प्रेमाचे क्षण गवसले
भाग 17
"आई हे अति होतंय.."
"किती करशील अति.." सासू
"मी तर म्हणते ह्यांनी दोघांना आज शिक्षा करावी.." सून
"मी आहेच इथे ,नेहमी बाजू घेते मांडते पण आज सोक्ष मोक्ष लागू दे..माझेच लाड भोवत आहेत हे..तू काय म्हणत होतीस अजून कोणती चूक केली त्यांनी ती ही सांग..त्यांचा बाबा ठरवेल कोणती शिक्षा द्यायची..मला उलट बोलत आहेत ,तू अडवतेस तर तुला ही..बाबांना सांगू म्हणालो तर मला हुशारी शिकवतो हा..अशी वेळ आली आहे.."
"काय ग आई कोणती अजून चूक केली आम्ही.." समर्था आईला जाब विचारत
तितक्यात बाबा दारात उभा असतो ,तो बघतो समर्था कमरेवर हात ठेवून आईला उलट तपासणी घेते ,जाब विचारते..डोळे मोठे करून बोलते..हे तर त्याला ही आवडले नव्हते..आज आईला असे बोलते ही तर हिची पुढची वाटचाल कशी असेल हे आज ह्या वागण्यावरून कळले..
तोच शशु ही समोर येऊन आईला म्हणाला ,"पाळत ठेवते का आई तू आमच्या वर..हो आणि सांग बाबांना की आम्ही कॅफे मध्ये गेलो होतो ,त्यात तुझ्याबद्दल बोलत होतो..तू कशी स्वतः मन मारत जगते आणि आम्हाला ही तेच शिकवते..हो नाही आवडत तुझे आई होऊन सतत संस्कार देणे..तुझी जशी आवस्था करून घेतली आहेस तशी आम्हाला आमची करायची नाही... तू पैसा वाचव ,तो घरात खर्च कर..त्यात समाधान मान पण आमच्या कडून कृपा करून हे करून घेऊ नकोस...दम गुदमरतो आमचा ह्या घरात..म्हणून जातो आम्ही कॅफे मध्ये, आजीकडून पैसे घेतो पुस्तक ,प्रोजेक्ट च्या नावाने आणि तो बाहेर खर्च करतो...बोल आता हे ही बाबांना बोल..त्यांचे कान भर..जा..!! "
शशु हे बोलत असतांना बाबा तर थक्कच झाले, त्यांना कळेना हे मुलं जेव्हा आई कडे काम असते ,आजी कडे काम असते ,माझ्या कडे काम असते तेव्हा किती गोड असतात ,सगळ्यांचे सगळे काम ऐकतात..आज तर हद्द करत आहे हे दोघे ही..
मग आजी पुढे आली आणि तिने दोन काना खाली लावून दिल्या..एक समर्था ला लावून दिली ,आणि सांगितले खबरदार माझ्या सुनेला काही ही उलट बोलशील तर...आज दोन दिल्या आहेत ,रोज दोन दोन द्यायला कमी नाही करणार..तिने काही चुकीचे केलेले नाही..तिच्या संस्कारावर कोणी जरी बोट उचलून दाखवले तर मी आहे आणि तो आहे..आमचे काही ही वाद असो पण त्याचा फायदा तुम्ही कोणी ही घ्यायचा नाही..माझी लेक मला समजून सांगत असते सुनेला दुखवू नकोस तीच तुझी काळजी घेते ,घेणारी आहे..ती ही कधी फायदा घेत नाही..
समर्था आजीला उलट बोलणार इतक्यात बाबा समोर आडवे आले ,आणि आजी आणि समर्थांच्या मध्ये येऊन उभे राहिले ,त्यांचे डोळे रागाने लाल बुंद झाले होते..त्यांना झालेला प्रकार कळला ही मुलांना माहीत नव्हते पण त्यांचा राग आणि डोळे पाहून ते माहीत झाले..
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा