प्रेमाचे क्षण गवसले
भाग 21
भाग 21
------
आजी आणि आईला धाक देऊन मध्ये पडू नका सांगितले गेले होते ,नाहीतर त्या मध्ये पडल्या असत्या तर प्रकरण थांबले असते...कारण मुलांना चूक कळली होती आणि हेच हवे होते..त्यात शशांक ने तर समजदारीने समर्थाला वेळीच रागावून शांत केले होते ,वडिलांनी ही मुलांनी खरी वागणूक समक्ष डोळ्याने पाहिली होती ,आज मात्र श्रुतीला काही सांगावे लागले नाही ,त्यात सासूबाईने ही तिला साथ दिली मग इथे मिटते घ्यायला हरकत नव्हती...
"मिटते घ्या मी म्हणते ,राहू द्या कळली त्यांना त्यांची चूक.."
"अजून एक चूक बाकी आहे.."
"आता काही वाढवू नका .."
"नाही मूळ मुद्दा तर बाकी आहेच.."
"आता कोणताच मुद्दा नको ,वाद नको आणि शिक्षा नको...मुलं इथून पुढे ह्यातून धडा घेतील...पहा ते किती गप गप झाले आहेत.."
आई असे म्हणतात समर्था आईला म्हणाली ,"हे तुझ्या मुळे होते नेहमी..नाहीतर बाबा असे चिडत नाहीत..माझ्यावर हात उगारला तो ही तुझ्या मुळे पण आता होऊन जाऊ दे काय व्हायचे ते..तुला ही तेच हवे होते..तुझ्या मुळेच मी बाबांना पहिल्यांदा उलट बोलले...आजी ही आमची बाजू सोडून तुझी बाजू घेते ,दादा ही तुझ्या मुळे मला बोलला.. तू जगत नाही आणि आम्हाला ही जगू देत नाहीस हीच चूक झाली आहे.."
हे समर्थाचे बोलणे ऐकताच आता शशांक ही तिच्या कडे रागाने बघू लागला ,बाबा तर अजूनच चिडले..आजीने तर तिला दोन गोष्टी सुनावल्या..
आई आता गप बसली ,तिला रडू येत होते वाटत होते हे आपलेच मुलं आहेत की दुष्मन म्हणावे..
"मीच वाईट आहे ,ते ही माझ्या मुलांच्या लेखी.."
"म्हणूनच म्हणतो तू थांब मी बोलतो आज ह्या दोघांशी... आजच निर्णय होणार..तू जगत नाहीस आम्हाला जगू देत नाहीस म्हणणारीला मी दाखवतो जगणे काय असावे ,कोणाच्या हिमतीवर कोणाच्या जीवावर असावे...आज इथून पुढे आई जे व्यवहार सांभाळत होती ते आता मी वाटून देणार आहे..तुम्हाला पैसे दिले जातील ते फक्त शिक्षणासाठी ,त्यात तुम्हाला काय कसे उडवायचे आहेत ,कुठे खाण्यात खर्च करायचे आहेत ,कॅफे मध्ये उडवायचे आहेत ,कपडे घ्यायचे आहेत ते तुम्ही ठरवा पण हे पैसे संपताच मला किंवा आईला किंवा आजीला कोणी ही पैसे मागणार नाही..त्या दिलेल्या पैश्यातून ऍडजस्ट करा ,किंवा संपले तर नौकरी करा आता इथून पुढे मी तुम्हाला अतिरिक्त पैसे देणार नाही...आणि हो ईथुनपुढे आई आईचे आयुष्य भरभरून जगणार ,तुमच्यावर तिच्या साठी,तिच्या आवडी,छंद जोपासायला ठेवलेले पैसे तुमच्यावर ती नाही उधळून मोकळी होणार ,जे ती स्वतः जगत नव्हती ते तुमच्या वाट्याला यावं म्हणून तिचे सुख तुम्हाला देत होती ..पण आता तसे नाही होणार..तिच्या ह्या अति प्रेमाची शिक्षा तिला तुम्ही छान दिली आहे..पण आता पासून तुम्ही नौकरी करून तुमचे खर्च भागवावेत..जग जगलात आता जगात जगून पहा..म्हणजे हा माज आहे तो तिथे उतरेल..समर्था तुला जास्त गरज आहे..हो पण डोळे झाकून नाही तर डोळे उघडे ठेवून जग..मग किंमत कळली तर कळेन..पण आई झाल्यावर जास्त जमिनीवर येशील.."
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा