Login

प्रेमाचे क्षण गवसले भाग 19

प्रेमाचे क्षण
प्रेमाचे क्षण गवसले

भाग 19

"हारलो तर नाही ना आपण मुलांना, त्यामुळे आपलीच मुलं नवरा बायकोच्या वादाचा फायदा घेतात..यांनी आज तुला आवाज चढवला ,आईवर माझी ही गुणाची लाडकी लेक धावून गेली..आता मी बोलू शकतो म्हणून दोघे गप आहेत पण उद्या चालून मी थकलो तर माझ्यावर ही आवाज चढवायला कमी करणार नाहीत."

दोघे ही समोरच उभे होते ,तिला कळत होतं की आपला नवरा आपल्या मुलांची बाजू घेऊन एका चांगल्या पित्याचे कर्तव्य पार पाडत होता ,त्याने होईल तोपर्यंत सगळ्या गोष्टी सहज घेतल्या..चूक त्याची नव्हती जोपर्यंत त्याच्या प्रेमाच्या मर्यादा त्याला कळल्या नाही ,चूक तेव्हा झाली जेव्हा त्यांच्या चुकांची घनता वाढत होती तरी तो सर्रास दुर्लक्ष करत...ते करत असतांना मुलं त्याच्या जवळ जात होती आणि आई आई मुलांमधील अंतर वाढत जात होते...मुलांची नको तितकी चुकीची बाजू घेत असल्यामुळे आणि तिच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करत होते ,त्यात असे चुकीचे वागून ,मुलांना भरीस टाकून तिची इमेज मुलांच्या नजरेत पाडत होते..

आई मुलांमधील अंतर वाढले ,तर नवरा बायको मधील ही अंतर वाढले..ह्यात फायदा मुलांचा होऊ लागला ,मुले त्याचा फायदा घेत होते..

"ऐका ना आहो.. तुम्ही नाही चुकलात.."

"मी कसा नाही चुकलो म्हणतेस.?"

"तुमची भूमिका वडिलांची होती प्रेमळ ,आणि लेट गो म्हणून मुलांना माफ करत होते..पण त्याचा गैरफायदा त्यांनी घ्यायला नको होता पण त्यांनी घेतला ,घेत गेले आणि प्रकरण आज ह्या टोकापर्यंत आले..."

"तू वेळोवेळी वाईट होऊन मला सांगत होतीस.."


"हो आई म्हणून मुलं बिघडायला नको हेच वाटत होते मला..पण माझे काही एक चालत नव्हते तुमची टीम समोर..."

"टीम?"

"हो आई ही होत्याच ना त्यांच्या पाठीशी.."

"आईने तर तेव्हाच शिकवायला हवे होते.."

"आजीच्या भूमिकेत तितके चालू असते ,गुन्हे माफ असतात पण एका हिद्दीत आजीने मागे बसून बघ्याची भूमिका घ्यायला हवी होती ,आई समजवते किंवा रागावते तर मुलांच्या भल्यासाठी हे कळायला हवे होते पण त्यांनी ही मर्यादा ओलांडली.." श्रुतीने मोठा श्वास टाकला तिला हे आधीच कळले होते ,एक ना एक दिवस हा प्रकार होईल...

आता दोघांना ही चूक कळाली असेल असे कुठे ही वाटत नव्हते... ते दोघे ही असे वागत होते जणू आई वडील आणि आजी उगाच रडून तमाशा करत आहेत ,इतके ही आपण खोटे बोललो नाही की ह्यांनी घर डोक्यावर घ्यावे..तांडव करावा.. आणि एकमेकांना साक्षी व्हावे..

"इतके काही मोठे झाले कुठे..?" शशु लगेच मध्ये पडत

"आपण दोघे टिपिकल मराठी परिवारात जन्मलो रे..थोडे काही झाले की रडारड..आई तशी ,तशीच आजी ,आता त्यात बाबा ही रडारड करून आपल्याला चूक कबूल करायला लावणार बघ..." ती डोळे गोल फिरकत नाक मुरडत

क्रमशः

🎭 Series Post

View all