डिसेंबर जानेवारी 2025 -26
दीर्घ कथालेखन स्पर्धा
फक्त तू... ओढ मनाची भाग तीन
दीर्घ कथालेखन स्पर्धा
फक्त तू... ओढ मनाची भाग तीन
मागील भागात आपण पाहिलं कि, विराजस त्याच्या आईला वडिलांशी बोलायला सांगतो... आता पाहूया पुढे,
तो आईला बिलगून रडत होता, पण त्या फक्त त्याच्या डोक्यावरून हात फिरवून त्याला शांत करत होत्या...
"मॉम, बोल ना..... तुला तरी पटलाय का?? ड्याडचा हा निर्णय,???"
" तुझ्या वडिलांनी आजपर्यंत तुझं अहित पाहिलं नाही... हेच मला समजतंय... तू स्वतःची काळजी घे... "
त्या त्याच्या चेहऱ्यावरून माया मोडत बोलल्या.
"ठीक आहे. मी निघतोय… पण मला समजत नाही इतकं काही मोठं झालं नाही तरी सुद्धा मला घरातून हाकलवून लावतात...”
हे ऐकून आता मात्र त्याच्या आईला सुद्धा वाईट वाटलं.
“हे मोठं नाही वीरू? अरे तुझ्या एका चुकीने एक घर उद्ध्वस्त झालंय.
त्या मुलाचा पाय मोडला आहे… त्याची आई रडतेय… तुझ्यामुळे... त्याला वडील नाहीत... एक लहान भाऊ आहे.. पूर्ण कुटुंबाची जबाबदारी होती त्या मुलावर....”
त्या मुलाचा पाय मोडला आहे… त्याची आई रडतेय… तुझ्यामुळे... त्याला वडील नाहीत... एक लहान भाऊ आहे.. पूर्ण कुटुंबाची जबाबदारी होती त्या मुलावर....”
ते ऐकून विराजसचा चेहरा पडला.
" पण मॉम त्या सनीने केलेल्या ऍक्सीडेन्ट मध्ये तर दोघे expire झाले तरी सुद्धा त्याच्या वडिलांनी सगळं मॅनेज केल... सगळ्यांना पैसे दिले.. न यू नो... सनीला तर चक्क निबंध लिहायला दिला पोलिसांनी.... त्याला सोडल ना... मग मलाच का ही शिक्षा? "
त्याने आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.
" त्यामुळेच मागच्या आठवड्यात सनीने काय केल... एका मुलीवर हात टाकला...आता आहे ना जेलमध्ये... त्यात पण तो कधी ना कधी सुटेल म्हणा... पण ह्यात सगळ्यात जास्त चुकी त्याच्या वडिलांची आहे... ज्यांनी त्याच्या चुका पाठीशी घातल्या.वेळीच समज दिली असती तर कदाचित पुढची घटना झालीच नसती... आणि तुम्हा लोकांना म्हणजे त्याच्या मित्रांना पण जाणीव झाली असती... आता हेच बघ ना... सनीला काही नाही झालं... मग मला पण काही नाही होणार असं वाटलंच ना तुला.... तुझे वडील हे काही मुद्दाम करत नाहीत... कदाचित ह्या सगळ्यामुळे तुझं आयुष्य बदलेल... तुझा विचार करण्याचा दृष्टिकोन बदलेल... तू बदलशील..तेव्हा वीरू चांगल्क विचार करून पुढचं पाऊल टाक.... "
ह्यावर तो काहीच बोलू शकला नाही... कुठेतरी आई बरोबर बोलते हे त्याला जाणवत होत.....त्याला शांत झालेलं बघून त्यांनी त्याच्या खांद्याला स्पर्श केला.
“मी तुला कधीच वाईट म्हणणार नाही…
पण आज मला भीती वाटतेय… की माझ्या मुलाने स्वतःला हरवायला नको आहे.....तो त्याच्या वडिलांसारखा आहे... हे तू सिद्ध करायला हवंस..तुझ्या नावाला सार्थक कर... तुझ्या वडिलांनी तुझं नाव खूप विचारपूर्वक ठेवलंय.....विराजस” म्हणजे असा व्यक्ती जो आपल्या तेज, गुण, आणि धैर्यामुळे इतरांपेक्षा वेगळा दिसतो.त्याच्या नावात राजसत्ता आणि आत्मविश्वास दोन्ही आहे..काळजी घे बाळा स्वतःची... आणि लवकरच आपल्या आईला भेटायला ये......”

त्या शब्दांने विराजसची छाती एकदम जड झाली.
आईने त्याच्या बॅगेत हात टाकून एक छोटा गणपती ठेवला.
आईने त्याच्या बॅगेत हात टाकून एक छोटा गणपती ठेवला.
“हे ठेव.......तू कुठेही जा… देव तुझं रक्षण करेल.
आणि… तू बदलशील. मला माहित आहे.”
आणि… तू बदलशील. मला माहित आहे.”
विराजसच्या डोळ्यांत पाणी आलं…
पण त्याने पुसून टाकलं..... त्याला कळतं होत पण अजून वळलं नव्हतं कारण तो अजूनही आपला इगो सोडायला तयार नव्हता.
पण त्याने पुसून टाकलं..... त्याला कळतं होत पण अजून वळलं नव्हतं कारण तो अजूनही आपला इगो सोडायला तयार नव्हता.
तेवढ्यात वडिलांचा जयंतरावांचा आवाज आला.....,
"आवरलं का तुमचं.....निघण्याची वेळ झाली आहे....."
आई दचकल्यासारखी बाजूला झाली.
त्याच्या वडिलांच्या चेहऱ्यावर कठोरपणा दिसत होता , पण डोळ्यांतल्या वेदना देखील जाणवत होत्या...
त्याच्या वडिलांच्या चेहऱ्यावर कठोरपणा दिसत होता , पण डोळ्यांतल्या वेदना देखील जाणवत होत्या...
विराजस बॅग हातात घेत बाहेर पडला.
दारी उभ्या आईने शेवटचं एकच वाक्य म्हटलं—
दारी उभ्या आईने शेवटचं एकच वाक्य म्हटलं—
“काळजी घे, वीरू.”
विराजस थांबला… पण मागे वळून पाहिलं नाही.
त्याला माहित होतं.....मागे पाहिलं तर तो पुढे जायला धजावणार नाही.
त्याला माहित होतं.....मागे पाहिलं तर तो पुढे जायला धजावणार नाही.
त्याने पाऊल टाकलं…आणि त्याच्या आयुष्याचा पहिला खरा प्रवास सुरू झाला.
कसा असेल विराजसच हा प्रवास....
मला एक नाव सुचवा बर आपल्या नायिकेसाठी......
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
क्रमश :-
@हर्षला "सान्वी"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा