डिसेंबर जानेवारी 2025 -26
दीर्घ कथालेखन स्पर्धा
फक्त तू... ओढ तुझी भाग बारा
दीर्घ कथालेखन स्पर्धा
फक्त तू... ओढ तुझी भाग बारा
मागील भागात आपण पाहिलं कि, अवनीला विराजस जॉईन होणार ते अजिबात आवडल नव्हतं. आता पाहूया पुढे,
सकाळची वेळ होती. हॉटेलच्या आतमध्ये गोंधळ असला तरी बाहेर अजून फार अशी गर्दी नव्हती.
जयने हॉटेलच्या समोर गाडी हळूच थांबवली तसा वीर बाहेर आला. समोर उभं असलेलं हॉटेल पाहून क्षणभर थांबतो.
“हॉटेल स्वादिष्ठम "
नाव साधं… पण इमारत मोठी आणि नीटनेटकी दिसत होती... बाहेर बाग सुद्धा होती.. छान, प्रसन्न वातावरण वाटत होत
वीराज जयकडे पाहत म्हणतो,
“हेच काय ते हॉटेल?? नाव पण केवढं अवघड आहे...."
गाडी पार्क करून उतरून जय त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला,
“हो.... भावा इथूनच तर तुझी नवी सुरुवात होणार आहे... चला आत.....”
तसे दोघे आत जातात.....
रिसेप्शनवर एक तरुण मुलगी उभी असते, तिचा स्वच्छ युनिफॉर्म, प्रोफेशनल चेहरा... कोणालाही आकर्षित करून घेईल असाच होता....
त्यांना पाहून त्या रिसेप्शनिस्टने आवाज देऊन म्हंटल,
“गुडमॉर्निंग सर, हाउ कॅन आय हेल्प यु ?”
तसा जय पुढे जाऊन तिच्याकडे पाहत म्हणाला,
“आज एक न्यू ट्रेनी जॉईन करणार आहे.
त्याच नाव वीराजस आहे... चेक करून सांगा जरा....”
त्याच नाव वीराजस आहे... चेक करून सांगा जरा....”
ती तिच्या pc स्क्रीनकडे पाहते, आणि नाव तपासून निशांतला call करून माहिती देते....त्याच्याकडून आलेल्या instruction ऐकून ती पुन्हा जयकडे वळून म्हणाली,
" सर, प्लीज वैट a मोमेन्ट.....”
अजून काहीतरी चेक करून ती वळून त्या दोघांना म्हणते,
“सर, प्लीज कम विथ मी.”
तस मान हलवत वीर आणि जय तिच्यामागे चालत जातात...
कॉरिडॉरमधून चालताना त्यांच्या लक्षात येत कि बाहेरच आणि हॉटेलच्या आतलं वातावरण एकदम वेगळं आहे...
आधी ती शांत लॉबी मागे पडते आणि आता किचनमधला आवाज ऐकू येत असतो....
भांड्यांचा आवाज,ऑर्डर्स, गडबड...
ती रिसेप्शनिस्ट दाराशी थांबून त्यांना म्हणते
“सर, हेअर यु गो.
थिस इस the किचन.”
थिस इस the किचन.”
वीर दाराकडे पाहतो.... आणि एक एक श्वास घेतो.
तसा जय त्याच्याकडे पाहून हळू आवाजात म्हणतो
“वीर, आत गेलास की, एकच गोष्ट फक्त लक्षात ठेव
इथे सगळे समान आहेत.... आणि तू श्रीमंत नाही आहेस. "
इथे सगळे समान आहेत.... आणि तू श्रीमंत नाही आहेस. "
तस वीर मान हलवतो आणि आत मध्ये जातो....समोर ठेवलेला एप्रन तो उचलतो आणि एप्रन हातात धरून तो तासाच उभा राहतो, त्याच्या समोर भाज्या, चॉपिंग बोर्ड, मोजमापाचे कप होते पण ते पाहून त्याला सगळंच विचित्र वाटत होतं.
तो वैतागून एप्रन बाजूला ठेवतो आणि जयकडे पाहतो, त्याच्याकडे एकदम चिडून उदगारतो,
तो वैतागून एप्रन बाजूला ठेवतो आणि जयकडे पाहतो, त्याच्याकडे एकदम चिडून उदगारतो,
“जय,यार मी खरंच सांगतोय…मला ह्यातलं काहीच येत नाही....हे काय आहे रे पांचटपणा नुस्ता? भाज्या चिरा, पातेलं धुवा, त्यावर गर्निश करा…हे सगळं पिचपिचित... हे असल मुलींसारखं काम मी कसं करू, तेच मला समजत नाही!”
**********************************
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
क्रमश :-
@हर्षला "सान्वी"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा