घेत दोघे ही जण..मग आजीला ही वाटत माझे नातू आईला विचारत ही नाही...माझ्या मुलंच रक्त आहे शेवटी बापाच्या आईकडे त्यांचा ओढा असणार..आईच्या मुठीत कसे राहतील..आजीला ही हेच हवे होते..
"आईचे ऐकायचे नसतेच रे तसे ही ,बाबा सांगतो ते करत जा..बाहेर जाण्यासाठी माझ्या नंतर त्याची वर्णी लावत जा..आईला तसे ही कोणत्या घरात अधिकार नसतात ,सगळे बाबा करता करविता असतो.." आजीनं नको ते मुलांच्या मनात नेहमी हेच भरून दिले होते..

"तुला देते मला नाही.."
"मी लाडका तू दोडकी..तुला सोनूची आजी आवडते मला आपली.."
दोघे हसून गम्मत उडवत होते ,तिकडून आई त्यांचा आवाज ऐकताच बाहेर आली आणि तिने पाहिले दोघे आजीची चेष्टा करत होते ,तिला ते कळले पण तिला नाही आवडले..
"आजीची गमतीत ही गम्मत करू नका. "
"राहू दे माझे नातू आहेत,मला काही वाटत नाही तू का वाईट वाटून घेत आहेस..??"
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा