डिसेंबर जानेवारी 2025 -26
दीर्घ कथालेखन स्पर्धा
फक्त तू... ओढ तुझी भाग चोवीस
दीर्घ कथालेखन स्पर्धा
फक्त तू... ओढ तुझी भाग चोवीस
मागील भागात आपण पाहिलं कि, अवनी वीरकडून कशी चुकी होईल हेच पाहत होती. त्याच्याकडून एक टुकडा मोठा कापला जातो तस ती त्याला ओरडते. आता पाहूया पुढे,
"अरे हे काय केलस..."
तिचा एकदम कडक आवाज ऐकून तो दचकला...
“मी सांगितलं नव्हतं का consistency महत्त्वाची आहे? तरी सुद्धा कशी काय चुकी होऊ शकते..? "
ते ऐकून वीर खाली मान घालून म्हणतो,
“Sorry…ते घाईत…झालं.... चुकून ”
“ओह्ह... तर आता तू अस excuse देणार..मन लावून केल नाहीतर असच होईल ना....? "
ती त्याच्यावर ओरडते....तो काहीच बोलत नाही...
“तुला समजतंय ना इथे एक चूक म्हणजे पूर्ण प्लेट खराब झालीच समजा... आणि एवढं मटेरियल वाया जात त्याच काय???
ती रागात हाताने ते सगळे तुकडे बाजूला काढते...
“आता सगळं पुन्हा कर... नीट......”
वीरला ते ऐकूनच सगळे देव आठवतात....
"परत एवढं सगळं करायचं म्हणजे...? "
तो मनातच बोलतो पण तिच्यासमोर काहीही बोलत नाही.
इच्छा नसताना सुद्धा तो पुन्हा सुरुवात करतो. तो आतून भयंकर चिडलेला होता, पण वरून स्वतःला शांत ठेवत होता.. आणि तो अस का करत होता तेच त्याला समजत नव्हतं... आजपर्यँत तो दुसऱ्यांवर रुबाब करत होता, त्यामुळे त्या व्यक्तीला वाईट वाटत असेल, राग येत असेल, वेदना होत असतील हे त्याला समजत नव्हतं.. पण आता पहिल्यांदा त्याला जाणीव होत होती... कि समोरच्याला कस वाटत असेल....?
इच्छा नसताना सुद्धा तो पुन्हा सुरुवात करतो. तो आतून भयंकर चिडलेला होता, पण वरून स्वतःला शांत ठेवत होता.. आणि तो अस का करत होता तेच त्याला समजत नव्हतं... आजपर्यँत तो दुसऱ्यांवर रुबाब करत होता, त्यामुळे त्या व्यक्तीला वाईट वाटत असेल, राग येत असेल, वेदना होत असतील हे त्याला समजत नव्हतं.. पण आता पहिल्यांदा त्याला जाणीव होत होती... कि समोरच्याला कस वाटत असेल....?
इकडे दूर उभी असलेली मीरा हे सगळं पाहत होती तिच्या चेहऱ्यावर असलेली काळजी दिसून येत होती...आणि अवनी मॅडम अजूनही राग दाखवत होत्या...पण मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात तिला एक हलकीशी जाणीव होत होती कि काहीतरी चुकीचं करते, पण संचितच नाव डोळ्यासमोर आलं तस अवनी ती झालेली जाणीव लगेच दाबून टाकते... आणि ती निघून जाते....
इकडे घाईत काम करत असताना वीरला सवय नसल्यामुळे त्याचा हात थोडा लटपटतो आणि
क्षणभरातच त्याच्या तोंडातून एक अस्पष्ट हुंकार बाहेर पडतो,
क्षणभरातच त्याच्या तोंडातून एक अस्पष्ट हुंकार बाहेर पडतो,
“आह!... आई ग....!!"
तो चाकू चुकून त्याच्या बोटाला लागतो, चांगलीच धार असल्यामुळे लाल रक्ताची धार लगेच वाहू लागली होती... तस घाबरून वीर हात घट्ट पकडतो.पण वेदना चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या....तो बोट दाबून धरतो पण रक्त थांबत नाही. इकडे मीरा ते पाहते आणि धावत त्याच्याजवळ जाते....
“वीर! काय झालं?”
ती त्याचा हात पकडते. वाहणारे रक्त पाहून ती घाबरते....
" काही नाही चुकून लागलं.... "
तो बोलतो...
“देवा… खूप लागलंय!”
ती पटकन टिश्यू आणते आणि जखमेवर दाब देते... आजूबाजूला हळद शोधून त्यावर लावते... हळद झोंबल्यामुळे तो जोरात ओरडतो तस तो आवाज ऐकून
अवनी त्यांच्या जवळ जाते....
अवनी त्यांच्या जवळ जाते....
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "favorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
क्रमश :-
@हर्षला "सान्वी"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा