डिसेंबर जानेवारी 2025 -26
दीर्घ कथालेखन स्पर्धा
फक्त तू... ओढ तुझी भाग चौदा
दीर्घ कथालेखन स्पर्धा
फक्त तू... ओढ तुझी भाग चौदा
मागील भागात आपण पाहिलं कि, विराजस आणि जय बोलत असतात तेवढ्यात मीरा येते. आता पाहूया पुढे,
तो साध्या शर्टमध्ये होता,एप्रन अजून त्याच्या हातातच होता तर केस थोडे विस्कटलेले…पण चेहऱ्यावर एक वेगळाच न समजणारा आत्मविश्वास होता. रागामुळे त्याचे डोळे थोडे तांबूस झालेले होते पण त्याच डोळ्यांत जिद्दही स्पष्ट दिसत होती.त्याचा तो गोरा रंग,जिममध्ये जाऊन कमावलेलं मजबूत शरीर,त्याचा तो attractive लुक पाहून मीरा पाहताच क्षणी घायाळ झाली.ती एक क्षण त्याच्याकडे पाहतच राहते आणि क्षणभरासाठी तिला किचनचा गोंधळ, आवाज, ऑर्डर्स, ती तिथे कश्याला आली आहे ह्या सगळ्याचा विसर पडतो...
" यार कसला handsome आहे हा...!"
ती मनातच म्हणते...
त्याच्याकडे तस बघताना पाहून जय हलकेच घसा खाकरतो आणि हसून म्हणतो...
“अं…... मिस....हा आहे न्यू ट्रेनी.”
तसही मीरा भानावर येते. व लगेच स्वतःला सावरते, आणि चेहऱ्यावर पुन्हा प्रोफेशनल हसू आणून म्हणते....
“हा...hi.... I am मीरा..मी आजपासून काही दिवस तुम्हाला guide करेन.... "
ती बोलते खरं पण नजर त्याच्यावरून काही केल्या तिची हातात नव्हती....
" ok... फाईन... I am विराजस... "
विर थोड्या अटीट्युड मध्ये म्हणतो... कारण त्याला मुलींच्या अश्या नजरांची सवय होती....
"Ok... मित्र चल… मी निघतो.बाकी आता तुझं तू बघ... संध्याकाळी येतो घ्यायला.”
जय म्हणतो तस वीर मान हलवतो. तस त्याला बाय करून जय बाहेर पडतो.
**********************************
इकडे जय हॉटेलच्या बाहेर येऊन आपल्या खिश्यातून फोन काढतो.
काही सेकंद रिंग वाजून पलिकडून कॉल उचलला जातो तस तो एकदम शांततेत बोलतो,
"तुम्ही सांगितलं तसंच केलं आहे....मी त्याला इथे सोडलंय.”
पलीकडून काहीतरी म्हंटल जात तस तो थोडा थांबतो,समोरच्या हॉटेलकडे पाहून म्हणतो,
“हो सर.....पुढे काय होईल माहीत नाही…पण बदलाची सुरुवात झाली आहे.”
तस त्याचा कॉल कट होतो.तो एक खोल श्वास घेऊन मनातच बोलतो,
"आता सगळं काही त्याच्यावरच आहे,... देवा माझ्या मित्राची मदत कर... त्याला सवय नाही ह्याची...."
आणि तो गाडीच्या दिशेने निघतो....
**********************************
इकडे मीरा वीर कडे पाहून म्हणते,
" वेलकम टू स्वादिष्टम...आज मी तुला basics दाखवणार आहे.”
वीर थोडा गोंधळतो पण तो मान हलवून हो म्हणतो,
“अं… ठीक आहे......”
तस मीरा त्याला चॉपिंग बोर्डसमोर उभी करते... सगळ्यात आधी त्याला तिथल्या प्रत्येक वस्तूंची नावे सांगते आणि मग त्याच्याकडे पाहून म्हणते,
“हे बघ,हा knife असा धरायचा..... तुला सांगते हे पकडताना Finger position महत्त्वाची असते कारण त्याने स्पीड पकडता येतो... पण सुरुवातीला स्पीड जास्त येत नाही नंतर सवय होते... पण त्याआधी control हवा ना.... नाहीतर हाताला लागेल..... "
तस त्याच्या चेहऱ्यावर बारा वाजतात
..
..
जयने कुणाला कॉल केला असेल????
वीर ह्या वातावरणात स्वतःला कसा अड्जस्ट करेल????
वीर ह्या वातावरणात स्वतःला कसा अड्जस्ट करेल????
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
क्रमश :-
@हर्षला "सान्वी"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा