Login

प्रेमाचे क्षण गवसले भाग 25

प्रेमाचे क्षण
प्रेमाचे क्षण गवसले भाग 25
प्रेमाचे क्षण गवसले

भाग 25

"गम्मत सांगायची आहे.."

"हो अरे,आजपर्यंत झेप कशी घेऊ हा विचार करत होते ,पण आज खरी झेप घेतली आहे..पण पैसे खर्च झाले आहे..पर्स रिकामी केली आहे त्या नादात..मला वाईट वाटत आहे.." तोंड पाडत


तिक्यात तिचा नवरा म्हणाला ,"अग पर्स रिकामी झाली होऊ दे ,पण बाकी पैसे गेले जाऊदे पण ती तुझ्या आनंदासाठी रिकामी झाली आहे ह्याचा आनंद मला आणि आम्हाला सगळ्यात जास्त झाला आहे ,आज तुझा चेहरा बघ कसा खुश दिसत आहे ,किती वेगळी चमक आहे..स्वतःसाठी जगत आहेस हे पाहून आम्ही ही खूप खुश आहोत..नाहीतर पैसे कधी ही येतील जातील ,मी देईल..उद्या आपले पिल्लं मोठे होतील नौकरी करतील खूप पैसा असेल पण तू स्वतःसाठी जगू शकली नाही याचे आम्हाला खूप दुःख असेल..ती सल कायम मनात टोचणी देत राहील..जेव्हा ही आम्ही आमच्या परीने आमची लाईफ जगत असतो तेव्हा त्या आनंदात तू आठवलीस की मग मूड निघून जातो ,असे वाटत की आपण किती स्वार्थी आहोत ,तिला का ह्यात सहभागी करून घेऊ शकत नाहीत..ती आपल्या सोबत असावी..पण मग लक्षात येते की मुळात तुला ह्या गोष्टी म्हणजे नाहक खर्च वाटतो ,उधळमाधळ वाटते..तू सारखी पैसे जातील ,पैसे गेले म्हणत रहाशील..तू आंनद घेणार नाहीस आणि आम्हाला ही घेऊ देणार नाहीस.."

--------


असेच कैक दिवस बाबा बोलत नव्हते ,आई कामापूरते बोलत होती...मुलांना आता पैसे कमी पडत होते पण बाबांनी सांगितल्या प्रमाणे घरात पैसे मागणे ते टाळत होते ,बाहेर कॅफे मध्ये जाणे साहजिक कमी झाले होते...स्वतःच्या वागण्यात बदल झाला होता...आई आजी बाबा बोलत नसल्याने घरात अगउपणाला चान्स नव्हता ,आजी सोबत लाडिक गप्पा नव्हत्या...


आता मुलांना आई बाबा यांचे गप्प रहाणे त्यांच्याशी न बोलणे हे सहन होत नव्हते..आई बाहेर दिसली तरी थोडी बघून निघून जात होती..आईचा अबोला सहन होईना ,असे वागणे कधी नव्हते ,पण आता ती आणि बाबा एक झाले होते ,त्यात आजी ही मुद्दाम टाळत होती..अद्दल घडवा पण इतकी नको की आम्हाला हा अबोला खाऊन टाकेन..घर घर वाटणार नाही..घरात शांत असलेले लोक फावणार नाहीत..

कोणी ही इतके करत नसते पण ही वेळ आपल्या वागण्यामुळे आली आहे ह्याची सोय करावी लागेल...समर्था हे स्वतःला सांगत होती

क्रमशः

🎭 Series Post

View all