Login

प्रेमाचे क्षण गवसले भाग 18

प्रेमाचे क्षण
प्रेमाचे क्षण गवसले

भाग 18

"माझ्या आईला कोणी ही उलट बोललेले मला आवडत नसते ,आणि आवडणार ही नाही..मग कोणी ही असो..लाडाची लेक ही असो.."

बाबा असे बोलतात त्यांचा राग त्यांच्या चेहऱ्यावर आणि उगरलेल्या हातात दिसत होता..आता सगळेच तापले होते ,घरात दोन गट झाले होते..एक म्हणजे आई बाबा आजी तर एक समर्था आणि शशु...

सगळ्यात मोठा आघात बसला तो वडिलांना ,मुलं बऱ्याचदा त्यांच्या प्रेमाचा फायदा घेऊन आईला खोटे पाडत.. तरी ही वडिलांना वाटत की ते सुधारतील..बऱ्याचदा हे दोघे सत्य लपवून खोटे सांगत..जे त्यांना माहीत नसतं आणि त्याबद्दल बायकोला ओरडा बसत...

खुद्द सासूबाईमुळे ही आणि मुलांमुळे ही नवऱ्या बायकोच्या नात्यात दुरावा येत होता ,तो त्यांची बाजू घेणार आणि तिला सगळे मिळून एकटे पडणार..हे ठरलेले असायचे..त्यात ती किती ही खरे सांगत असली तरी तीच बेअक्कल ती काही कळत नाही..उगाच दबाव आणते..अति कडक शिस्त लावते..अशी कोणती आई असते..म्हणून म्हणून सासू ,नवरा आणि मुलं सहज तिचे म्हणणे काना आड टाकायचे..आणि तिचे घरात काही ही चालणार नाही ,कोणी ही ऐकणार नाही असेच मानून बसले होते..पण आज जे घडले ते आधीच घडायला हवे होते..

आज मात्र सगळे वागणे समोर आले होते...आणि ती म्हणत होती ते पटत होते ,सासूने ही तिची साथ दिली होती...आज खरे खोटे वडिलांच्या समोर झाले होते..

"मी बघत होतो आणि मुद्दाम बाहेर उभा होतो ,जर मी ऐन वेळी आलो नसतो तर मला तर माझ्या मुलांनी स्वतःची बाजू किती खरी हे सांगून गुंढाळले असते..आणि मी जाऊदे म्हणून सोडून दिले असतेच त्यात बायकोला विनाकारण दोन गोष्टी सुनावल्या असत्या...पण आज जे झाले ते योग्य झाले...त्यात माझ्या आईसोबत गैर वागणे..उंच आवाज करून भांडणे हे ही कळले नसते.."

समर्था तर त्यांचा राग बघून थरथरत होती ,आई समोर लाड चालले पण बाबांनी तर तलवार उपसली जणू..तिला लगेच वाटू लागले गोड गोड भावनिक बोलून बाबांना वळवता येईल..ते वितळतील..त्यांना त्यांची समू खूप आवडते.. तर ते राग विसरून जातील...

समर्था हळूहळू बाबा कडे येत होती ,लाडात येऊन त्यांचा हात पकडणार होती की इतक्यात

तो आता बायकोकडे गेला ,तो खूप चिडला होता पण तिच्या समोर येताच त्याने तिची हात जोडून माफी मागितली होती..