Login

प्रेमाचे क्षण गवसले भाग 15

प्रेमाचे क्षण
प्रेमाचे क्षण गवसले
भाग 15

"कारण त्यांना सवय लागली आहे मोठ्यांना आगाऊपणे बोलण्याची ,त्यांची हिम्मत वाढली आहे बरेच काही करण्याची..आपल्या आई वडिलांकडून काही कमी पडले की त्यांची इज्जत काढण्याची..आणि परस्पर तुमच्या कडून शाळेच्या कामासाठी म्हणून पैसे घेऊन कॅफे मध्ये खाण्याची..हो ना !!"

आई हे बोलतच दोघांचे चेहरे बघण्यासारखे झाले होते..त्यांचे हसणे बंद झाले होते..दोघे ही टेन्शन मध्ये आले होते..

हे आईला कसे माहीत झाले ,आईला कोणी सांगितले .?? आपण कॅफे मध्ये जाऊन खातो हे कसेच समजले असेल..?

मुलांना आता आईच्या अश्या बोलण्याने तिचा राग आला होता ,त्यांनी लगेच आजीकडे आईची जणू तक्रार करायला सुरुवात केली..

"बघ ना आजी तू पैसे देतेस तर आईला त्याचा ही त्रास होतो.." समर्था

"पण आई हे पैसे तू कुठे दिलेस आम्हाला, आजी ने दिलेत तर तू त्रास का करून घेतेस..पप्पा काही बोलत नाही मग तू मध्ये का बोलते..तसे ही तू स्वतः तर मन मारायचे शिकली आहेस..आणि तुला वाटते की आम्ही ही तेच करावे..?" शशु ही समर्था चा सुर घेत आईवर डाफरला होता

दोघे ही आता आजी आईला बोलले ह्या बद्दल म्हणून आजीच्या जवळ जाऊन तिच्या मागे उभे राहिले..कारण आजीचे आणि आईचे पटत नव्हते ह्याचा असा फायदा मुलं घेऊ बघत होते.

आजी हसली ,आणि ती आता काही बोलणार इतक्यात सुनेच्या बाजूला येऊन उभी राहिली..

मुलांना वाटले आता आजी आईला बोलणार , ऐकवणार पण आजीने तर सुनेची बाजू घेतली..

"काय समजतात रे तुम्ही तुमच्या आईला ,काय समजतात तुम्ही मला ??"


आजीने प्रश्न केला पण त्यात त्यांना दम होता ,की तुम्ही आमच्या नात्याला सहज विरोधकाचे नाते समजतात..?

आजीने त्या दोघांना आज त्यांच्या लक्षात आणून द्यायचे ठरवले.. त्यांची कान उघडणी करायचे ठरवले..दोघे घरात चुकीचे वागणार आणि आजी आणि आई मध्ये एकीला साक्षीदार आणि एकीला गुन्हेगार ठरवणार..ते ही तुमच्या चुकी वागण्या वर पांघरून घालण्यासाठी आजीला पुढे करणार...?

आजीला त्यांच्या वागण्याची पुष्टी करायची नव्हतीच म्हणून दरवेळी जशी त्यांच्या छोट्या छोट्या चुका लपवून ती समर्थन करत असत तसे आज नाही केले..

"आजी तू आईच्या बाजूने बोलणार आमच्या विरुद्ध.." शशांक डोळे मोठे करत

क्रमशः

🎭 Series Post

View all